Home Blog Page 172

How to Become Station Master in Railway : रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर व्हायचं आहे? येथे मिळेल संपूर्ण माहिती 

How to Become Station Master in Railway

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो तरुण रेल्वेत (How to Become Station Master in Railway) नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असतात. रेल्वेतील नोकरीकडे समाजात प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न असेल, तर स्टेशन मास्टरची पोस्ट तुमच्यासाठी चांगली ठरेल. पण या पदावर नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला रेल्वेने ठरवून दिलेल्या काही पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. या भरतीसाठी घेतलेल्या चाचणी प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची निवड अंतीम केली जाते.

आज आम्ही तुमच्या सोयीसाठी स्टेशन मास्तर पदासाठी निवड होण्यासाठीच्या पात्रतेपासून ते निवडीपर्यंतची संपूर्ण माहिती येथे देत आहोत, ही माहिती तुम्हाला तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल.

अशी आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा
रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

अशी होते निवड (How to Become Station Master in Railway)
स्टेशन मास्टर पदासाठी भरती झाल्यानंतर, तुम्हाला त्यात सामील होण्यासाठी अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पहिल्या टप्प्यात संगणक चाचणी (CBT) मध्ये भाग घ्यावा लागेल. CBT परीक्षेत उमेदवारांना गणित, सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य इंग्रजी विषयांचे प्रश्न विचारले जातात.

असे असतात परीक्षेचे टप्पे 
पहिल्या टप्प्याच्या परीक्षेत विहित कटऑफ गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी मुख्य परीक्षेला बसावे लागते. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या (How to Become Station Master in Railway) उमेदवारांना शेवटी कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीस बसावे लागते. सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांची स्टेशन मास्टरच्या रिक्त जागांवर नियुक्ती केली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agniveer Recruitment : मोठी अपडेट!! ‘या’ पदांसाठी अग्निवीर भरती प्रक्रियेत झाले महत्वाचे बदल; जाणून घ्या….

Agniveer Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी अर्ज (Agniveer Recruitment) करणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी महत्वाची आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. तसेच लवकरच बंपर भरती देखील सुरु केली जाणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल.

भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. हा बदल 2024 -25 च्या भरती प्रक्रियेसाठी लागू होणार आहे. नुकतीच यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा नवा नियम लिपिक आणि स्टोअरकीपर पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी लागू असणार आहे.

कोणत्या पदासाठी बदलले नियम (Agniveer Recruitment)
विशेष म्हणजे हा नियम इतर भरती प्रक्रियेसाठी लागू नसेल. केवळ सेना लिपिक आणि स्टोअरकीपर पदांच्या भरती प्रक्रियेसाठी हा नियम असेल. यामध्ये या दोन्ही पदांसाठी उमेदवारांना टायपिंग चाचणी द्यावी लागणार आहे. अगोदरच्या नियमानुसार टायपिंग चाचणी देण्याची गरज नव्हती. मात्र आता त्या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे.

असे आहेत नवे बदल
या टायपिंग चाचणीमध्ये उमेदवाराला हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिटप्रमाणे ही चाचणी द्यायची आहे. काही सेना अधिकाऱ्यांनी याबद्दलची पुष्टी (Agniveer Recruitment) देखील केली आहे. मात्र, अजून या टायपिंग चाचणीचे मानक ठरवण्यात आले नाहीत. याबद्दलचे सुधारीत बदल लवकरच जाहीर केले जातील.
या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. सतत भरती प्रक्रियेबद्दल बदल हे केले जात आहेत. यासाठी आधी लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर भरती मेळावा आयोजित केला जाईल. टायपिंग चाचणीचा देखील यामध्ये समावेश होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! राज्यातील ‘या’ नामांकित महाविद्यालयात तुमच्यासाठी नोकरीची संधी!!

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । दत्ता मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर (Job Alert) अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. या माध्यमातून असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, क्लिनिकल इंस्ट्रक्टर पदांच्या एकूण 38 जागा भरल्या जाणार आहेत. वरील पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.

संस्था – दत्ता मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर
भरले जाणारे पद – असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, क्लिनिकल इंस्ट्रक्टर
पद संख्या – 38 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 13 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – NYSS, आत्रे लेआउट, प्रताप नगर, नागपूर
नोकरीचे ठिकाण – नागपूर

भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
असोसिएट प्रोफेसर 03
असिस्टंट प्रोफेसर 06
प्रोफेसर 03
क्लिनिकल इंस्ट्रक्टर 25

 

अशी होणार निवड –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी (Job Alert) दिलेली तारीख आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. मुलाखतीची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.
4. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणावीत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dmconursing.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICMR Recruitment 2024 : मुंबईत नोकरी!! थेट द्या मुलाखत; नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत ‘या’ पदावर भरती

ICMR Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, मुंबई (ICMR Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II या पदाच्या 5 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहावे. मुलाखत दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.

