Home Blog Page 25

Top 5 Engineering Colleges in India : फक्त IIT च नाही.. तर Google ‘या’ 5 कॉलेजमधून करते हायरिंग; ऍडमिशन मिळाले तर नशीब उजळलेच म्हणून समजा….

Top 5 Engineering Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील सर्व (Top 5 Engineering Colleges in India) आयआयटी महाविद्यालये (IIT Colleges) निश्चितच अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संस्था आहेत. पण आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की Google केवळ आयआयटीपुरते मर्यादित नाही. देशभरात इतर अनेक महाविद्यालये आहेत, जी Google प्लेसमेंटसाठी प्रमुख केंद्रे बनली आहेत. या महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या तांत्रिक कौशल्यासाठी आणि नाविन्यपूर्णतेसाठी ओळखले जातात. चला तर पाहूया या महाविद्यालयांची यादी…

बिरला इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड सायन्स, पिलानी (BITS Pilani)
BITS पिलानी ही अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक नामांकित संस्था आहे. येथील विद्यार्थी केवळ तांत्रिक ज्ञानातच कणखर नसून नवीन कल्पना शिकण्यासाठी आणि (Top 5 Engineering Colleges in India) अंगीकारण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळेच गुगलसारख्या मोठ्या तांत्रिक कंपन्या येथून हुशार विद्यार्थ्यांना भरती करून घेण्यास उत्सुक आहेत.

    दिल्ली टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी, दिल्ली (DTU Delhi) –
    दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ही भारतातील आणखी एक नामांकित संस्था आहे, जी Google प्लेसमेंटसाठी प्राधान्य देते. डीटीयू संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये अनेक उत्कृष्ट अभ्यासक्रम ऑफर करते, ज्याद्वारे बरेच विद्यार्थी Google वर यशस्वी करिअर बनवतात.

    अन्ना यूनिवर्सिटी, चेन्नई (Anna University, Chennai) (Top 5 Engineering Colleges in India)-
    अण्णा विद्यापीठ हे चेन्नईतील एक आघाडीचे सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे, जे विविध अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रम देते. हे शैक्षणिक उत्कृष्टता आणि मजबूत उद्योग संबंधांसाठी प्रसिद्ध आहे.

    वेल्लोर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, वेल्लोर (VIT Vellore) –
    व्हीआयटी त्याच्या सर्वसमावेशक अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी आणि व्यावहारिक शिक्षणावर भर देण्यासाठी ओळखले जाते. संस्थेचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना वास्तविक-जगातील (Top 5 Engineering Colleges in India) उद्योग आव्हानांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे VIT पदवीधर Google सारख्या कंपन्यांसाठी अत्यंत आकर्षक ठरतात.

    नेशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, त्रिची (NIT Trichy) –
    एनआयटी त्रिची हे देशातील सर्वोत्तम एनआयटीपैकी (Top 5 Engineering Colleges in India) एक आहे. इथला अभ्यास खूप कठीण आहे, पण हे कठोर परिश्रम विद्यार्थ्यांना एक यशस्वी अभियंता बनण्यासाठी आवश्यक असलेला मजबूत पाया प्रदान करते. NIT त्रिचीचे विद्यार्थी त्यांच्या तांत्रिक क्षमता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात.
    अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      Success Story : आई-वडिलांना वाटायचं मुलीनं सरकारी अधिकारी व्हावं; एक टर्निंग पॉईंट आणि उभारला केकचा व्यवसाय

      Success Story of Mitali Datar

      करिअरनामा ऑनलाईन । कोरोना लॉकडाऊनच्या काळात (Success Story) घरातून बाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी घरीच राहून वाढदिवस साजरा करण्यास पसंती दिली. लोकांची गरज ओळखून अनेक तरुण मुली आणि महिलांनी स्वतः केक बनवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अनेकांनी केक बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि काहींनी ही आवड व्यवसाय म्हणूनही प्रस्थापित केली. मुंबईतील मिताली दातार ही अशीच एक महिला आहे, ज्यांनी लॉकडाऊनच्या काळात केक बनवण्याच्या छंदाला यशस्वी व्यवसायात रूपांतरित केले आहे. त्यांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत…

      मैत्रिणीच्या घरी जाऊन केक बनवायची (Success Story)
      मिताली कॉलेजमध्ये असताना एक दिवसीय केक बनवण्याच्या कार्यशाळेत सहभागी झाली होती. यानंतर, जेव्हा लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा त्यांनी आपल्या मित्रांसाठी केक बनवण्यास सुरुवात केली. मित्रांना तिचे केक इतके आवडले की त्यांनी मितालीकडे ऑर्डर देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मितालीकडे ओव्हन आणि फ्रीज सारखी उपकरणे नव्हती, त्यामुळे ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन केक बनवायची.

