Home Blog Page 162

Home Guard Recruitment 2024 : 12वी पास उमेदवारांना नोकरीची लॉटरी; होमगार्डची होणार तब्बल 10,285 पदांवर मेगाभरती

Home Guard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Home Guard Recruitment 2024) असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. होम गार्ड महानिर्देशक अंतर्गत होमगार्ड पदांच्या तब्बल 10,285 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – होम गार्ड महानिर्देशक
भरले जाणारे पद – होमगार्ड
पद संख्या – 10,285 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – 20 ते 45 वर्षे
अर्ज फी – ₹100/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12th Pass (Senior Secondary) /(for Ex-Servicemen/Ex-CAPF Personnel:- 10th Pass
आवश्यक कागदपत्रे –
1. वैध पासपोर्ट (Home Guard Recruitment 2024)
2. निवडणूक आयोगाचे फोटो मतदान ओळखपत्र.
3. स्वतःचे नाव आणि छायाचित्र असलेले वर्तमान आणि वैध शिधापत्रिका. शिधापत्रिका नसल्यास उमेदवाराचा फोटो, त्याला दुसर्‍या ओळखीचा पुरावा बेअरिंगद्वारे अर्जदाराचे छायाचित्र समर्थित करणे आवश्यक आहे.
4. वाहतूक विभाग GNCT दिल्ली द्वारे जारी केलेला वैध ड्रायव्हिंग परवाना.
5. सार्वजनिक क्षेत्रातील बँक खात्याचे रहिवासी असलेले छायाचित्र असलेले प्रमाणित पासबुक
6. महसूल विभागाच्या सक्षम/अधिकृत सरकारी प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र

असा करा अर्ज – (Home Guard Recruitment 2024)
1. होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://dghgenrollment.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Republic Day GK Updates : तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी किती माहिती आहे? हे प्रश्न तुमच्या ज्ञानात भर घालतील

Republic Day GK Updates

करिअरनामा ऑनलाईन । 26 जानेवारी 2024 रोजी देश (Republic Day GK Updates) आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रजासत्ताक दिनाला ऐतिहासिक महत्त्व आहे. राजधानी नवी दिल्लीतील ऐतिहासिक कर्तव्य पदयात्रेवर भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा होतो. प्रजासत्ताक दिनी होणारी परेड ही भारताची व्याख्या करणाऱ्या विविधतेतील एकतेचा पुरावा आहे.
प्रजासत्ताक दिनाविषयी तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी काही प्रश्न आणि त्याची उत्तरे येथे दिली आहेत. यूपीएससी, एसएससी आणि इतर अनेक परीक्षांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रजासत्ताक दिनी महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. आज आपण असेच काही निवडक प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत.

1. भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली?
A) 15 ऑगस्ट 1947
B) 26 नोव्हेंबर 1949
C) 26 जानेवारी 1950
D) 2 ऑक्टोबर 1952
उत्तर: C) 26 जनवरी 1950
2. भारतीय राज्यघटनेने काय बदलले?
A) भारत सरकार कायदा 1935
B) भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947
C) नेहरू अहवाल 1928
D) सायमन कमिशन अहवाल 1930
उत्तर: A) भारत सरकार कायदा 1935

3. कोणत्या घटनेमुळे भारत ब्रिटिश राजवटीपासून वेगळे प्रजासत्ताक बनला?
A) स्वातंत्र्यदिन
B) दांडी मार्च (Republic Day GK Updates)
C) भारतीय स्वातंत्र्याची घोषणा
D) भारत छोडो आंदोलन
उत्तरः A) भारतीय स्वातंत्र्याची घोषणा
4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या तारखेला भारतीय स्वातंत्र्य घोषित केले?
A) 15 ऑगस्ट 1947
B) 26 जानेवारी 1950
C) 26 जानेवारी 1930 (Republic Day GK Updates)
D) 2 ऑक्टोबर 1942
उत्तर: C) 26 जानेवारी 1930

5. भारतीय संविधान सभेने राज्यघटना कधी स्वीकारली?
A) 15 ऑगस्ट 1947
B) 26 नोव्हेंबर 1949
C) 26 जानेवारी 1950
D) 2 ऑक्टोबर 1942
उत्तर: B) 26 नोव्हेंबर 1949
6. भारताच्या राज्यघटनेने कोणत्या शासकीय दस्तऐवजाची जागा घेतली?
A) सायमन कमिशन रिपोर्ट 1930
B) नेहरू रिपोर्ट 1928
C) भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947
D) भारत सरकार कायदा 1935
उत्तर: D) भारत सरकार कायदा 1935