संस्था – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, मुंबई
भरले जाणारे पद – प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II
पद संख्या – 05 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 30 जानेवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण – ICMR-National Institute of Virology, Mumbai Unit Haffkine Institute Compound, Acharya Donde Marg, Parel, Mumbai – 400012 Land Mark: Opp. TATA Hospital / KEM Hospital. (ICMR Recruitment 2024)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12वी विज्ञान + डिप्लोमा (एमएलटी/डीएमएलटी/अभियांत्रिकी) + संबंधित विषय/क्षेत्रातील अनुभव
वय मर्यादा – (ICMR Recruitment 2024)
30 वर्षे
SC – 05 वर्षे सूट
OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 18,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.niv.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : त्याने रिस्क घेतली… दिवसा ऑफिस आणि रात्री केला अभ्यास; IAS होण्यासाठी सोडली मायक्रोसॉफ्टची नोकरी

UPSC Success Story of IAS Madhav Bharadwaj

करिअरनामा ऑनलाईन । IAS किंवा IPS होण्याचे आकर्षण (UPSC Success Story) असे आहे की, यासाठी तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडतात आणि UPSC मधून अधिकारी होण्यासाठी स्वतःला झोकून देतात. ज्या क्षेत्रात काहीही निश्चिती नाही; अशा ठिकाणी ते मोठी रिस्क घेताना दिसतात. माधव भारद्वाज हा तरुण यापैकीच एक आहे.

लहानपणी ठरवलं होतं इंजिनिअर व्हायचं
माधव हा उत्तराखंडमधील मसुरी येथील रहिवासी आहे. त्याने लहानपणापासून ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी’ (LBSNAA) बद्दल ऐकले आणि पाहिले होते. माधव सांगतो की, त्याचे वडील LBSNAA येथे काम करायचे. त्यामुळे या ऐतिहासिक संकुलाची त्याला लहानपणापासूनच माहिती होती. पण IAS होण्या ऐवजी इंजिनियर होण्याचे स्वप्न त्याने पाहिले आणि 12वी नंतर प्रयागराज येथील MNNIT मध्ये B.Tech Computer Science ला प्रवेश घेतला.
बी.टेक.ची पदवी घेतल्यानंतर माधवने आयआयएम अहमदाबादमधून एमबीए (MBA) केले. यानंतर त्याने मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीत उत्पादन व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळवली. 2020 मध्ये जेव्हा कोरोना महामारीने जगाला वेठीस धरले आणि लॉकडाऊन लागू झाले तेव्हा त्याला बराच काळ घरी राहून काम करावे लागले.

वर्क फ्रॉम होम करताना वाटू लागलं IAS व्हावं 
घरातून काम करत असताना माधवच्या मनात आयएएस (IAS) होण्याची इच्छा निर्माण झाली. यानंतर त्याने करिअरची दिशा बदलण्याचं ठरवलं आणि UPSC नागरी (UPSC Success Story) सेवा परीक्षेची मनापासून तयारी सुरु केली. त्याने या परीक्षेसाठी अपार मेहनत घेतली. पण परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात केवळ तीन गुण कमी पडल्यामुळे त्याची ही संधी हुकली.

अपयशाने निराश झाला नाही (UPSC Success Story)
यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात इतक्या कमी फरकाने अपयश आल्याने त्याला धक्का बसला पण तो निराश झाला नाही. निराश होण्याऐवजी त्याने आत्मविश्वास वाढवला. त्याने पुन्हा आपला मोर्चा पुढच्या परीक्षेकडे वळवला आणि अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.

दिवसा ऑफीस आणि रात्री केला अभ्यास 
माधवने UPSC साठी दुसऱ्यांदा फॉर्म भरला. यावेळी त्याने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेऱ्या सहज पूर्ण केल्या. UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये त्याने संपूर्ण भारतात 536 वी रँक मिळवली. माधव सांगतो की तो दिवसा ऑफिसची कामे करायचा आणि रात्री चार ते पाच तास परीक्षेचा अभ्यास करायचा. जेव्हा ऑफिसच्या कामाला सुट्टी असेल तेव्हा तो 10 ते 12 तास अभ्यास करायचा. एवढयावर न (UPSC Success Story) थांबता परीक्षेच्या शेवटच्या दिवसांत त्याने तब्बल 15 ते 16 तास अभ्यास केला आहे. शेवटी त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आणि त्याचे IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले. तर असा होता माधव याचा B.Tech इंजिनिअर ते भारतातील सर्वोच्च सरकारी अधिकारी पदावर पोहचण्याचा प्रवास. त्याची ही कहाणी तरुण पिढीसाठी निश्चितच आशावादी ठरेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CBSE Board Exam Time Table : 10 वी/12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; पहा महत्वाची अपडेट

CBSE Board Exam Time Table

करिअरनामा ऑनलाईन । दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (CBSE Board Exam Time Table) महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) इयत्ता दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक बोर्डाच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

CBSEने दि. ४ मार्च रोजी नियोजित केलेला इयत्ता दहावीचा तिबेटी पेपर आता २३ फेब्रुवारीला होणार आहे. तर रिटेल याविषयीचा पेपर १६ फेब्रुवारी ऐवजी आता दि. 28 फेब्रुवारी 202 रोजी होणार आहे. तसेच इयत्ता बारावीची फॅशन स्टडीज विषयाची परीक्षा दि. ११ मार्च ऐवजी दि. २१ मार्च रोजी घेतली जाईल. CBSE च्या इयत्ता दहावीच्या परीक्षा दि. १५ फेब्रुवारी ते दि. १३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहेत. तर सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा दि. १५ फेब्रुवारी ते दि. २ एप्रिल २०२४ या कालावधीत होतील. पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहेत.

