Home Blog Page 161

Ramayan will be Taught in Madrassas : वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय!! मदरशांमधील मुले गिरवणार रामायणाचे धडे

Ramayan will be Taught in Madrassas

करिअरनामा ऑनलाईन । आयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनानंतर (Ramayan will be Taught in Madrassas) संपूर्ण देशात राम मंदिराच्या भव्यदिव्यतेची आणि रामयुगाची चर्चा सुरु आहे. असे असताना आता एक आनंदाची बातमी येवून धडकली आहे. उत्तराखंडमधील मदरशांमध्येही आता रामायणाचे धडे दिले जाणार आहेत. वक्फ बोर्डाने याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये आता रामायण शिकवलं जाणार आहे. मदरशांमध्ये रामायणाचा अभ्यासक्रम म्हणून समावेश केला जाणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या एकूण 117 मदरशांपैकी चार मदरशांमध्ये सुरुवातीला नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाईल.

117 मदरशांमध्ये सुरु होणार अभ्यासक्रम (Ramayan will be Taught in Madrassas)
बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार, नैनिताल आणि उधम सिंह नगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाईल. शिक्षकांची भरती झाल्यानंतर उर्वरित 113 मदरशांमध्ये ही नियुक्ती केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Ramayan will be Taught in Madrassas)
उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी अशी माहिती दिली आहे की, मदरशांमध्ये रामायण वाचल्याने मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळेल. यामाध्यमातून मुलांना श्रीरामचे चरित्र जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर मदरशातील मुलांचा ड्रेसकोड देखील बदलण्यात येणार आहे.

कुराण आणि रामायण दोन्ही शिकवले जाणार
उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले आहे की, कुराणसोबतच विद्यार्थ्यांना रामायणही शिकवले जाणार आहे. वक्फ बोर्ड चार मदरशांसाठी मुख्याध्यापकांची नियुक्ती करेल, त्यांना या विषयात पारंगत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे काम दिले जाईल. तसेच नवीन अभ्यासक्रमाच्या परिचयासाठी विस्तृत व्यवस्था केली जाणार आहे.
निवड झालेल्या चार मदरशांना स्मार्ट क्लासरूमसह (Ramayan will be Taught in Madrassas) विकसित केले जाणार आहे. तसेच या संस्थांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याची नितांत गरज आहे आणि आम्ही नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पुस्तके सादर करण्याच्या प्रक्रियेत आहोत; असे शादाब शम्स यांनी सांगितले. तर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांच्या मते, या वर्षी मार्चपासून आमच्या मदरसा आधुनिकीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये श्री रामचा अभ्यास सुरू केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bank of Baroda Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये सिक्युरिटी ऑफिसर पदावर भरती सुरु; दरमहा 69,000 एवढा पगार

Bank of Baroda Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदामध्ये भरतीची (Bank of Baroda Recruitment 2024) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजर- सिक्योरिटी (MMG/S-II) पदाच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Recruitment 2024)
भरले जाणारे पद – मॅनेजर- सिक्योरिटी (MMG/S-II)
पद संख्या – 38 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील (Bank of Baroda Recruitment 2024) पदवीधर तसेच उमेदवार आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमिशन्ड सर्व्हिस मध्ये किमान पाच वर्षांचा अधिकारी असावा किंवा उमेदवार हा पोलीस दलातील वर्ग-1 राजपत्रित अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा असलेले पोलीस अधीक्षक. किंवा उमेदवार निमलष्करी दलात वर्ग – I राजपत्रित अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांची सेवा असलेला कमांडंट.
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 25 ते 35 वर्षे
2. SC/ST: 05 वर्षे सूट
3. OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा फी – (Bank of Baroda Recruitment 2024)
जनरल/ओबीसी/EWS: ₹600/-
SC/ST/PWD/महिला: ₹100/-
मिळणारे वेतन – 48,170/- ते 69,810/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

Indian Army Recruitment 2024 : आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे नोकरीची संधी; 283 पदे रिक्त

Indian Army Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत (Indian Army Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस पदांच्या एकूण 283 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे
भरले जाणारे पद – ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस
पद संख्या – 283 पदे (Indian Army Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – खडकी, पुणे
वय मर्यादा – 14 वर्षे पूर्ण

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Army Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI)ITI/ITC in relevant Trade
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिसGraduate/Diploma in Engineering

मिळणारे वेतन –

पदाचे नाववेतनश्रेणी
ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस 1st Year- 9552/-
2nd Year- 10,916/-
3rd Year- 12,281/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. उमेदवारांनी दिलेल्या (Indian Army Recruitment 2024) पत्त्यावर अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करणे आवश्यक आहे.
5. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडा.
6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

