Home Blog Page 179

MPCB Recruitment 2024 : मुंबईत नोकरी करण्याची संधी सोडू नका; इथे मिळेल महिना 2 लाखापर्यंत पगाराची नोकरी

MPCB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण (MPCB Recruitment 2024) मंडळ अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहायक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board)
भरले जाणारे पद – प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहायक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक
पद संख्या – 61 पदे
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2024

भरतीचा तपशील – (MPCB Recruitment 2024)

पद पद संख्या 
प्रादेशिक अधिकारी 02
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
वैज्ञानिक अधिकारी 02
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
प्रमुख लेखापाल 03
विधी सहायक 03
कनिष्ठ लघुलेखक 14
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक 16
वरिष्ठ लिपिक 10
प्रयोगशाळा सहायक 03
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक 06

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
प्रादेशिक अधिकारी एस-२३, ६७७००-२०८७००
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस-२३, ६७७००-२०८७००
वैज्ञानिक अधिकारी एस-१९, ५५१००-१७५१००
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस-१५, ४१८००-१३२३००
प्रमुख लेखापाल एस-१४, ३८६००-१२२८००
विधी सहायक एस-१४, ३८६००-१२२८००
कनिष्ठ लघुलेखक एस-१४, ३८६००-१२२८००
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक एस-१३, ३५४००-११२४००
वरिष्ठ लिपिक एस-०८, २५५००-८११००
प्रयोगशाळा सहायक एस-०७, २१७००-६९१००
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक एस-०६, १९९००-६३२००

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (MPCB Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mpcb.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NICL Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी मोठी बातमी!! नॅशनल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत AO पदावर नवीन भरती सुरु

NICL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत (NICL Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी (सामान्य आणि विशेषज्ञ) (स्केल I) पदाच्या एकूण 274 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 02 जानेवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

संस्था – नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद – प्रशासकीय अधिकारी (सामान्य आणि विशेषज्ञ) (स्केल I)
(ADMINISTRATIVE OFFICERS GENERALISTS & SPECIALISTS, SCALE I)
पद संख्या – 274 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 02 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत

वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे
अर्ज फी – (NICL Recruitment 2024)
SC / ST / PwBD – Rs. 250/-
All candidates other than SC / ST / PwBD – Rs. 1000/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
काही महत्वाची कागदपत्रे –
1. संबंधित तारखेसाठी आणि परीक्षेच्या सत्रासाठी वैध कॉल लेटर
2. फोटो-ओळख पुरावा (खाली नमूद केल्याप्रमाणे) मूळ नावात आणि इतर माहितीवर जसे दिसते तसे कॉल लेटर/अर्ज फॉर्म
3. वरील फोटो-ओळख पुराव्याची छायाप्रत
4. ई-आधार कार्ड

असा करा अर्ज –
1. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या तारखे (NICL Recruitment 2024) अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्ज प्रक्रिया 02 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
निवड प्रक्रिया –
The written exam will be conducted in two phases
1. Phase – I: Preliminary Examination online
2. Phase – II: Main Examination online

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nationalinsurance.nic.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti : नव्या वर्षात ‘यादिवशी’ लागणार तलाठी भरतीचा निकाल; आठ लाख उमेदवारांची उत्सुकता शिगेला 

Talathi Bharti (3)

करिअरनामा ऑनलाईन । बहुचर्चित तलाठी भरती संदर्भात एक (Talathi Bharti) महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील सुमारे आठ लाख उमेदवार तलाठी भरती परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान तलाठी परीक्षेवर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेपही घेतला होता.

तलाठी भरतीचा (Talathi Bharti) निकाल जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी साडे अकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. अर्जाच्या छाननी नंतर ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.
परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय व्हायला नको म्हणून कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करण्याचे काम सुरु आहे.

तलाठी भरती परीक्षेतील २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ उमेदवारांकडून आलेले आक्षेप, १४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, टीसीएस (TCS) कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होणार अशी शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे.