असं डाउनलोड करा CBSEचे सुधारीत वेळापत्रक (CBSE Board Exam Time Table)
1. www.cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. होमपेजवर इयत्ता दहावी , बारावीच्या डेट शीट लिंकवर क्लिक करा.
3. डेटशीट स्क्रीनवर दिसेल.
4. परीक्षेचे वेळापत्रक तपासा आणि डाउनलोड करा.
5. पुढील वापरासाठी प्रिंट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : कोल्हापूर महानगरपालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; दर सोमवारी होणार मुलाखत

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिका (Job Notification) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पेडियाट्रिशियन, गायनॅकलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्य (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. उमेदवारांची मुलाखत प्रत्येक सोमवारी घेण्यात येणार आहे.

संस्था – कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर
भरले जाणारे पद – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पेडियाट्रिशियन, गायनॅकलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्य (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ
पद संख्या – 59 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टैंडींग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, कोल्हापूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – स्टैंडींग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, कोल्हापूर
मुलाखतीची तारीख – प्रत्येक सोमवारी

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
पेडियाट्रिशियन 06
गायनॅकलॉजिस्ट 04
वैद्यकीय अधिकारी 24
वैद्य (औषध) 02
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ 03
बालरोगतज्ञ 03
नेत्ररोग तज्ज्ञ 03
त्वचारोगतज्ज्ञ 05
मानसोपचारतज्ज्ञ 05
ENT विशेषज्ञ 04

 

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी  निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी (Job Notification) मुलाखतीकरिता वर दिलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर रहावे.
4. उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर रहायचे आहे.
5. प्रत्येक सोमवारी मुलाखत घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://web.kolhapurcorporation.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : 10 वी पास ते ग्रॅज्युएट असणाऱ्यांसाठी मोठी बातमी!! उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथे मिळेल नोकरीची संधी

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत विविध (Job Notification) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी, सहाय्यक. शाखा व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीची तारीख 06 जानेवारी 2024 निश्चित करण्यात आली आहे.

बँक – उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
भरली जाणारी पदे – प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी, सहाय्यक. शाखा व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक
नोकरी करण्याचे ठिकाण – यवतमाळ, अमरावती, वर्धा, सतना, रेवा, रायपूर
वय मर्यादा – 28 ते 35 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 06 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (जाहिरात पहा)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

पद शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी 10+2
क्रेडिट अधिकारी 10+2
सहाय्यक. शाखा व्यवस्थापक Graduate
शाखा व्यवस्थापक Graduate

 

अशी होईल निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीची तारीख 06 जानेवारी 2024 आहे. (Job Notification)
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.utkarsh.bank/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MGNREGA Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! NREGA अंतर्गत 100 पदावर भरती सुरु

MGNREGA Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, पालघर (MGNREGA Bharti 2024) अंतर्गत साधन व्यक्ती पदांच्या एकूण 100 पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, पालघर
भरले जाणारे पद – साधन व्यक्ती
पद संख्या – 100 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पालघर
वय मर्यादा – 18 ते 50 वर्षे (MGNREGA Bharti 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रूम न.१११, पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, यांच्या

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज – (MGNREGA Bharti 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mahaegs.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : ‘या’ विषयातील पदवीधारकांना राज्यातील नामांकित बँकेत नोकरीची संधी

Banking Job (23)

करिअरनामा ऑनलाईन । पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप बँक, अमरावती (Banking Job) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य व्यवस्थापक (I.T. and Compliance) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

बँक – पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप बँक, अमरावती
भरले जाणारे पद – मुख्य व्यवस्थापक (I.T. and Compliance)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरात पहा
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)

पद शैक्षणिक पात्रता
मुख्य व्यवस्थापक (I.T. and Compliance)
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.ई. (कॉम्प्युटर सायन्स) / बी.ई. (आय.टी.)/ बी.ई. (ईलेक्ट्रॉनिक्स् ) / एम.एस.सी. (कॉम्प्युटर सायन्स) / एम.सी.ए. पदवी.
  • संगणक क्षेत्रातील कामकाजाचा किमान 5 वर्षांचा अनुभव.
  • बँकींग क्षेत्रातील कामकाजाच्या अनुभवास प्राधान्य देण्यात येईल.

असा करा अर्ज –
1. भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जा सोबत आवश्यक (Banking Job) कागदपतत्राची प्रत जोडवी.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://pducbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com