Job Notification : राज्यातील ‘या’ मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ पदावर भरती सुरु; एकूण 100 पदे

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा (Job Notification) असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती निघाली असून यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भरले जाणारे पद – कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ)
पद संख्या – 100 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
a (I) Graduation in any discipline from a recognized University with minimum 50% marks.
Relaxation in minimum % of marks for Post Graduate Candidates.
a (II) Computer Eligibility: – Candidate should have D.O.E.A.C.C. approved Society’s passed
Certificate course of “CCC” or “O” or “A” or “B” level or passed Computer
diploma/Computer degree or MS-CIT of Maharashtra State Technical & higher education
Board, Mumbai.Other Qualification as mentioned in A (ii) will be relaxed in case of candidate having (Job Notification)
B.C.A/ B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.in computer related subject or any other
Computer related Degree.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असावे
परीक्षा फी – 1000/-
मिळणारे वेतन – 10,000/- ते 28,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला
Online परीक्षा – फेब्रुवारी/मार्च 2024

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.akoladccbank.com

UPSC Success Story : नोकरी, ट्युशन आणि अभ्यास अशी तारेवरची कसरत; सामान्य दुध विक्रेत्याची मुलगी झाली IAS

UPSC Success Story of IAS Anuradha Pal

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा (UPSC Success Story) म्हणजे अनुराधा पाल यांची, ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करूनही UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि सर्वात प्रतिष्ठित नागरी सेवेतील IAS अधिकारी पद प्राप्त केले आहे.
UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही देशातील बहुतांश उमेदवारांसाठी अत्यंत कठीण परीक्षा ठरली आहे. पण असे काही उमेदवार आहेत, ज्यांचे आयुष्यच इतके कठीण झाले आहे की त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची अडचण कमी वाटते. यामुळेच असे काही उमेदवार त्यांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि चिकाटीने त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करतात. त्यापैकीच एक आहेत अनुराधा पाल.

वडील दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे
IAS अनुराधा पाल हरिद्वारमधील एका छोट्या गावातल्या एका सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना लहानपणी अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांचे वडील दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत.

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पूर्ण केले (UPSC Success Story)
अनुराधा यांनी हरिद्वारच्या जवाहर नवोदय विद्यालयातून शालेय शिक्षण घेतले आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुराधा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिल्लीत गेल्या. त्यांनी येथे येऊन जीबी पंत विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले.

नोकरी करत केली UPSCची तयारी; शिकवणीही घेतली
घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनुराधा यांनी टेक महिंद्रा येथे नोकरी केली. तेथे काही काळ काम केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली कारण त्यांना नागरी सेवांमध्ये रुजू व्हायचे होते. त्यानंतर त्यांनी रुरकी येथील एका महाविद्यालयात लेक्चरर म्हणून शिकवण्यास सुरवात केली आणि यासोबत यूपीएससीची तयारीही केली. स्वतःची कोचिंग फी भरता यावी यासाठी त्या शालेय विद्यार्थ्यांना शिकवणीही देत ​​असत.

पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
अनुराधा यांनी नोकरी; शिकवणी हे सगळं सांभाळत असताना नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास सुरु ठेवला होता. तसं पहायला गेलं तर त्यांची तारेवरची कसरत सुरु होती. तरीही 2012 मध्ये त्यांनी (UPSC Success Story) पहिल्याच प्रयत्नात UPSC सारखी अवघड परीक्षा पास केली. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तिन्ही फेऱ्या त्यांनी पार केल्या. पण, त्यावेळी त्यांची संपूर्ण भारतात रँक 451 होती. त्यांना IPS पद मिळालं होतं पण यावर त्या समाधानी नव्हत्या म्हणून त्यांनी दिल्लीतील निर्वाण आयएएस अकादमीमध्ये प्रवेश घेतला, ज्यामुळे त्यांची तयारी आणखी मजबूत झाली.