7. २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून का निवडला गेला?
A) स्वातंत्र्य दिन
B) गांधी जयंती
C) भारतीय स्वातंत्र्याची घोषणा
D) दांडी मार्च
उत्तर: C) भारतीय स्वातंत्र्याची घोषणा
8. कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारताचे दोन स्वतंत्र वसाहतींमध्ये विभाजन केले?
A) भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947
B) भारत सरकार कायदा 1935
C) सायमन कमिशन कायदा 1927
D) नेहरू अहवाल कायदा 1928
उत्तर: A) भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947

9. डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र कोणते पुस्तक आहे?
A) Waiting for a Visa
B) माझे सत्याचे प्रयोग
C) भारताचा शोध
D) भारताने स्वातंत्र्य जिंकले
उत्तर- A) Waiting for a Visa (Republic Day GK Updates)
10. 1950 मध्ये भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिले प्रमुख पाहुणे कोण होते?
A) राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह
B) राजा जिग्मे दोरजी वांगचुक
C) इंडोनेशिया के राष्ट्रपति सुकर्णो
D) राजा नोरोडोम सिहानौक
उत्तर- C) इंडोनेशिया के राष्ट्रपती सुकर्णो
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Army Success Story : जय हो!! साताऱ्याच्या लेकीने मान वाढवला…आर्मीत पहिल्या महिला कर्नल बनल्या धनश्री सावंत

Army Success Story of Dhanashree Sawant

करिअरनामा ऑनलाईन । महिला सर्व क्षेत्रात आपली (Army Success Story) छाप उमटवत आहेत. आपला देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना सातारच्या तरुणीने देशाच्या संरक्षण दलातील बहुमान आपल्या नावावर कोरला आहे. भारतीय संरक्षण दलामध्ये सातारा जिल्ह्यातून पहिल्या महिला कर्नल होण्याचा बहुमान सातारच्या धनश्री देविकीरण सावंत-जगताप यांनी मिळवला आहे. नुकतीच त्यांची कर्नलपदी पदोन्नती झाली आहे. त्या सध्या दिल्लीत कार्यरत आहेत.

बालपण अन् उच्च शिक्षणही साताऱ्यात
धनाश्री यांचा जन्म लिंब (ता. सातारा) येथे झाला. त्यांचे नर्सरी ते 10वीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील सातारा इंग्लिश मीडियम स्कूल येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण लाल बहादूर शास्त्री कॉलेजमध्ये झाले. त्यांनी सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली आहे.

आर्मीतील सेवेची 22 वर्षे
धनश्री सावंत यांनी आपल्या सेवेची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. भारतीय संरक्षण दलात 2002 मध्ये त्यांची निवड झाली.  त्यानंतर त्यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमधून (Army Success Story) यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अरुणाचल, तेजपूर, बारामुल्ला, उरी, श्रीनगर, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, दिल्ली अशा विविध ठिकाणी उत्कृष्टरीत्या कामगिरी बजावली.

वरिष्ठांनी घेतली उत्कृष्ट कामगिरीची दखल (Army Success Story)
भारतीय लष्करासाठी लागणाऱ्या इमारती, विविध प्रकारची बांधकामे, दुरुस्त्या, रस्ते, पूल व संरक्षण दलांतर्गत भूसेना, नौसेना, वायुसेनेसाठी आवश्यक कर्तव्य त्या करत असताना त्यांच्या एकूणच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच त्यांना कर्नलपदी पदोन्नती दिली आहे.

असं आहे धनश्री यांचं कुटुंब
धनाश्री यांचे वडील संपतराव लक्ष्मण सावंत हे अभियंता आहेत; तर त्यांच्या आई सौ. ज्योत्सना सावंत या गृहिणी आहेत. धनश्री यांना घरातून देशसेवेचं बाळकडू मिळालं आहे. त्यांची मोठी बहीण भाग्यश्री सावंत या भारतीय नौदलातून कमांडरपदावरून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत तर धनश्री (Army Success Story) यांचे पती देविकीरण जगताप (भरतगाववाडी) हे नौदलात कॅप्टनपदी कार्यरत आहेत. धनश्री यांची दुसरी बहिण ॲड. राजश्री सावंत या साताऱ्यात वकिली करत आहेत, तर बंधू श्रीनिवास हे मल्टी नॅशनल कंपनीत उच्च पदावर अधिकारी आहेत. भारतीय संरक्षण दलाच्या नेव्ही आणि आर्मीमध्ये महिला अधिकारी होण्याचा आगळा वेगळा बहुमान कर्नल धनश्री सावंत व भाग्यश्री सावंत या दोन्ही सख्या बहिणींनी मिळवला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. धनश्री यांच्या संपूर्ण वाटचालीत त्यांना त्यांच्या आई-वडिलांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. त्या भारतीय आर्मीमध्ये कर्नल झाल्यानंतर आई-वडिलांच्या कष्टाचं चीज झालं; असल्याची त्यांची भावना आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Abroad Scholarship for Indian Students : अमेरिकेत शिक्षण घ्यायचंय?? ‘या’ स्कॉलरशिप करतील तुमच्या फीचा खर्च