      घरच्यांचा पाठिंबा आणि व्यवसायाला सुरुवात
      मितालीने सरकारी अधिकारी व्हावे अशी तिच्या आईची इच्छा होती; यासाठी मिताली स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. पण तिला यामध्ये वारंवार अपयश येत होते. अशातच एक (Success Story) दिवस असे झाले; 2022 च्या सुरुवातीला कुटुंबाने मितालीला केक व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले. घरच्यांच्या पाठिंब्याने मितालीने पूर्ण आत्मविश्वासाने केकचा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू ऑर्डर घ्यायला सुरुवात केली.

      यशाच्या दिशेने पावले पडू लागली (Success Story)
      २५ वर्षीय मितालीच्या केकची चव इतकी प्रसिध्द आहे; की कलाकार आणि मोठ्या कार्यालयांकडून तिला केकच्या ऑर्डर मिळतात. एवढेच नाही तर विलेपार्ले पूर्व येथे तिचा एक स्टॉलही आहे, जिथे तिची बेकरी आणि केक उत्पादने खूप लवकर विकली जातात. ग्राहकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी तिने हा स्टॉल सुरू केला आणि या स्टॉलमुळे तिच्या ऑर्डर्समध्येही वाढ झाली आहे. मितालीचा प्रवास लहान उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे, ज्यातून हे दिसून येते की उत्कटतेने आणि कठोर परिश्रमाने कोणत्याही छंदाचे यशस्वी व्यवसायात रूपांतर केले जाऊ शकते.
      केवळ सरकारी अधिकारी होवून करिअर घडवता येत नाही; तर तुमच्यातील कल्पना शक्ती आणि मेहनत तुम्हाला करिअरचा चांगला मार्ग देवू शकते; ही गोष्ट मिताली यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      GK Update : सामान्य ज्ञान वाढवणारे ‘हे’ 5 प्रश्न ज्याची उत्तरे माहीत असायलाच हवीत

      GK Update 2 Sep

      करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

      प्रश्न 1 – हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे संस्थापक कोण होते हे तुम्हाला माहीत आहे का?
      उत्तर –
      हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद होते.
      प्रश्न 2 – नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
      उत्तर –
      नालंदा विद्यापीठाची (GK Update) स्थापना कुमार गुप्ता यांनी केली होती?
      प्रश्न 3 – असा कोणता प्राणी आहे जिथे बायको नाही तर नवराच गरोदर होतो?
      उत्तर –
      सागरी घोडा हा एकमेव प्राणी आहे ज्यामध्ये बायको नाही तर नवराच गरोदर राहतो.

      प्रश्न 4 – (GK Update) दोन नैसर्गिक उपग्रह असलेला ग्रह कोणता आहे?
      उत्तर –
      मंगळ हा एकमेव ग्रह आहे ज्यामध्ये दोन नैसर्गिक उपग्रह आहेत.
      प्रश्न 3 – कोणत्या राज्यात पेरूचे सर्वाधिक उत्पादन होते?
      उत्तर –
      पेरूचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होते.
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      Digital India Corporation Recruitment 2024 : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन येथे 118 पदांवर भरती सुरु; काय आहे पात्रता?

      Digital India Corporation Recruitment 2024

      करिअरनामा ऑनलाईन । डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (Digital India Corporation Recruitment 2024) अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या रिक्त पदे, पात्रता, अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती..

