Home Blog Page 170

Layoff : एका नोटीसीनं हालवून सोडलं; एका नामवंत IT कंपनीतून कर्मचाऱ्यांना मिळतोय डच्चू; कारण?

Layoff (3)

करिअरनामा ऑनलाईन । नवीन वर्षात जागतिक आर्थिक मंदीच्या (Layoff) झळा नोकरदार वर्गाला बसत असून, अनेकांना या वर्षातही नोकरीला मुकावं लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीला सुरुवातही झाली आहे. अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या फरकानं कमी करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये आता Google सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या कामाचं स्वरुप बदललं तर, अनेकांच्या पगारावरही परिणाम झाला. काही कंपन्यांनी मानवी योगदानाला कमी महत्त्व देत Automatic पद्धतीनं होणाऱ्या कामाला प्राधान्य दिलं. परिणामी कंपनीने कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचं सत्र सुरु झालं. 2022 आणि 2023 मध्ये जगभरातून अनेक मोठ्या कंपन्यांनी टप्या टप्याने कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली.

कोणत्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार?
हार्डवेअर डिव्हिजनमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार (Layoff) असल्याचे संकेत गुगलने दिले आहेत. यामध्ये डिजिटल असिस्टंट आणि इंजिनिअरिंग टीम्सचा समावेश आहे. व्हॉईस बेस्ड गुगल असिस्टंड आणि रिअॅलिटी हार्डवेअर टीमवर ही नोकरकपात परिणाम करणार आहे. त्याशिवाय कंपनीच्या मध्यवर्ती इंजिनिअरिंग टीममध्ये काम करणाऱ्या इंजिनिअर्सवरही याचा परिणाम होणार आहे.
‘DSPA मधील शेकडो पदं आणि 1P AR Hardware team मधील शेकडो पदांवर येत्या काळात फरक पडणार आहे. सध्या कंपनीकडून 1P AR Hardware team मध्ये काही बदल केले जात असून, गुगल येत्या काळात AR initiatives वर जास्त भर देणार आहे. ज्यामध्ये प्रोडक्ट आणि प्रोडक्ट पार्टनरशिपचा समावेश असेल’, असं कंपनीच्या पत्रकामध्ये म्हटलं गेलं आहे.

गुगलवर ही वेळ का आली?
मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI यांच्याकडून सध्या गुगलला आर्टिफिशिअर इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये टक्कर दिली जात आहे. सध्या या दोन्ही कंपन्या ChatGPT आणि Co-Pilot या सेवांना आणि इतर एआय (AI) सुविधांना सर्व स्तरावर प्रसिद्धीझोतात आणत असून, गुगलच्या main search business वर याचा थेट आणि विपरित परिणाम होताना दिसत आहे. परिणामी संस्थेतील वरिष्ठ पदावर असणारी मंडळी सध्या उत्पादन शुल्क कमी करून हे अर्थसहाय्य कंपनीच्या ध्येय्यप्राप्तीकडे वळवण्याच्या दृष्टीनं कामं करत आहेत.

किती कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार?
Fitbit चे सहसंस्थापक जेम्स पार्क, एरिक फेडमन आणि इतर (Layoff) महत्त्वाच्या व्यक्ती कंपनीतून बाहेर पडल्यानंतर या नोकरकपातीनं डोकं वर काढलं आहे. ज्यानंतर गुगलनं पिक्सल, नेस्ट आणि फिटबिट हार्डवेअरवर काम करणाऱ्या टीमची नव्यानं बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा या नोकरकपातीच्या लाटेमध्ये आता नेमके किती कर्मचारी बळी पडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Bank of India Recruitment 2024 : 10वी पाससाठी आनंदाची बातमी!! सेंट्रल बँकेत 484 पदांवर भरती; ही संधी सोडू नका

Central Bank of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank of India Recruitment 2024) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या माध्यमातून 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीअंतर्गत सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ पदाच्या 484 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

बँक – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ (SAFAI KARMACHARI CUM SUB-STAFF)
पद संख्या – 484 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –09 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय उमेदवाराकडे स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे
2. SC/ST: 05 वर्षे सूट (Central Bank of India Recruitment 2024)
3. OBC : 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/ 850/-
2. SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-
मिळणारे वेतन – 28,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (Central Bank of India Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://centralbankofindia.co.in/en
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CIDCO Recruitment 2024 : मुंबईत नोकरी; CIDCO अंतर्गत लेखा लिपिक पदावर भरती सुरु