Abroad Scholarship for Indian Students

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात जावून उच्च शिक्षण (Abroad Scholarship for Indian Students) घेण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जातात. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये 13 लाखांहून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या 79 देशांमध्ये शिक्षणासाठी गेले होते. भारतीय विद्यार्थी ज्या देशांमध्ये अभ्यासासाठी सर्वाधिक पसंती देतात त्या यादीत युनायटेड किंगडम, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, यूएई आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे. जेव्हा विद्यार्थी परदेशात शिकण्याचा विचार करतात तेव्हा त्यांच्या समोर पैशाचा मोठा प्रश्न उभा राहतो. आजकाल अनेक देशांच्या सरकार कडून परदेशी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिकण्यासाठी कोणत्या शिष्यवृत्ती आणि फेलोशिप मिळू शकतात याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. इनलाक्स शिवदासानी फाउंडेशन स्कॉलरशिप
ही शिष्यवृत्ती सामाजिक विज्ञान, मानविकी, कायदा, ललित कला, आर्किटेक्चर या विषयांचा अभ्यास करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.
2. AAUW इंटरनेशनल स्कॉलरशिप (महिलांसाठी)
ही शिष्यवृत्ती अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी वुमन द्वारे प्रदान केली जाते. यासाठी अमेरिकेत पूर्णवेळ पदवी किंवा पोस्ट डॉक्टरेट पदवी पूर्ण केलेल्या महिला अर्ज करू शकतात.

3. फुल ब्राइट फॉरेन स्टुडंट प्रोग्राम
हा सरकारी अनुदानित उपक्रम आहे. ही शिष्यवृत्ती (Abroad Scholarship for Indian Students) आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थी, तरुण व्यावसायिक आणि कलाकारांना युनायटेड स्टेट्समध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ अभ्यास करण्यासाठी दिली जाते.
4. ह्यूबर्ट हम्फ्री फेलोशिप
ह्युबर्ट हम्फ्रे फेलोशिप ही आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांसाठी दिली जाते. ही नॉन-डिग्री शिष्यवृत्ती यूएस मध्ये 10 महिन्यांच्या शैक्षणिक अभ्यासाला समर्थन देते. या अंतर्गत अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये अभ्यास करता येतो.

5. टाटा स्कॉलरशिप फॉर कॉर्नेल यूनिवर्सिटी
ही शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत कॉर्नेल विद्यापीठात शिकणाऱ्या २० भारतीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण शुल्क आणि वार्षिक अभ्यासक्रम शुल्क समाविष्ट आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSC SSC Board Exam : पोरं खुश्श!! आता बोर्डाच्या परीक्षेत मिळणार दहा मिनिटे जादा; पहा परीक्षेची सुधारीत वेळ

HSC SSC Board Exam (2)

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी ची परीक्षा देणाऱ्या (HSC SSC Board Exam) विद्यार्थ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी दहा मिनिटाचा जादा वेळ मिळणार आहे.
राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वाटप विद्यार्थ्यांना यापूर्वी करण्यात येत होते. दरम्यान, दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालकांसह आणि समाज घटकांचेही या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा, यांसारख्या घटना काही अंशी घडत असल्याचे निदर्शनास आले.

रद्द करण्यात आलेली सुविधा पुन्हा सुरु होणार
परीक्षेदरम्यान घडणाऱ्या अपरिहार्य घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या दिलेल्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती. परंतु (HSC SSC Board Exam) विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालक-विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षेच्या वेळेनंतरची दहा मिनिटे वाढवून देण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर रहावे
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये सकाळच्या सत्रात 11 वाजता, तर दुपारच्या सत्रात 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रास 10:30 वाजता, तसेच दुपारच्या सत्रात 2:30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे; असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

परीक्षेची सुधारीत वेळ पहा – (HSC SSC Board Exam)
-परीक्षेची सध्याची वेळ – परीक्षेची सुधारित वेळ

