Job Notification : कोल्हापूर महानगरपालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; दर सोमवारी होणार मुलाखत

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिका (Job Notification) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पेडियाट्रिशियन, गायनॅकलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्य (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. उमेदवारांची मुलाखत प्रत्येक सोमवारी घेण्यात येणार आहे.

संस्था – कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर
भरले जाणारे पद – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पेडियाट्रिशियन, गायनॅकलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्य (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ
पद संख्या – 59 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टैंडींग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, कोल्हापूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – स्टैंडींग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, कोल्हापूर
मुलाखतीची तारीख – प्रत्येक सोमवारी

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
पेडियाट्रिशियन 06
गायनॅकलॉजिस्ट 04
वैद्यकीय अधिकारी 24
वैद्य (औषध) 02
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ 03
बालरोगतज्ञ 03
नेत्ररोग तज्ज्ञ 03
त्वचारोगतज्ज्ञ 05
मानसोपचारतज्ज्ञ 05
ENT विशेषज्ञ 04

 

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी  निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी (Job Notification) मुलाखतीकरिता वर दिलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर रहावे.
4. उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर रहायचे आहे.
5. प्रत्येक सोमवारी मुलाखत घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://web.kolhapurcorporation.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com