CIDCO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । शहर व औद्योगिक विकास (CIDCO Recruitment 2024) महामंडळ, महाराष्ट्र मर्यादितमध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लेखा लिपिक पदाच्या 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

संस्था – शहर व औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र
भरले जाणारे पद – लेखा लिपिक
पद संख्या – 23 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
बी.कॉम/बीबीए/बीएमएस सह अकाऊंटन्सी / फायनान्शियल व्यवस्थापन/ खर्च लेखा/ मॅनेजमेंट अकाउंटिंग/ऑडिटिंग
वय मर्यादा – (CIDCO Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 मार्च 2023 रोजी 40 वर्षापर्यंत
2. मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आर्थिकदृष्टया दुर्बल घटक – 05 वर्षे सूट
3. दिव्यांग – 07 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. राखीव प्रवर्गासाठी – 900+ जीएसटी
2. खुला प्रवर्ग – 1000+जीएसटी 182
3. मिळणारे वेतन – 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई (महाराष्ट्र)

असे आहेत निवडीचे निकष –
1. गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
2. विहित अर्हता/अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल. (CIDCO Recruitment 2024)
3. एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दि. 02.12.2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cidco.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Old Pension Scheme : शिक्षकांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा 

Old Pension Scheme

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक आणि शिक्षकेतर (Old Pension Scheme) कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याबाबत राज्य सरकारने सांगितलं. शैक्षणिक संस्थेला 2005 नंतर अनुदान प्राप्त झाले पण तशा संस्थांमध्ये 2005 पूर्वीच भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र प्रश्न निर्माण झाला होता. निर्णयाचे श्रेय राज्य सरकारला घ्यायचं आहे की आम्ही घेऊ, असा प्रश्न विचारून न्यायाधीशांनी थेट संकेत दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील जवळपास 25,000 कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच याबाबत राज्य सरकारदेखील सकारात्मक असल्याचं चित्र आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना योजना लागू होणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दि. 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा (Old Pension Scheme) पर्याय देण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांना ‘हे’ करावं लागणार (Old Pension Scheme)
जुनी निवृत्तीवेतन आणि अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा. हा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे पत्रक संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत द्यायचे आहे. तसेच संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे खाते तात्काळ बंद केले जातील.

जे अधिकारी आणि कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन (Old Pension Scheme) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन खात्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल. जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन खात्यातील (NPS) राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : NCERTची पुस्तके वाचून केला अभ्यास; सौम्या पहिल्याच प्रयत्नात बनली IAS

IAS Success Story of Saumya Pandey

करिअरनामा ऑनलाईन । यशस्वी महिला IAS अधिकाऱ्यांपैकी एक (IAS Success Story) म्हणजे सौम्या पांडे. ती 2017 च्या बॅचची एक तरुण IAS अधिकारी आहे, जी मूळची उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील आहे. तिने फार कमी वेळात मोठे यश मिळवले आहे. सौम्याचा आयएएस होण्याचा प्रवास यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप प्रेरणादायी आहे तोच आज आपण जाणून घेणार आहोत.
UPSC परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना खूप मेहनत घ्यावी लागते. दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेची तयारी करतात. परंतु त्यापैकी मोजकेच विद्यार्थी परीक्षेत यश मिळवू शकतात. त्यापैकीच एक आहे

अनेक आव्हाने पेलत झाली IAS; देशात आली चौथी
सौम्या पांडेच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर तिने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगलोर येथून मास्टर इन पब्लिक पॉलिसीचे शिक्षण घेतले. सौम्या पांडेचा आयएएस अधिकारी होण्याचा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेक आव्हाने आणि अडचणींवर मात करावी लागली. अखेर तिची जिद्द आणि मेहनत फळाला आली. सौम्या 2016 च्या बॅचची IAS अधिकारी आहे, तिने या परीक्षेत संपूर्ण भारतात चौथा क्रमांक मिळवला आहे.

ठरली ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’
सौम्या पांडेच्या कामाचे अनेकांनी कौतुक केले आहे. 2020 मध्ये तिला शासन आणि सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील अपवादात्मक कार्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौम्या पांडेने मिळवलेले यश;  असा संदेश देते की, कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समर्पणाने कोणीही आपले ध्येय साध्य करू शकतो आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतो.