1.सकाळी ११ ते दुपारी २ — सकाळी ११ ते दुपारी २.१०
2. सकाळी ११ ते दुपारी १ — सकाळी ११ ते दुपारी १.१०
3. सकाळी ११ ते दुपारी १.३० — सकाळी ११ ते दुपारी १.४०
4. दुपारी ३ ते सायंकाळी ६ — दुपारी ३ ते सायंकाळी ६.१०
5. दुपारी ३ ते सायंकाळी ५ — दुपारी ३ ते सायंकाळी ५.१०
6. दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० — दुपारी ३ ते सायंकाळी ५.४०
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : कोरडी भाकरी खाऊन दिवस काढणाऱ्या कुटुंबातील मुलगा जिद्दीने झाला IAS

UPSC Success Story of IAS Govind Jaiswal

करिअरनामा ऑनलाईन । आई-वडील आपल्या मुलांचे भवितव्य (UPSC Success Story) घडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट उपसायला तयार असतात. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका सामान्य रिक्षाचालकाने आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करुन आपल्या मुलाला शिकवलं. प्रसंगी ते स्वतः उपाशी झोपले पण आपल्या मुलाला कोणतीही कमतरता त्यांनी भासू दिली नाही. मुलानेही IAS अधिकारी होवून वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले. आपण बोलत आहोत IAS गोविंद जैस्वाल यांच्याविषयी… जाणून घेवूया त्यांचा लहानपणापासून अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता याविषयी….

वडील आणि बहिणीच्या त्यागामुळेच शक्य झालं
IAS गोविंद जयस्वाल हे उत्तर प्रदेशातील वाराणसीचे रहिवासी आहेत. सध्या ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी (UPSC Success Story) लहानपणापासून आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. या खडतर प्रवासात त्याच्या वडिलांनी आणि बहिणीने त्यांना खूप साथ दिली. वडील आणि बहिणीने केलेला त्याग आणि आशीर्वादाशिवाय ते आयुष्यात कधीच या टप्प्यावर पोहोचले नसते; असं गोविंद मानतात.

10×12 च्या खोलीत कुटुंब राहत होतं
गोविंद जैस्वाल यांचे वडील एका रिक्षा कंपनीचे मालक होते आणि त्यांच्याकडे 35 रिक्षा होत्या. गोविंदची आई ब्रेन हॅमरेजची शिकार झाली होती. त्यावेळी पत्नीच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी बहुतेक रिक्षा विकल्या. यामुळे त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आणि त्यांना गरीबिचा सामना करावा लागला. गोविंद इयत्ता सातवीत शिकत असताना त्यांची आई वारली. यानंतर त्यांचे वडील, गोविंद आणि त्यांच्या मुलींसह, काशीच्या अलायपुरा येथे 10×12 च्या खोलीत राहत होते.

कोरडी भाकरी खाऊन पोटाची खळगी भरली (UPSC Success Story)
अनेकवेळा गोविंद आणि त्यांचे कुटुंब केवळ कोरडी भाकरी खाऊन पोटाची भूक भागवत असत. असे असतानाही गोविंदच्या वडिलांनी आपल्या चार मुलांच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांच्या तीनही मुलींनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. गोविंद यांच्या वडिलांनी मुलींच्या लग्नासाठी उरलेल्या रिक्षाही विकल्या.

पायाला जखम असूनही वडील रिक्षा चालवायचे
गोविंद जयस्वाल यांचे प्राथमिक शिक्षण उस्मानपुरा येथील सरकारी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी वाराणसी येथील हरिश्चंद्र विद्यापीठातून मॅथ्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. 2006 मध्ये गोविंद यूपीएससी (UPSC) परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेले होते. गोविंद यांना पैसे पाठवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी पायाला जखम असूनही रिक्षा चालवली आहे. त्यांनी मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागावा म्हणून अनेकदा जेवणही केले नाही; की पायाच्या जखमेवर उपचारही केले नाहीत.

एक वेळचा टिफिन आणि चहा बंद केला
गोविंद यांचं अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. त्यांचा दिल्लीमध्ये UPSC चा कसून अभ्यास सुरु होता. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी महागड्या कोचिंग क्लासला प्रवेश घेतला नाही. केवळ सेल्फ स्टडी करुन ते ही परीक्षा पास झाले. वडिलांना खर्चात हातभार लागावा म्हणून ते शाळेतील मुलांची (UPSC Success Story) शिकवणी घ्यायचे. पैसे वाचवण्यासाठी त्यांनी एक वेळचा टिफिन आणि चहा बंद केला होता. पण त्यांनी अभ्यासात कोणतीच कसर सोडली नाही. 2007 मध्ये त्यांनी UPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण भारतात 48 वा क्रमांक पटकावला आणि ते IAS अधिकारी झाले. गोविंद जैस्वाल IAS तर त्यांच्या पत्नी चंदना चौधरी या IPS अधिकारी आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीची अंतीम निवड यादी जाहीर!!

