Home Blog Page 178

IB Recruitment 2024 : देशाच्या गुप्तचर विभागात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी; तब्बल 226 पदे भरली जाणार

IB Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत (IB Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/टेक परीक्षा 2023 पदांच्या एकूण 226 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

संस्था – इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs)
भरले जाणारे पद – सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/टेक परीक्षा 2023
पद संख्या – 226 पदे
वय मर्यादा – 18-27 वर्षे
अर्ज फी – रु. 100/-
परीक्षा फी – रु. 100/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IB Recruitment 2024)

पद शैक्षणिक पात्रता
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/टेक परीक्षा 2023
  • Candidates must have achieved qualifying cut-off marks in GATE 2021 or 2022 or 2023 in Electronics & Communication (GATE code. EC) or Computer Science & Information Technology (GATE code: CS) along with:
  • B.E or B. Tech in the fields of: Electronics or Electronics & Tele-communication or Electronics & Communication or Electrical & Electronics or Information Technology or Computer Science or Computer Engineering or Computer Science & Engineering; from a Government recognized University/College/Institute. Or
  • Master’s Degree in Science with Electronics or Physics with Electronics or Electronics & Communication or Computer Science; or Master’s Degree in Computer Applications; from a Government recognized University/College/Institute.

मिळणारे वेतन – (IB Recruitment 2024)

पद वेतन
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/टेक परीक्षा 2023 Level-7 (Rs. 44,900-1,42,400) in the pay matrix plus admissible Central Govt. allowances.

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. इतर कोणताही मार्गाने आलेले (IB Recruitment 2024) अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : राज्याच्या ‘या’ सहकारी बँकेत मॅनेजर, ऑफिसर पदावर भरती; थेट द्या मुलाखत!!

Banking Job (22)

करिअरनामा ऑनलाईन । लोकनेते दत्ताजी पाटील (Banking Job) सहकारी बँक लि., नाशिक अंतर्गत पुढील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी दि. 16 जानेवारी 2024 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.

बँक – लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि., नाशिक
भरले जाणारे पद – डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर
पद संख्या – 08 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – बँकेच्या मुख्य कार्यालयात
मुलाखतीची तारीख – 16 जानेवारी 2024

भरतीचा तपशील – (Banking Job)

पद पद संख्या 
डेप्युटी जनरल मॅनेजर 02 पदे
मॅनेजर 03 पदे
ऑफिसर 03 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
डेप्युटी जनरल मॅनेजर किमान वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट)
मॅनेजर किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर (ग्रॅज्युएट)
ऑफिसर किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर (ग्रॅज्युएट)

 

निवड प्रक्रिया –
1. या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने दिलेल्या (Banking Job) तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.ldpbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BIS Recruitment 2024 : पदवीधारकांसाठी खुषखबर!! भारतीय मानक ब्यूरोमध्ये मिळवा दरमहा 75 हजार पगाराची नोकरी

BIS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय मानक ब्यूरोमध्ये विविध (BIS Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज पदाच्या 107 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय मानक ब्यूरो
भरले जाणारे पद – कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज
पद संख्या – 107 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (BIS Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech/PG डिप्लोमा/ MBA/ BNYS/ BUMS/ BHMS
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 जानेवारी 2024 रोजी 65 वर्षांपर्यंत

परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 75,000/- रुपये दरमहा
नोकरीचे ठिकाण – दिल्ली NCR
काही महत्वाच्या लिंक्स – (BIS Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bis.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : शिक्षण संचालनालय विभागात ‘ही’ पदे रिक्त; महिन्याला 40 हजार पगार मिळवा

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण संचालनालय, दमण येथे (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