निकाल का लांबला? (Talathi Bharti)
संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब हाेत असल्याची माहिती त्यांनी दिली. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा नरके यांनी व्यक्त केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : ऊसने पैसे घेवून MBA पूर्ण केले; हिम्मतीने उभारली स्वतःची कंपनी; इथे होते 95 हजार कोटींची उलाढाल

Career Success Story of Girish Matrubhutam

करिअरनामा ऑनलाईन । गिरीश मातृभूतम हे सॉफ्टवेअर (Career Success Story) कंपनी ‘फ्रेशवर्क्स इंक’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कंपनीची सुरुवात चेन्नईतून केली. पण आता ही कंपनी अमेरिकास्थीत कंपनी आहे. 2021 मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमधील ब्लॉकबस्टर IPO द्वारे त्यांनी सुमारे एक दशलक्ष डॉलर्स कमवले. एवढंच नाही तर त्यांनी आपल्यासोबत 500 कर्मचाऱ्यांना रातोरात करोडपती बनवले. गिरीश मातृभूतम यांच्या प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत….

शून्यातून विश्वनिर्मिती 
गिरीश मातृभूतम यांची कारकिर्द म्हणजे शून्यातून शिखरावर पोहोचण्याची कथा आहे. अगदी लहान वयात त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात दिग्गज बनण्याचा प्रवास केला आहे. त्यांची कंपनी ‘फ्रेशवर्क्स इंक’ ही सध्या 95,000 कोटी रुपयांची कंपनी आहे.

नातेवाईकांकडून पैसे घेवून शिक्षण पूर्ण केले (Career Success Story)
गिरीश मातृभूतम यांचा जन्म तमिळनाडूतील त्रिची शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शालेय शिक्षणानंतर ते चेन्नईला अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी गेले. अभ्यासात त्यांची प्रगती तशी सामान्य होती. त्यानंतर 1992 मध्ये त्यांनी एमबीए करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी वडिलांकडे पैसे मागितले. त्यांचे वडील एक सामान्य सरकारी कर्मचारी होते. ते गिरीश यांची MBAची फी भरण्यास असमर्थ होते. मुलाचे शिक्षण थांबू नये यासाठी त्यांनी नातेवाईकांकडून कर्ज घेतले आणि मुलाच्या शिक्षणाची फी भरली.

एका जाहिरातीने लक्ष वेधले
MBA पूर्ण केल्यानंतर गिरीश यांना नोकरी लागली. झोहो येथे नऊ वर्षे ते चांगल्या पगारावर आरामदायी नोकरी करत होते. नंतर एका वेबसाइटवरील जाहिरातीने (Career Success Story) त्यांना नवीन IT हेल्पडेस्क उत्पादन तयार करण्यासाठी प्रेरित केले. 2010 मध्ये, त्यांनी त्यांचा मित्र आणि सहकारी शान कृष्णसामी सोबत चेन्नईमध्ये ‘फ्रेशवर्क्स’ कंपनी सुरु केली. या कामासाठी त्यांनी 700 फुटांचे छोटे गोदाम घेतले होते.

कंपनीत होते 95,000 कोटींची उलाढाल
गिरीश मातृभूतम यांच्या कंपनीचा महसूल 8 वर्षांत शून्य ते 100 दशलक्ष डॉलर्सवर गेला. येथून पुढील दीड वर्षात ती 200 दशलक्ष डॉलर्सची कंपनी बनली. या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे आहे. याशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि जर्मनी येथेही त्याची कार्यालये आहेत. फ्रेशवर्क्सची आज 50,000 पेक्षा जास्त ग्राहकांसह 95,000 कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. त्यांच्या ग्राहकांमध्ये Honda, Boss, Citizen Advice, Toshiba आणि Cisco या ब्रँडचा समावेश आहे.
व्यवसायात करत असताना त्यांनी अनेकवेळा चढउतारही पाहिले आहेत. गिरीश यांच्या आयुष्यात संघर्ष आणि आव्हाने कमी वयात आली. जेव्हा ते सात वर्षांचे होते तेव्हा त्यांनी आपल्या आई-वडिलांचा वियोग पाहिला. या घटनेमुळे ते अकाली प्रौढ आणि स्वावलंबी झाले आहेत; असा त्यांचा विश्वास आहे.