दुसऱ्याच प्रयत्नात झाल्या IAS
अनुराधा यांनी पुन्हा अभ्यास सुरु केला. यावेळी परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात त्या संपूर्ण भारतातून 62 वा क्रमांक मिळवून पास झाल्या. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे IAS अधिकारी (UPSC Success Story) पद मिळवले. सध्या त्या उत्तराखंडमध्ये बागेश्वरचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career in Engineering : इंजिनिअरिंगमध्ये कोणता ट्रेंड आहे टॉपवर? उत्तम करिअरसाठी कोणते क्षेत्र निवडाल? जाणून घ्या…

Career in Engineering

करिअरनामा ऑनलाईन । सायन्स क्षेत्रातील बहुतेक (Career in Engineering) विद्यार्थ्यांना BE किंवा B.Tech करण्याची अपेक्षा असते. यासाठी ते आधीच प्रवेश परीक्षेची तयारी सुरू करतात. प्रवेश परीक्षा दिल्यानंतर, प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो की कोणते क्षेत्र निवडायचे, जेणेकरून त्यांना भविष्यात उत्तम नोकरी आणि भरघोस पगाराचे पॅकेज मिळू शकते.
इंजिनीअरिंगचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मनात हा प्रश्न सतत फिरत असतो; की आजच्या काळात कोणता ट्रेंड टॉपवर आहे? कोणत्या क्षेत्रात अभियांत्रिकी करण्याचा अधिक फायदा आहे? जर तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्ही कोणते क्षेत्र निवडावे; हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. स्थापत्य अभियांत्रिकी (Architectural Engineering)
स्थापत्य अभियांत्रिकी हे एक असे क्षेत्र आहे जे सुरुवातीपासून खूप लोकप्रिय आहे. यामध्ये नेहमीच रोजगाराची हमी असते, कारण देशातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते आणि दरवर्षी कोट्यवधी रुपये त्यावर खर्च केले जातात. याशिवाय खेड्यांपासून शहरांपर्यंत सतत बांधकामे सुरू असतात त्यामुळे या क्षेत्रात कधीही नोकऱ्या आणि पैशांची कमतरता असू शकत नाही.

2. रासायनिक अभियंता (Chemical Engineer)
रासायनिक अभियंते हे रसायने, इंधन, औषधे, अन्न आणि इतर उत्पादनांच्या उत्पादन किंवा वापराशी संबंधित समस्या सोडवतात. या क्षेत्रातील व्यावसायिकांनाही चांगली मागणी आहे.

3. बायोमेडिकल अभियंता (Biomedical Engineer) (Career in Engineering)
वैद्यकीय उद्योगात, उपकरणे, संगणक प्रणाली, सॉफ्टवेअर डिझाइन या गोष्टी विकसित करणे ही बायोमेडिकल अभियंत्यांची जबाबदारी आहे. या क्षेत्रात, बायोमेडिकल अभियंत्यांच्या संशोधन आणि कार्याशी संबंधित परिणाम लोकांशी सामायिक केले जातात. अलीकडच्या काळात या क्षेत्रात खूप वाढ झाली आहे आणि इथे व्यावसायिकांची मागणी झपाट्याने वाढली आहे.

4. एरोस्पेस अभियंता (Aerospace Engineer)
एरोस्पेस अभियंते विमान आणि स्पेसशिपच्या विकास आणि देखभालमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अवकाश तंत्रज्ञानाकडे लोकांचा कल झपाट्याने वाढला आहे. या क्षेत्रातही चांगले करिअर पर्याय आणि पैसे कमावण्याच्या संधी आहेत.

5. संगणक शास्त्र (Computer Science)
संगणक विज्ञान हा सध्याच्या युगातच नव्हे तर बर्याच काळापासून (Career in Engineering) विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय ट्रेंड आहे. बीटेक करणाऱ्या बहुतांश तरुणांची सीएस (Cs) ही पहिली पसंती आहे. पदवी मिळताच तुम्हाला नोकरी तर मिळतेच पण चांगले पॅकेजही मिळते. याशिवाय परदेशातही कामाच्या संधी उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Supreme Court Of India Recruitment 2024 : सुप्रीम कोर्टात पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; महिन्याचा 80 हजार एवढा पगार

Supreme Court Of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court Of India Recruitment 2024) अंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 90 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी (Law Clerk-cum-Revision Assistant)
पद संख्या – 90 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
अर्ज फी – Rs.500/-
वय मर्यादा – 20 वर्षे ते 32 वर्षे (Supreme Court Of India Recruitment 2024)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – The candidate must be a Law Graduate (before taking up the assignment as Law Clerk) having a Bachelor Degree in Law (including Integrated Degree Course in Law) from any School/College/University/Institution established by law in India and recognized by the Bar Council of India for enrolment as an Advocate
मिळणारे वेतन – Rs. 80,000/- दरमहा

असा करा अर्ज – (Supreme Court Of India Recruitment 2024)
1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NDA Pune Recruitment 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; 63200 पर्यंत मिळवा पगार

NDA Pune Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे विविध (NDA Pune Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 198 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