संस्था – शिक्षण संचालनालय, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. MIS समन्वयक (UT स्तर) – 01 पद
पात्रता – संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये पदवीधर पदवी 02) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह बी.ई. (संगणक / आयटी / सीएस)
2. डेटा विश्लेषक – 01 पद
पात्रता – संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये पदवीधर पदवी 02) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किमान 55% गुणांसह बी.ई. / बी.टेक. (सीटी / सीएस)
3. MIS समन्वयक (ब्लॉक स्तर) – 01 पद
पात्रता – बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (BCA) 02) संगणक विज्ञान/आयटी मध्ये बी.एस्सी., बीबीए, बी.ई.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Notification)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Office of the State Project Director (SS) /Director of Education, Shiksha Sadan, Behind Collectorate, Moti Daman, Daman.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन –
1. MIS समन्वयक (UT स्तर) -38,000/- रुपये दरमहा
2. डेटा विश्लेषक – 40,000/-रुपये दरमहा
3. MIS समन्वयक (ब्लॉक स्तर) – 21,775/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – दमण

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.daman.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Goa Shipyard Limited Recruitment 2024 : गोवा शिपयार्ड अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; अर्जासाठी त्वरा करा 

Goa Shipyard Limited Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । गोवा शिपयार्ड लि. येथे विविध (Goa Shipyard Limited Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

संस्था – गोवा शिपयार्ड लि.
पद संख्या – 02 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. मुख्य महाव्यवस्थापक- 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – AICTE मंजूर संस्थामधून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (BE) / मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) सह मेकॅनिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/नेव्हल मधील स्पेशलायझेशन आर्किटेक्चर
2. महाव्यवस्थापक – 01 पद (Goa Shipyard Limited Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – AICTE मंजूर संस्थामधून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (BE) / मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) सह मेकॅनिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/नेव्हल मधील स्पेशलायझेशन आर्किटेक्चर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024
परीक्षा फी –
500/- रुपये
[SC/ST/PwBD/माजी सैनिक – शुल्क नाही]
मिळणारे वेतन –
1. मुख्य महाव्यवस्थापक- 1,20,000/- ते 2,80,000/- रुपये दरमहा
2. महाव्यवस्थापक – 1,00,000/- ते 2,60,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा

काही महत्वाच्या लिंक्स – (Goa Shipyard Limited Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.goashipyard.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : 8 हा अंक 8 वेळा लिहून उत्तर 1000 कसे येईल ते सांगा? मुलाखतीत चक्रावून सोडणारे प्रश्न पहा

GK Updates 31 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. (GK Updates) तुम्ही फक्त 2 वापरून 23 कसे लिहू शकता?
उत्तर: 22+2/2
प्रश्न 2. एक टेबलावर, एका प्लेटमध्ये दोन सफरचंद आहेत, 3 लोकांना ते खायचे आहेत, मग ते तिघे कसे खातील?
उत्तरः एक टेबलावर आणि प्लेटमध्ये दोन सफरचंद आहेत, म्हणजे एकूण तीन सफरचंद आहेत. तिन्ही पुरुष प्रत्येकी एक सफरचंद खातील. (GK Updates)
प्रश्न 3. तुमच्या शहरात किती ट्रैफिक लाइट्स आहेत?
उत्तरः हा प्रश्न ऐकणारे बहुतेक लोक त्यांच्या शहरातील वाहतूक सिग्नल मोजू लागतात. तर इथे ट्रॅफिक लाइट्सबद्दल प्रश्न विचारला गेला आहे, जे कुठेही गेला तरी फक्त तीन प्रकारचे लाइट्स असतात. लाल, हिरवा आणि पिवळा.

प्रश्न 4. 8 अंक 8 वेळा लिहून उत्तर 1000 येईल, कसे ते सांगा?
उत्तर: 888+88+8+8 +8= 1000
प्रश्न 5. जर वास्तविक वेळ 12:30 असेल तर अशा स्थितीत प्रतिबिंबात किती वेळ दिसेल.
उत्तर: 11:30
प्रश्न 6. असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर नेहमी बदलत असते?
उत्तर: ‘किती वाजले?’ (GK Updates)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : कधी टेम्पो चालवला.. भिकाऱ्यांसोबत रस्त्यावरही झोपले; IPS होवून प्रियसीला दिलेलं वचन पूर्ण केलं

Success Story of IPS Manoj Kumar Sharma

करिअरनामा ऑनलाईन । मनोज कुमार शर्मा यांना भेटा… ज्यांनी IPS अधिकारी (Success Story) बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व अडचणींचा सामना केला. मध्य प्रदेशातील मुरैना येथील रहिवासी असलेल्या मनोज यांना यशाच्या मार्गावर अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. ते 12वीच्या परिक्षेत नापास झाले तरीही त्यांनी आपल्या क्षमतेवरील विश्वास कधीही गमावला नाही. परिस्थितीशी झुंज देत असताना मनोज यांनी ग्वाल्हेरमध्ये टेम्पो ड्रायव्हर म्हणून काम केले. रस्त्यावर भिकाऱ्यांबरोबर झोपले. हे करत असतानाच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती; तरीही त्यांनी ध्येयाचा पाठलाग सोडला नाही.

