IAS Success Story : NCERTची पुस्तके वाचून केला अभ्यास; सौम्या पहिल्याच प्रयत्नात बनली IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । यशस्वी महिला IAS अधिकाऱ्यांपैकी एक (IAS Success Story) म्हणजे सौम्या पांडे. ती 2017 च्या बॅचची एक तरुण IAS अधिकारी आहे, जी मूळची उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील आहे. तिने फार कमी वेळात मोठे यश मिळवले आहे. सौम्याचा आयएएस होण्याचा प्रवास यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप प्रेरणादायी आहे तोच आज आपण जाणून घेणार आहोत.
UPSC परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना खूप मेहनत घ्यावी लागते. दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेची तयारी करतात. परंतु त्यापैकी मोजकेच विद्यार्थी परीक्षेत यश मिळवू शकतात. त्यापैकीच एक आहे

अनेक आव्हाने पेलत झाली IAS; देशात आली चौथी
सौम्या पांडेच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर तिने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगलोर येथून मास्टर इन पब्लिक पॉलिसीचे शिक्षण घेतले. सौम्या पांडेचा आयएएस अधिकारी होण्याचा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेक आव्हाने आणि अडचणींवर मात करावी लागली. अखेर तिची जिद्द आणि मेहनत फळाला आली. सौम्या 2016 च्या बॅचची IAS अधिकारी आहे, तिने या परीक्षेत संपूर्ण भारतात चौथा क्रमांक मिळवला आहे.

ठरली ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’
सौम्या पांडेच्या कामाचे अनेकांनी कौतुक केले आहे. 2020 मध्ये तिला शासन आणि सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील अपवादात्मक कार्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौम्या पांडेने मिळवलेले यश;  असा संदेश देते की, कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समर्पणाने कोणीही आपले ध्येय साध्य करू शकतो आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतो.

NCERTची पुस्तके वाचा (IAS Success Story)
सौम्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोलाचा सल्ला दिला आहे. त्या सांगतात प्राथमिक परीक्षेची तयारी मूलभूत गोष्टींपासूनच सुरु करा. UPSC देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने अभ्यास करताना NCERTची पुस्तके वाचावीत. ही पुस्तके अभ्यासासाठी सर्वोत्तम  पर्याय आहेत; असं ती सांगते.

समाजासाठी दिलं योगदान
IAS अधिकारी म्हणून पहिल्या पोस्टिंगमध्ये, सौम्या पांडे यांची उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. आपल्या कार्यकाळात त्यांनी (IAS Success Story) अनेक विकास प्रकल्प राबविण्यावर भर दिला. जसे की परिसरातील शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारणे इ. त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या, विशेषतः महिला आणि मुलांच्या कल्याणासाठीही काम केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com