NCERTची पुस्तके वाचा (IAS Success Story)
सौम्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोलाचा सल्ला दिला आहे. त्या सांगतात प्राथमिक परीक्षेची तयारी मूलभूत गोष्टींपासूनच सुरु करा. UPSC देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने अभ्यास करताना NCERTची पुस्तके वाचावीत. ही पुस्तके अभ्यासासाठी सर्वोत्तम  पर्याय आहेत; असं ती सांगते.

समाजासाठी दिलं योगदान
IAS अधिकारी म्हणून पहिल्या पोस्टिंगमध्ये, सौम्या पांडे यांची उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. आपल्या कार्यकाळात त्यांनी (IAS Success Story) अनेक विकास प्रकल्प राबविण्यावर भर दिला. जसे की परिसरातील शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारणे इ. त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या, विशेषतः महिला आणि मुलांच्या कल्याणासाठीही काम केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Study Tips : स्कूल बोर्ड ते UPSC…असा करा अभ्यास; पहा महत्वाच्या टिप्स

Study Tips (3)

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी (UPSC) आणि सीबीएसई (CBSE) बोर्डांसह (Study Tips) सर्व राज्यातील बोर्डांच्या परीक्षा जवळ येत आहेत. फेब्रुवारीपासून परीक्षांचा हंगाम सुरु होत आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी अपार मेहनत घेत आहेत.  तुमच्या मेहनतीला फळ मिळावं यासाठी आम्‍ही तुम्‍हाला काही टिप्स सांगणार आहोत, जे तुमच्‍या अभ्यासाच्या तयारीसाठी तुम्‍हाला निश्चित मदत करु शकतात.

1. बुलेट पॉइंट्सचा वापर करा
जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपण खूप पुस्तके वाचतो. एवढा सगळा अभ्यास लक्षात ठेवणं कठीण होतं. उजळणी करताना जास्त अभ्यास करावा लागू नये  यासाठी तुम्ही वाचलेल्या संकल्पना हायलाइट करा आणि ही माहिती बुलेट पॉइंटमध्ये ठेवा.
2. कीवर्ड हायलाइट करा (Study Tips)
केलेल्या अभ्यासाची उजळणी करताना तुमचा वेळ वाचवण्यासाठी ही युक्ती उपयोगी ठरू शकते. उजळणी अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण नियम आणि संकल्पनांवर जोर द्या. असे मुद्दे वेळोवेळी हायलाइट करुन ठेवा.

3. कलर कोडिंग
माहिती स्पष्टपणे विभक्त करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या रंगामध्ये विभागणी करा.
4. सक्रिय वाचन महत्वाचे
वाचन करत असताना स्वतःच्या शब्दात सारांश तयार करा आणि विषय तोंडपाठ करण्यापेक्षा मुद्दा समजून घेवून वचन करण्याकडे (Study Tips) लक्ष द्या.
5. नियमितपणे उजळणी करा
अभ्यास पक्का करण्यासाठी आणि दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या टाईम टेबळमध्ये उजळणी करण्याला वेळ द्या.

6. डिजिटल किंवा भौतिक संसाधने
कोणतेही दडपण घेवू नका. जेव्हा तुम्ही (Study Tips) अभ्यास करता तेव्हा आरामात अभ्यास करा, दबावाखाली राहू नका. अभ्यास सुरू करण्यापूर्वी स्वत:ला 5 मिनिटे द्या आणि (Study Tips) स्वत:ला अभ्यासासाठी तयार करा. तुमच्या पसंतीनुसार डिजिटल टूल्स किंवा पारंपारिक नोटबुक यापैकी एक निवडा, उत्तम रिझल्ट मिळावा यासाठी अभ्यासात सातत्य ठेवा.
कधी होणार परीक्षा?
UPSC CSE प्रिलिम्स परीक्षा दि. 26 मे 2024  रोजी होणार आहे, तर CBSE बोर्डाच्या परीक्षा दि. 15 फेब्रुवारी ते दि. 2 एप्रिल 2024 या कालावधीत होणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET Result 2024 : UGC NET चा निकाल पुढे ढकलला; ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल

UGC NET Result 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात (UGC NET Result 2024) आलेल्या नेट परीक्षेचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. चेन्नई व आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी लागत असल्याने आता श्रव निकाल दि. 17 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक एनटीएने प्रसिद्ध केले आहे.