Talathi Bharti 2023 (27)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील (Talathi Bharti 2023) उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली. या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली होती. उमेदवारांना अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती. त्यानुसार मंगळवारी रात्री (दि. 23) उशिरा ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली.

तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून दहा लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेची उत्तरसूची (Talathi Bharti 2023) प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले.

सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त (Talathi Bharti 2023) सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले होते. मात्र हे आरोप, दावे फेटाळत भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरु केले आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ही यादी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NMMC Recruitment 2024 : 12 वी पास ते पदवीधारकांसाठी विना परीक्षा थेट मुलाखत; नवी मुंबई महापालिकेत 110 पदांवर भरती जाहीर

NMMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन ।  नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत (NMMC Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 110 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह  दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – नवी मुंबई महानगरपालिका
भरली जाणारी पदे –
1. वैद्यकीय अधिकारी – 55 पदे
2. स्टाफ नर्स (स्त्री) – 49 पदे
3. स्टाफ नर्स (पुरुष) – 06 पदे
पद संख्या – 110 पदे

पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी – मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी.
एम.बी.बी.एस. पदवी धारक उपलब्ध न झाल्यास 6 ते 11 महिन्यांकरीता अथवा उपलब्ध होई पर्यंत बी.ए.एम.एस. पदवी धारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल.
2. स्टाफ नर्स (स्त्री) – 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा बी.एस्सी, महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
3. स्टाफ नर्स (पुरुष) – 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा बी.एस्सी, महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक

वय मर्यादा –
1. उमेदवाराचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत
2. राखीव – 05 वर्षे सूट
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी -60,000/- रु. दरमहा
2. स्टाफ नर्स (स्त्री) – 40,000/- रु. दरमहा
3. स्टाफ नर्स (पुरुष) – 20,000/- रु. दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत (NMMC Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – 01 फेब्रुवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Customs Recruitment 2024 : 10वी पास असणाऱ्यांना मुंबई कस्टम्समध्ये नोकरीची संधी; 63,200 एवढा पगार

Customs Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Customs Recruitment 2024) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई कस्टम्स विभागांतर्गत नवीन पदावर भरती जाहिर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – मुंबई कस्टम्स
भरले जाणारे पद – कर्मचारी कार चालक
पद संख्या – 28 पदे (Customs Recruitment 2024)
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई-400 001

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Customs Recruitment 2024)
1. उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराकडे ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे
मिळणारे वेतन – 19,000/- रुपये ते 63,200/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mumbaicustomszone1.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लि. अंतर्गत शिक्षकांच्या 100 जागांवर भरती; दरमहा 1,40,000 पगार

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । एज्युकेशनल कन्सल्टंट्स (Job Notification) इंडिया लिमिटेड येथे PGT शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 100 पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – PGT शिक्षक
1) कॉम्प्युटर सायन्स/ICT – 28 पदे
2) फिजिक्स – 18 पदे
3) केमिस्ट्री – 19 पदे
4) गणित – 35 पदे
पद संख्या – 100 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
The Educational Qualification & Eligibility for the PGT Teachers will be as follows:
• Master’s Degree in the relevant field from a recognized university with at least 60% marks.
• Bachelor’s of Education (B. Ed.) Degree from a recognized university is mandatory for
teachers applying for the posts of PGT Mathematics, PGT Chemistry and PGT Physics.
• Bachelor’s of Education (B. Ed.) Degree from a recognized university is preferable (not
mandatory) for the post of PGT Computer Science / ICT.
• Proficiency in teaching in English Language.
• The PGT teacher must have 5 year’s work experience in teaching in relevant subject in 11th
and 12thGrades.
• High proficiency in use of technology for education.
• Maximum age of 55 years as on 16th Jan 2024 (date of start of online applications).
• Maintain good physical (Job Notification) fitness and possess no medical conditions that may hinder the
delivery of services during the contract term. Candidates shall be required to submit a
medical certificate at the time of joining.
• The Cut-Off date for determining various applicable eligibility criteria (Educational
Qualifications, Age Limit, Experience etc.) will be 16th Jan 2024 (date of start of online
applications).

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 जानेवारी 2024 रोजी 55 वर्षांपर्यंत असावे.
मिळणारे वेतन – 1,40,000/- रुपये दरमहा
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.edcilindia.co.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com