सुपरस्टार रजनीकांत आहे आवडता
गिरीश मातृभूतम हे तमिळ सुपरस्टार रजनीकांत (Career Success Story) यांचे मोठे फॅन आहेत. रजनीकांत यांच्याबद्दलची त्यांची उत्कटता एका गोष्टीवरून समजू शकते ती म्हणजे जेव्हाही रजनीकांत यांचा नवीन चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा ते चेन्नईतील संपूर्ण सिनेमा हॉल आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बुक करतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teachers Recruitment : लवकरच होणार शिक्षक भरती!! तब्बल ‘इतकी’ पदे भरली जाणार

Teachers Recruitment (4)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरतीची (Teachers Recruitment) प्रक्रिया सुरु झाली आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 54 अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जवळपास 550 शिक्षकांची भरती होणार आहे. ज्या अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदे रिक्त आहेत त्यांना प्रारंभी शिक्षणाधिकाऱ्यांकडून बिंदुनामावली तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करुन घ्यावी लागेल. शेवटी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करावी लागणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन शिक्षक भरतीतून मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये 687 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. मागासवर्गीय कक्षाने बिंदुनामावली अंतिम केल्यानंतर डिसेंबर अखेर रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. जानेवारीत नोंदणी केलेल्या भावी शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरुन घेतले जाणार आहेत. गुणवत्ता यादीनुसार संबंधित शिक्षकांची नेमणूक होईल. त्याचवेळी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जातील.

शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने केले मोठे बदल (Teachers Recruitment)
1. नोंदणीकृत उमेदवाराच्या प्राधान्यक्रमानुसार त्या उमेदवारांना संबंधित संस्थेत मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे. आता पूर्वीप्रमाणे संस्थापक ठरवेल त्याच उमेदवाराला शिक्षक म्हणून मान्यता मिळणार नाही. वशिलेबाजी, डोनेशन अशा गोष्टींना लगाम बसावा म्हणून शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने हे बदल केले आहेत.
2. खासगी अनुदानित शाळांमध्ये (माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षक भरतीची पद्धती आता बदलली आहे. आता ज्या खासगी अनुदानित शाळांमध्ये पदे रिक्त आहेत, त्याठिकाणी एका पदासाठी तीन उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संबंधित शाळांमध्ये पाठविले जातील.
3. या तिघांची मुलाखत घेऊन त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार संस्थेला असणार आहे. पूर्वी, एका पदासाठी दहा उमेदवारांना पाठविण्याचा निर्णय होता, परंतु त्यात बदल करुन आता एका पदासाठी तीन उमेदवार असे समीकरण असेल.

जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांमधील शिक्षक पटसंख्येअभावी अतिरिक्त आहेत. त्यांची संख्या 84 असून कोणत्या संस्थांमध्ये कोणत्या विषयांचे शिक्षक रिक्त आहेत याची माहिती (Teachers Recruitment) घेतली जात आहे. नवीन शिक्षक भरती करण्यापूर्वी सुरवातीला या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल, अशी माहिती माध्यमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी दिली. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही एखादी शाळा अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करीत नसल्यास त्या शाळेतील रिक्तपद कमी केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : असा कोणता देश आहे जिथे शेतीच केली जात नाही? जनरल नॉलेज वाढवणारे प्रश्न पहाच

GK Updates 28 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण होती?
उत्तरः अण्णा रमजान मल्होत्रा
प्रश्न 2. बिहारच्या पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्र्याचे नाव काय होते?
उत्तर : अब्दुल गफूर खान
प्रश्न 3. (GK Updates) संपूर्ण जगात असा कोणता देश आहे जिथे शेती केली जात नाही?
उत्तर : सिंगापूर

प्रश्न 4. संपूर्ण जगात असा कोणता देश आहे जिथे शेती केली जात नाही?
उत्तर : सिंगापूर
प्रश्न 5. सावली नसलेली गोष्ट कोणती?
उत्तर: रस्ता
प्रश्न6. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: दि. 1 मे (GK Updates)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : सरकारी नोकरीची संधी!! ‘या’ विभागात होतेय नवीन भरती

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (Job Alert) अंतर्गत न्यायिक सदस्य पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

संस्था – केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (Central Administrative Tribunal)
भरले जाणारे पद – न्यायिक सदस्य
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली- 110001
वय मर्यादा – 50 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – The qualifications, eligibility, salary and other terms and conditions of the appointment of a candidate will be governed by the provisions of the – Tribunal (Conditions of Service) Rules, 2021.
असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
5. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
6. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://cgat.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DSSSB Recruitment 2024 : 12वी पास तरुणांची होणार ‘या’ पदासाठी निवड; अर्ज प्रक्रियेकडे लक्ष द्या