अभ्यासात अजिबात रस नव्हता
IPS किंवा IAS म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे अतिशय हुशार, अभ्यासू व्यक्ती. आज आपण अशा एका IPSची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांना अभ्यासात अजिबात रस नव्हता. पण पहिल्यापासूनच सगळेच अभ्यासू असतात असं नाही. यापैकीच एक आहेत आयपीएस मनोज कुमार.

4वेळा दिली परीक्षा (Success Story)
यश अपयशाचा सामना करत असताना खचून न जाता मनोज यांनी यूपीएससीची चार वेळा परीक्षा दिली. पहिल्या तीन प्रयत्नात त्यांना निराशेचा सामना करावा लागला, पण चौथ्या प्रयत्नात त्यांनी विजय मिळवला. त्यांनी संपूर्ण भारतात 121वी रॅंक मिळवली. ते मुंबई पोलिसांमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत आहेत. मनोज कुमार शर्मा यांच्या सशक्त व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना इतरांकडून ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ हे टोपणनाव मिळाले आहे.

गरीब कुटुंबात जन्म; 12 वीत नापास 
बारावी नापास होण्यापासून ते आर्थिक अडचणींशी झगडत एक यशस्वी आयपीएस अधिकारी होण्यापर्यंतचा मनोज यांचा  प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. ते मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला आहे. ते नववी आणि दहावीत तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले तर बारावी बोर्डाच्या परीक्षेत ते हिंदी विषय वगळता इतर सर्व विषयांत नापास झाले होते. पण आयुष्यातील एका घटनेने त्याचे जग बदलून टाकले.

प्रियसीला दिलेलं वचन पूर्ण केलं
मनोज कुमार शर्मा 12वीत असताना एका मुलीच्या प्रेमात पडले होते. मात्र बारावीत नापास झाल्यामुळे ते त्या मुलीला प्रपोज करु शकले नाहीत. खूप विचार केल्यानंतर त्यांनी (Success Story) त्या मुलीला प्रपोज केले आणि ती तयारही झाली. प्रेयसीला प्रपोज करताना ते म्हणाले की तू हो म्हणालीस तर मी सुधारीन. त्यांनी तिला वचन दिलं की, “मी एकदिवस मोठा माणूस होऊन दाखवीन.” यांनतर त्यांनी आपल्या मैत्रिणीशी लग्नही केलं. ज्यांचं नाव आहे श्रद्धा जोशी. यूपीएससीची तयारी करत असताना श्रद्धाने मनोज यांना खूप साथ दिली. श्रद्धा देखील या परीक्षेची तयारी करत होत्या. त्या सध्या IRS अधिकारी आहेत.

वेळप्रसंगी टेम्पोही चालवला ()
मनोज कुमार शर्मा यांना आयपीएस होण्यासाठी प्रत्येक वळणावर खूप संघर्ष करावा लागला. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी टेम्पो चालकाचे कामही केले आहे. अनेक रात्री ते भिकाऱ्यांसोबत झोपले आहेत. दिल्लीतील ग्रंथालयातही त्यांनी काम केले आहे. हाग्रंथालयात नोकरी करत असताना त्यांनी गॉर्की आणि अब्राहम लिंकनपासून मुक्तिबोधापर्यंत अनेक प्रसिद्ध लेखकांची पुस्तके आणि व्यक्तिमत्त्वे वाचली. त्यानंतर त्यांना जीवनाचा अर्थ आणि उद्देश समजला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pet Exam 2024 : पुणे विद्यापीठाची ‘पेट’ परीक्षा लवकरच; ‘या’ महिन्यात द्यावा लागणार पेपर

Pet Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे (Pet Exam 2024) विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती हाती आली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात पी. एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (Ph.D Pet Exam) घेण्याच्या निर्णयास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना पी. एच.डी. प्रवेशाची संधी लवकरच मिळणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्यात आली. या बैठकीस विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र विखे-पाटील ,डॉ. देविदास वायदंडे, डी. बी. पवार, सागर वैद्य, बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.