      संस्था – डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन
      भरले जाणारे पद – हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
      पद संख्या – 118 पदे (Digital India Corporation Recruitment 2024)
      अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2024

      भरतीचा तपशील –

      पदपद संख्या 
      हेड SeMT३१
      सल्लागार४७
       वरिष्ठ सल्लागार४०

      आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Digital India Corporation Recruitment 2024)

      पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
      हेड SeMTB.E. / B. Tech. /MCA, M.Tech/ M.S/ MBA
      सल्लागारB.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S
      वरिष्ठ सल्लागारB.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S

      असा करा अर्ज –
      1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
      2. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक खाली दिली आहे.
      3. मुदती नंतर प्राप्त (Digital India Corporation Recruitment 2024) झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
      4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.
      निवड प्रक्रिया –
      1. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
      2. मुलाखतीसाठी केवळ (Digital India Corporation Recruitment 2024) निवडलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल.
      3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
      4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

      काही महत्वाच्या लिंक्स –
      अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
      ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
      अधिकृत वेबसाईट –
      dic.gov.in
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      GAIL India Recruitment 2024 : गेल इंडिया देत आहे नोकरीची संधी; 391 पदांवर भरती सुरु; 7 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज

      GAIL India Recruitment 2024

      करिअरनामा ऑनलाईन । गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध (GAIL India Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गैर-कार्यकारी पदांच्या एकूण 391 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती….

      संस्था – गेल इंडिया लिमिटेड
      भरले जाणारे पद – गैर-कार्यकारी
      पद संख्या – 391 पदे (GAIL India Recruitment 2024)
      अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024

      असा करा अर्ज –
      1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
      2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
      3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
      4. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
      5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
      6. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

      काही महत्वाच्या लिंक्स – (GAIL India Recruitment 2024)
      अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
      ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
      अधिकृत वेबसाईट –
      https://gailonline.com/
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      NHDC Recruitment 2024 : नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे विविध पदांवर भरती सुरु; 2 लाखापेक्षा जास्त मिळेल पगार

      NHDC Recruitment 2024

      करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (NHDC Recruitment 2024) असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सहायक व्यवस्थापक, कंपनी सचिव, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, उप. महाव्यवस्थापक (HR) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 16 जागासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.

      संस्था – नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड
      भरले जाणारे पद – कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सहायक व्यवस्थापक, कंपनी सचिव, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, उप. महाव्यवस्थापक (HR)
      पद संख्या – 16 पदे
      अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024

      वय मर्यादा (NHDC Recruitment 2024) –
      1. कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक – 50 वर्षे
      2. मुख्य व्यवस्थापक – 48 वर्षे
      3. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 25 वर्षे
      4. सहायक व्यवस्थापक – 38 वर्षे
      5. कंपनी सचिव – 40 वर्षे
      अर्ज फी – Rs.500/-

      भरतीचा तपशील –

      पदपद संख्या 
      कार्यकारी संचालक01
      महाव्यवस्थापक01
      उप. महाव्यवस्थापक01
      मुख्य व्यवस्थापक02
      व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी06
      सहायक व्यवस्थापक01
      कंपनी सचिव01
      व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी02
      उप. महाव्यवस्थापक (HR)01

      मिळणारे वेतन –

      पदवेतन
      कार्यकारी संचालकRs.2,46,840/- p.m. (approx).
      महाव्यवस्थापकRs.2,06,800/- p.m. (approx)
      उप. महाव्यवस्थापकRs. 1,86,120 /-p.m. (approx.)
      मुख्य व्यवस्थापकRs. 1,65,440/-p.m. (approx.)
      व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीStipend: Rs.27,000/-p.m.
      सहायक व्यवस्थापकRs. 82,720/-p.m. (approx.)
      कंपनी सचिवRs.103400/- p.m. (approx)
      व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीStipend: Rs.30,000/- p.m.
      उप. महाव्यवस्थापक (HR)Rs. 1,86,120 /-p.m. (approx.)

      असा करा अर्ज –
      1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
      2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
      3. अर्ज करण्याची शेवटची (NHDC Recruitment 2024) तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
      4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

      काही महत्वाच्या लिंक्स –
      अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
      ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
      अधिकृत वेबसाईट – https://www.nhdc.org.in/

      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      Government Job : भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार येथे विविध पदांवर भरती सुरु; अर्जासाठी त्वरा करा

      Government Job

      करिअरनामा ऑनलाईन । भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार अंतर्गत सरकारी (Government Job) नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ अधिकारी, अभिलेखाकाराची, मायक्रो फोटोग्राफिस्टची, असिस्टंट मायक्रोफोटोग्राफिस्टची, अधीक्षक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (13 ऑक्टोबर 2024) आहे.