DSSSB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल (DSSSB Recruitment 2024) तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. इच्छुक उमेदवारांनी  वेळ न दवडता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचे आहेत. विशेष म्हणजे बारावी पास उमेदवार या पदासाठी पात्र ठरणार आहेत. नुकतीच या बंपर भरतीबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दिल्ली सबऑर्डिनेट सर्विस सिलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियासाठी अर्ज करु शकतात. दि. 9 जानेवारी 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट dsssb.delhi.gov.in वर जावे लागले. तिथेच आपल्याला या (DSSSB Recruitment 2024) भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल. ही मोठी बंपर भरती होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. 7 फेब्रुवारी 2024 आहे. तर भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : महिन्याचा 2,15,000 पगार; ग्रॅज्युएट/डिग्री धारकांसाठी ‘इथे’ मिळेल सरकारी नोकरी

Government Job (41)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय (Government Job) विकास संस्था अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, सल्लागार ग्रेड 2, सल्लागार ग्रेड 1, तरुण व्यावसायिक, कार्यक्रम समन्वयक, सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर, प्रकल्प सल्लागार पदांच्या एकूण 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था
भरले जाणारे पद – वरिष्ठ सल्लागार, सल्लागार ग्रेड 2, सल्लागार ग्रेड 1, तरुण व्यावसायिक, कार्यक्रम समन्वयक, सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर, प्रकल्प सल्लागार
पद संख्या – 152 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, NIESBUD, A-23, सेक्टर-62, संस्थात्मक क्षेत्र, नोएडा – 201 309 (U.P.)

वय मर्यादा – 32 ते 65 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील – (Government Job)

पद पद संख्या 
वरिष्ठ सल्लागार 04 पदे
सल्लागार ग्रेड 2 04 पदे
सल्लागार ग्रेड 1 08 पदे
तरुण व्यावसायिक 16 पदे
कार्यक्रम समन्वयक 15 पदे
सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर 05 पदे
प्रकल्प सल्लागार 100 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार Master’s Degree in Social Science/ Humanity /MSW/MBA in Management from a recognized University/ Institute.
सल्लागार ग्रेड 2 Master Degree in Social Science/ Humanity /MSW/MBA in Management from recognized University/ Institute.
सल्लागार ग्रेड 1 Master Degree in Social Science/ Humanity /MSW/MBA in Management from recognized University/ Institute.
तरुण व्यावसायिक Master Degree in Social Science/ Humanity /MSW/MBA in Management from recognized University/ Institute.
कार्यक्रम समन्वयक Graduate from recognized University/ Institute. (Government Job)
सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर Masters in Computer Science from a reputed University/College.
प्रकल्प सल्लागार Graduate in Entrepreneurship/ Business Administration/ Social Science/ Science/Commerce/ Social Work, or any other related relevant discipline.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
वरिष्ठ सल्लागार Rs. 1,76,000/- – 2,15,000/
सल्लागार ग्रेड 2 Rs. 1,21,000/- – 1,75,000/-
सल्लागार ग्रेड 1 Rs. 80,000/- – 1,20,000/-
तरुण व्यावसायिक Rs. 60,000/-
कार्यक्रम समन्वयक Rs. 35,000/-
सिस्टम विश्लेषक/डेव्हलपर Rs. 61,000/- – 79,000/-
प्रकल्प सल्लागार Rs. 35,000/-

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.niesbud.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIESL Recruitment 2024 : पदवीधारकांसाठी एअर इंडियामध्ये नोकरीची संधी; 209 पदे रिक्त; पगारही आकर्षक

AIESL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. अंतर्गत रिक्त (AIESL Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट सुपरवाइजर पदाच्या एकूण 209 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

संस्था – एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि.
भरले जाणारे पद – असिस्टंट सुपरवाइजर
पद संख्या – 209 पदे (AIESL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)
Email ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Sc/B.Com/B.A/BCA/B.Sc. (CS)/ पदवीधर (IT/CS), डेटा एंट्री / कॉम्प्युटरमध्ये किमान 01 वर्ष कामाचा अनुभव असावा.
वय मर्यादा – (AIESL Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 35 वर्षे असावे.
2. SC/ST -05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – जनरल/ओबीसी/EWS रुपये 1000/-
मिळणारे वेतन – 27,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.airindia.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com