पीएच. डी. प्रवेशाच्या जागा काही प्रमाणात कमी होणार (Pet Exam 2024)
पी. एच.डी प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमावलीनुसार पी. एच.डी.प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक तयारी सुरु होती. यापुढील काळात ज्या ठिकाणी रिसर्च सेंटर आहे, त्याच ठिकाणच्या रिसर्च गाईडला पीएच.डी.साठी विद्यार्थी घेता येणार आहेत. त्यामुळे पुढील काळात पी. एच. डी. प्रवेशाच्या जागा काही प्रमाणात कमी होणार आहेत.

यापूर्वी विद्यापीठातर्फे नोव्हेंबर 2022 मध्ये पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरानंतर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश पूर्व परीक्षा येत्या फेब्रुवारी महिना अखेरीस होण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी महिन्याच्या (Pet Exam 2024) पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात याबाबत जाहिरात प्रसिद्ध करुन विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. त्यामुळे ज्यांना पीएच.डी.साठी प्रवेश घ्यायचा आहे; त्यांनी दिलेल्या कालावधीत अर्ज करायचा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSCL Recruitment 2024 : हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड येथे ‘या’ पदावर नोकरीची संधी

HSCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड (HSCL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, उप. व्यवस्थापक, सहाय्यक. व्यवस्थापक पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

संस्था – हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड
भरले जाणारे पद – व्यवस्थापक, उप. व्यवस्थापक, सहाय्यक. व्यवस्थापक
पद संख्या – 45 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
अर्ज फी – Rs.1000/
वय मर्यादा –
व्यवस्थापक – 37 वर्षे
उप. व्यवस्थापक – 33 वर्षे
सहाय्यक. व्यवस्थापक – 30 वर्षे

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
व्यवस्थापक 16 पदे
उप. व्यवस्थापक 20 पदे
सहाय्यक. व्यवस्थापक 09 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HSCL Recruitment 2024)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक Full Time degree in Engineering
उप. व्यवस्थापक Full Time degree in Engineering
सहाय्यक. व्यवस्थापक Full Time degree in Engineering

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
व्यवस्थापक Rs. 60000-180000
उप. व्यवस्थापक Rs. 50000-160000
सहाय्यक. व्यवस्थापक Rs. 40000-140000

आवश्यक कागदपत्रे –
1. फोटो
2. स्वाक्षरी
3. जन्मतारखेचा पुरावा
4. गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्र
5. अनुभव प्रमाणपत्रे (HSCL Recruitment 2024)
6. कंपनीच्या उलाढालीचा पुरावा (वार्षिक अहवालाचा संबंधित अर्क / इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज)
7. जात प्रमाणपत्र प्रमाणपत्र/ओबीसी प्रमाणपत्र/ईडब्ल्यूएस
8. पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र
9. माजी सैनिक प्रमाणपत्र

असा करा अर्ज –
1.या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
5. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://hsclindia.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2024 : महावितरणमध्ये होतेय वायरमन/ इलेक्ट्रिशियन पदावर भरती; त्वरीत करा APPLY

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2024) लिमिटेड, अचलपूर अंतर्गत एकूण 73 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (वायरमन/ इलेक्ट्रिशियन), कोपा पासा पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 16 जानेवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अचलपूर
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वायरमन/ इलेक्ट्रिशियन), कोपा पास
पद संख्या – 73 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 16 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण – अचलपूर, जि. अमरावती
माहितीसाठी कार्यालयीन पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.क. मर्या. विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा ता.अचलपूर जि. अमरावती

भरतीचा तपशील – (Mahavitaran Recruitment 2024)

पद पद संख्या 
शिकाऊ उमेदवार (वायरमन/ इलेक्ट्रिशियन) 62 पदे
कोपा पासा 11 पदे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करायची आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Mahavitaran Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com