संस्था – राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे
पद संख्या – 198 पदे
भरली जाणारी पदे –
1) निम्न श्रेणी लिपिक 16 पदे
2) स्टेनोग्राफर ग्रेड-II 01 पद
3) ड्राफ्ट्समन 02 पदे
4) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II 01 पद
5) कुक 14 पदे
6) कंपोझिटर-कम-प्रिंटर 01 पद
7) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 03 पदे
8) कारपेंटर 02 पदे
9) फायरमन 02 पदे
10) TA-बेकर & कन्फेक्शनर 01 पद
11) TA-सायकल रिपेरर 02 पदे
12) TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर 01 पद
13) TA-बूट रिपेरर 01 पद
14) मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) 151 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल
वय मर्यादा – (NDA Pune Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे
2. SC/ST: 05 वर्षे सूट
3. OBC: 03 वर्षे सूट
नोकरी करण्याचे ठिकाण – NDA खडकवासला, पुणे

मिळणारे वेतन –
1. लोअर डिव्हिजन क्लर्क – 19900 -63200 रुपये दरमहा
2. स्टेनोग्राफर Gde-II – 25500 -81100 रुपये दरमहा
3. ड्राफ्ट्समन – 25500 -81100 रुपये दरमहा
4. सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll – 19900 -63200 रुपये दरमहा
5. कूक – 19900 -63200 रुपये दरमहा
6. कंपोझिटर-कम- प्रिंटर, – 19900 -63200 रुपये दरमहा
7. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), – 19900 -63200 रुपये दरमहा
8. सुतार, – 19900 -63200 रुपये दरमहा (NDA Pune Recruitment 2024)
9. फायरमन, – 19900 -63200 रुपये दरमहा
10. TA-बेकर आणि कन्फेक्शनर – 18000 -56900 रुपये दरमहा
11. TA-सायकल रिपेयरर, – 18000 -56900 रुपये दरमहा
12. TA-मुद्रण मशीन ऑप्टर, – 18000 -56900 रुपये दरमहा
13. टीए-बूट रिपेयरर, – 18000 -56900 रुपये दरमहा
14. मल्टी टास्किंग स्टाफ – 18000 -56900 रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nda.nic.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shri Saibaba Sansthan Recruitment 2024 : श्री साई चरणी नोकरीची संधी; पुजारी पदावर निघाली भरती; त्वरा करा

Shri Saibaba Sansthan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान (Shri Saibaba Sansthan Recruitment 2024) विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर येथे पुजारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 11 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर
भरले जाणारे पद – पुजारी
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी ता. राहाता, जि. अहमदनगर – 423109.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Shri Saibaba Sansthan Recruitment 2024)
1. उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
2. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त वेदपाठशाळेचा किमान 05 वर्षाचा पुजारी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. उमेदवाराकडे किमान 03 वर्षाचा पूजाविधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे
परीक्षा फी – फी नाही (Shri Saibaba Sansthan Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 27,400/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – शिर्डी, अहमदनगर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://sai.org.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BDL Recruitment 2024 : ITI पास ते इंजिनियर्ससाठी भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदावर भरती सुरु 

BDL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत (BDL Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अभियंता/अधिकारी, प्रकल्प पदविका सहाय्यक/सहाय्यक, प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण 361 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आह. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारत डायनॅमिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – प्रकल्प अभियंता / अधिकारी, प्रकल्प पदविका सहाय्यक / सहाय्यक, प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक (BDL Recruitment 2024)
पद संख्या – 361 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – 28 वर्षे

भरतीचा तपशील – (BDL Recruitment 2024)

पद पद संख्या 
प्रकल्प अभियंता / अधिकारी 136 पदे
प्रकल्प पदविका सहाय्यक / सहाय्यक 142 पदे
प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक 83 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अभियंता / अधिकारी BE/ B.Tech/ B.Sc Engg
प्रकल्प पदविका सहाय्यक / सहाय्यक 3 years Diploma or equivalent course in relevant discipline (Mechanical / Electronics / Electrical / Computers / Civil / Metallurgy / Chemical) recognized by the State/ Central government
प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक ITI in relevant discipline (Fitter / Electronics / Electrician / Mechanical / Turner / Welder / Electro Plating / Computers / Mill Wright / Diesel Mechanic / Refrigeration & Air Conditioning / Plumber / Radio Mechanic) with NAC or equivalent recognized by the State/ Central Government

 

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
प्रकल्प अभियंता / अधिकारी 30,000/- to 39,000/-
प्रकल्प पदविका सहाय्यक / सहाय्यक 25,000/- to 29,500/-
प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक 23,000/- to 27,500/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करु शकतात.
3. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे. (BDL Recruitment 2024)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bdl-india.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com