एनटीएतर्फे (NTA) देशभरातील 292 शहरांमध्ये 6 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत नेट (NET) परीक्षा घेण्यात आली. 9 लाख 45 हजार 918 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. एनटीए तर्फे 10 जानेवारी रोजी नेट परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. परंतु काही (UGC NET Result 2024) कारणास्तव निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मिचौंग वादळामुळे चेन्नई व आंध्र प्रदेशातील उमेदवारांना या परीक्षा देता आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. परिणामी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यानंतर नेट परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे, असे एनटीएतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : 10 रुपयांचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो? मुलाखतीत विचारले जातात असे प्रश्न

GK Updates 10 Jan.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते आहे?
उत्तर :  भारतातील श्रीमंत राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
प्रश्न 2 – फुलपाखरांमध्ये इतके रंगाचे नमुने कुठून येतात?
उत्तर – (GK Updates) फुलपाखरे त्यांच्या पंखांच्या रंगीबेरंगी नमुन्यांमुळे सर्वांना आकर्षित करतात. फुलपाखरांच्या पंखांमध्ये असे आकर्षक नमुने तयार होण्याचे मुख्य कारण म्हणजे रंगद्रव्य, जे सामान्य रंगासाठी जबाबदार असते. या फुलपाखरांचा रंग बदलत नाही, नियमित रंग राखतो.

प्रश्न 3 – भारतातील कोणते राज्य इस्रायलच्या बरोबरीचे आहे?
उत्तर – भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक मिझोराम हे इस्रायलच्या बरोबरीचे आहे. इस्रायलचे क्षेत्रफळ केवळ २१,९३७ चौरस किलोमीटर आहे आणि मिझोरामचे क्षेत्रफळ २१,०८१ चौरस किलोमीटर आहे.
प्रश्न 4 – कोणत्या देशात समोसे खाण्यावर बंदी आहे?
उत्तर – सोमालियामध्ये समोसा खाण्यास बंदी आहे. तिथे हा पदार्थ ख्रिश्चन धर्माचे प्रतीक मानला जातो.

प्रश्न 5 – 10 रुपयांचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो?
उत्तर – 10 रुपयांचे नाणे बनवण्यासाठी 3 रुपये खर्च येतो.
प्रश्न 6 – पृथ्वीवरील सर्वात खोल (GK Updates) समुद्राच्या खंदकाचे नाव सांगा?
उत्तर – पृथ्वीवरील सर्वात खोल महासागर खंदकाचे नाव मारियाना ट्रेंच आहे.
प्रश्न 7 – भारतातील कोणते राज्य कधीही इंग्रजांचे गुलाम झाले नाही?
उत्तर – गोवा हे एकमेव राज्य आहे जे कधीही इंग्रजांचे गुलाम नव्हते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्याच्या ‘या’ जिल्हा परिषदेत नोकरीची संधी; पटापट करा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, परभणी अंतर्गत ‘विधिज्ञ’ पदाच्या (Job Alert) रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, परभणी
भरले जाणारे पद – विधिज्ञ (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – परभणी

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करा.
3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://zpparbhani.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : B.Comची पदवी घेतली असेल तर ‘इथे’ आहे नोकरीची संधी!! थेट द्या मुलाखत

Job Notification

job in puneकरिअरनामा ऑनलाईन । अजित नागरी सहकारी (Job Notification) पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मार्केटींग ऑफीसर, शाखा व्यवस्थापक, उपशाखा व्यवस्थापक, क्लार्क / कॅशिअर पदांच्या एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 आणि 13 जानेवारी 2024 आहे.

संस्था – अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे
भरले जाणारे पद – मार्केटींग ऑफीसर, शाखा व्यवस्थापक, उपशाखा व्यवस्थापक, क्लार्क / कॅशिअर
पद संख्या – 30 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यालय, हाडको रोड, पालखी तळाजवळ, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे
मुलाखतीची तारीख – 12 आणि 13 जानेवारी 2024

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
मार्केटींग ऑफीसर 05 पदे
शाखा व्यवस्थापक 10 पदे
उपशाखा व्यवस्थापक 10 पदे
क्लार्क / कॅशिअर 05 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
मार्केटींग ऑफीसर बी. कॉम
शाखा व्यवस्थापक बी. कॉम
उपशाखा व्यवस्थापक बी. कॉम
क्लार्क / कॅशिअर बी. कॉम

 

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी (Job Notification) दिलेली तारीख आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. मुलाखतीची तारीख 12 आणि 13 जानेवारी 2024 आहे.
4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता स्व खर्चाने हजर राहावे.
5. मुलाखतीला येण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://ajitgroup.in/ajitnagari/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com