      संस्था – भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार
      भरली जाणारी पदे – शास्त्रज्ञ अधिकारी, अभिलेखाकाराची, मायक्रोफोटोग्राफिस्टची, असिस्टंट मायक्रोफोटोग्राफिस्टची, अधीक्षक (Government Job)
      पद संख्या – 12 पदे
      अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
      अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप संचालक, अभिलेखाकार (प्रशासन), भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार, जनपथ, नवी दिल्ली-११०००१
      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 45 दिवस (13 ऑक्टोबर 2024)

      भरतीचा तपशील (Government Job) –

      पदपद संख्या 
      शास्त्रज्ञ अधिकारी01
      अभिलेखाकाराची02
      मायक्रोफोटोग्राफिस्टची02
      असिस्टंट मायक्रोफोटोग्राफिस्टची02
      अधीक्षक05

      मिळणारे वेतन –

      पदमिळणारे वेतन
      शास्त्रज्ञ अधिकारीग्रुप “बी” पद (राजपत्रित), विगर-मंत्रीपद पे मॅट्रिक्स लेव्हल ८ (रु. ४७,६००/- रु. १,५१,१००/-)लेव्हल ९ (रु. ५३,१००/- रु. १,६७,८००/-) चार वर्षांनंतर अकार्यक्षम निवड श्रेणी असलेले
      अभिलेखाकाराची रु. ४७,६००/- रु. १,५१,१००/-
      मायक्रोफोटोग्राफिस्टचीरु. ४४,९००/- रु. १,४२,४००/-
      असिस्टंट मायक्रोफोटोग्राफिस्टचीरु. ३५,४००/- रु. १,१२,४००/-
      अधीक्षकरु. ३५,४००/- रु. १,१२,४००/-

      असा करा अर्ज –
      1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
      2. अर्जासोबत (Government Job) आवश्यक कागदपत्र जोडा.
      3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (13 ऑक्टोबर 2024) आहे.
      4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

      काही महत्वाच्या लिंक्स –
      अधिकृत वेबसाईट – https://nationalarchives.nic.in/
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      Lokpal Of India Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! भारत लोकपाल अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

      Lokpal Of India Recruitment 2024

      करिअरनामा ऑनलाईन । भारत लोकपाल अंतर्गत रिक्त पदांच्या (Lokpal Of India Recruitment 2024) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘सल्लागार’ पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.

      संस्था – भारत लोकपाल
      भरले जाणारे पद – सल्लागार
      पद संख्या – 10 पदे (Lokpal Of India Recruitment 2024)
      अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
      अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (आस्थापना), भारताचे लोकपाल, 6, वसंत कुंज संस्थात्मक क्षेत्र, फेज-II, नवी दिल्ली-110070
      अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2024

      वय मर्यादा – 63 वर्षे
      आवश्यक शैक्षणिक पात्रता – Bachelor degree from a recognized university.
      असा करा अर्ज (Lokpal Of India Recruitment 2024) –
      1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
      2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
      3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे.
      4. अर्जामध्ये आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
      5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.
      6. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

      काही महत्वाच्या लिंक्स –
      अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
      अधिकृत वेबसाईट – https://lokpal.gov.in/
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      Har Ghar Durga Abhiyan : मुलींना बनवणार फायटर!! महाविद्यालयात मिळणार आत्मसंरक्षणाचे धडे

      Har Ghar Durga Abhiyan

      करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील प्रत्येक शासकीय (Har Ghar Durga Abhiyan) औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘हर घर दुर्गा’अभियानांतर्गत (Har Ghar Durga Campaign) हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण वर्षभर दिले जाणार आहे. यासाठी आयटीआय महाविद्यालयात मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी राखीव तासिका ठेवण्यात येणार आहेत; अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिली आहे.
      या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या खास तासिकेप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण (Har Ghar Durga Abhiyan) प्रशिक्षणासाठी राखीव तासिका असावी, यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पाऊल उचलले आहे.

      काय आहे अभियानाचा उद्देश (Har Ghar Durga Abhiyan)
      राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी या उद्देशाने ‘हर घर दुर्गा अभियान’ सुरू करीत आहोत, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

      सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना देण्यात येणार
      हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य (Har Ghar Durga Abhiyan) घेण्यात येणार असून, विद्यार्थिनींना नियमित सराव करता येणार आहे. शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे, ज्युडो यांसारख्या स्वसंरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी २ तासिका घेण्यात येणार आहेत. त्याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना देण्यात येणार आहे.
      अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

      District Magistrate and Collector : जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात कोणता फरक आहे? कोणाकडे आहे जास्त पॉवर

      District Magistrate and Collector

      करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी (District Magistrate and Collector) ही दोन्ही प्रशासकीय पदे आहेत. या पदावरील व्यक्ती जिल्ह्याचे प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था हाताळतात. बऱ्याचदा ही दोन पदे एकाच व्यक्तीकडे असतात, परंतु त्यांच्या कर्तव्यात आणि जबाबदाऱ्यांमध्ये काही महत्त्वाचे फरक असतात. जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यातील फरक तपशीलवार समजून घेवूया…

      1. जिल्हाधिकारी (District Magistrate and Collector)
      जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्य काम हे जिल्ह्यातील महसूल वसुली आणि जमीन प्रशासनाशी संबंधित आहे. हे पद ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे, ज्यावेळी कलेक्टरचे मुख्य काम कर गोळा करणे हे होते.

        जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीच्या जबाबदाऱ्या

        • जमीन प्रशासन
        • महसूल संकलन
        • शासकीय योजनांची अंमलबजावणी
        • कृषी आणि (District Magistrate and Collector) विकास कामांचे पर्यवेक्षण
        • नैसर्गिक आपत्ती दरम्यान मदत आणि पुनर्वसन

        2. जिल्हा दंडाधिकारी –

        • जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्य काम आहे. त्याला ‘डीएम’ (DM) असेही म्हणतात. हे पद मुख्यतः भारतीय दंड संहिता अंतर्गत कार्य करते.
        • दंडाधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या
          जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे
        • न्यायिक कार्ये
        • निवडणूक आयोजित करण्याची जबाबदारी
        • कलम 144 लागू करणे
        • फौजदारी प्रकरणे आणि पोलिस प्रशासनाचे पर्यवेक्षण

        जिल्हाधिकाऱ्यांची शक्ती आणि अधिकार (District Magistrate and Collector) –

          • जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार असे आहेत – जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील जमीन आणि महसुली प्रकरणांमध्ये सर्वाधिक अधिकार आहेत. ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि सरकारी योजना राबवतात.
          • जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे अधिकार असे आहेत – कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आणीबाणीच्या परिस्थितीत जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निर्णायक अधिकार आहे. त्यांच्याकडे पोलिस दलाला निर्देशित करण्याचा अधिकार आहे आणि ते गुन्हेगारी प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकतात.

          कोणाकडे आहे जास्त पॉवर –

          • सामान्यतः, जिल्हा दंडाधिकारी यांना जिल्ह्यात अधिक अधिकार दिले जातात, कारण त्यांचे मुख्य कार्य कायदा आणि सुव्यवस्था आणि गुन्हेगारी प्रकरणांवर नियंत्रण ठेवणे हे आहे; जे जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचे काम आहे.
          • तथापि, प्रशासकीय आणि महसुली बाबींमध्ये जिल्हाधिकारी देखील महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांचे पद देखील अत्यंत प्रभावशाली आहे. (District Magistrate and Collector)
          • भारतातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये एकाच व्यक्तीकडे दोन्ही पदे आहेत; याचा अर्थ असा की ती व्यक्ती दोन्ही भूमिकांमध्ये काम करते आणि दोन्हीच्या अधिकारांचा उपभोग घेते.
          • जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी हे दोघेही जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी आहेत, परंतु जिल्हा दंडाधिकारी हे पद अधिक शक्तिशाली मानले जाते. दोन्ही पदांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असल्या तरी त्या अनेकदा एकाच व्यक्तीकडून हाताळल्या जातात, त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था सुरळीत चालते हे निश्चित.

          अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com