Home Blog Page 15

406 जागांसाठी NDA भरती;12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज UPSC NDA Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन | भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. बारावी उत्तीर्ण तरुणांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट अधिकारी UPSC NDA Recruitment 2025 बनण्याची सुवर्णसंधी आहे. एनडीएच्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंग्ज मधील लेफ्टनंट पदाच्या 406 जागा भरल्या जाणार आहेत. भारतीय लष्करातर्फे या पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. चार वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, कॅडेट्सना लष्करात लेफ्टनंट पदावर कायमस्वरूपी भरती केले जाईल. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पदाचे नाव –

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2025

भरतीचा तपशील आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

नॅशनल डिफेन्स अकॅडमी UPSC NDA Recruitment 2025

  • लष्कर (Army)- 208 पदे
  • शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण
  • नौदल (Navy) – 42 पदे
  • शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (PCM)
  • हवाई दल (Air Force) – 120 पदे
  • शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (PCM)
  • नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] – 36 पदे
  • शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (PCM)

वय मर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2006 ते 01 जुलै 2009 या दरम्यानचा असावा.

अर्ज शुल्क

  • जनरल/ओबीसी – रु. 100/-
  • SC/ST/महिला – फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण –

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतातील कोणतेही असेल.

अर्ज करण्याची पद्धत –

या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – UPSC NDA Recruitment 2025

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

GMC Chandrapur Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची मोठी संधी; दरमहा मिळणार 2 लाख रुपये पगार

GMC Chandrapur Bharti 2024

GMC Chandrapur Bharti 2024 | ज्या लोकांना शिक्षक म्हणून नोकरी करायची आहे. त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या अंतर्गत एक भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत प्राध्यापक या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 5 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 27 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | GMC Chandrapur Bharti 2024

या भरती अंतर्गत प्राध्यापक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला चंद्रपूर या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती | GMC Chandrapur Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

निवड प्रक्रिया

या भरती अंतर्गत मुलाखतीद्वारे तुमची निवड होईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मा.अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतनश्रेणी

तुमची निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 2 लाख रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर हा अर्ज पाठवू शकता.
  • 27 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

SBI Clerk Bharti 2025 | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 14,191 पदांसाठी भरती सुरु; महिना मिळणार एवढा पगार

SBI Clerk Bharti 2025

SBI Clerk Bharti 2025 | अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण देशातील सगळ्यात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत लीपीक म्हणजेच कनिष्ठ सहकारी या पदांचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या तब्बल 14,191 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. याबाबत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याचप्रमाणे 7 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत लिपीक म्हणजेच कनिष्ठ सहकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पद संख्या

या भरती अंतर्गत 14191 रिक्त पदे भरली जाणार आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 41 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 750 रुपये एवढी अर्ज फी भरावी लागणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

7 जानेवारी 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

भारतीय अंतर्गत तुमचे निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 26000 ते 29000 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 7 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

SBI PO Recruitment 2025: बँकिंग क्षेत्रात काम करण्याची सुवर्ण संधी; SBI अंतर्गत तब्बल 600 पदांची (PO) भरती.

करियरनामा ऑनलाईन। बँकिंग क्षेत्रात नोकरीची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनदांची बातमी. SBI PO Recruitment 2025 SBI (State Bank of India) द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती अंतर्गत तब्बल 600 पदांची भरती घेण्यात येणार आहे. पदवीधर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने 27 डिसेंबर 2024 पासून अर्ज दाखल करता येतील. तसेच अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 असेल. त्वरित अर्ज करण्यासाठी इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) SBI PO Recruitment 2025 या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या –

परिविक्षाधीन अधिकारी (PO) SBI PO Recruitment 2025 या पदासाठी तब्बल 600 जागा भरण्यात येणार आहेत.

वेतन –

उमेदवारांना या पोस्टसाठी रु. 41,960/- महिना वेतन असणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

• उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. किंवा केंद्र सरकार द्वारा मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

• अंतिम वर्ष/सेमिस्टरच्या मेदवारांना मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल असेच उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा –

उमेदवारांना या पदासाठी 21 ते 30 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

• सामान्य / OBC / EWS – रु. 750/-

• SC / ST / PWD – शुल्क नाही

अर्ज पद्धती –

या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

निवड प्रक्रिया –

SBI PO निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होते:

• प्राथमिक परीक्षा: हे एक ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा असते.

• मुख्य परीक्षा: यात वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

• मुलाखत आणि गटचर्चा: मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या टप्प्यात बोलावले जाते.

प्राथमिक परीक्षेचे स्वरूप –

• इंग्रजी भाषा: 30 प्रश्न (20 मिनिटे)

• संख्यात्मक योग्यता: 35 प्रश्न (20 मिनिटे)

• तर्कशक्ती क्षमता: 35 प्रश्न (20 मिनिटे)

• एकूण: 100 प्रश्न, 100 गुण, 1 तास

मुख्य परीक्षेचे स्वरूप –

• वस्तुनिष्ठ परीक्षा (200 गुण): तर्कशक्ती, डेटा विश्लेषण, सामान्य जागरूकता, आणि इंग्रजी भाषा.

• वर्णनात्मक परीक्षा (50 गुण): निबंध आणि पत्रलेखन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2025

अर्ज कसा करायचा ? –

• SBI च्या अधिकृत वेबसाइटला (http://www.sbi.co.in) भेट द्या.

• Careers विभागात जाऊन SBI PO 2024 लिंकवर क्लिक करा.

• अर्ज नोंदणी करा आणि तुमची सर्व माहिती भरा.

• आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी, ओळखपत्र).

• अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा आणि अर्ज सादर करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा https://sbi.co.in/

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 : नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; 1 लाख 22 हजारांपर्यंत मिळणार पगार

करियरनामा ऑनलाईन। नागपूर महानगरपालिकेने २४५ रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. नागपूर महानगरपालिका Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परीचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक” पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणी 26 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली असून, इच्छुक उमेदवारांना नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 15 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. याबाबतची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. चला तर मग जाहिरात संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

पदाचे नाव Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परीचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक

पदसंख्या – 245
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 36 पदे
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 3 पदे
नर्स परिचारिका (जी. एन. एम.) – 52 पदे
वृक्ष अधिकारी – 4 पदे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 150 पदे

वेतन
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 38,600 ते 1,22,800
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – 38,600 ते 1,22,800
नर्स परिचारिका (जी. एन. एम.) – 35,400 ते 1,12,400
वृक्ष अधिकारी – 35,400 ते 1,12,400
स्थापत्य अभियंता सहाय्यक – 25,500 ते 81,100

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 – 43 वर्ष

अर्ज शुल्क
सर्वसाधारण उमेदवार – रु. 1000/-
इतर उमेदवार – रू. 900/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
ओळखपत्र
अर्जाचा शुल्क भरल्याची पावती

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक कराhttp://www.nmcnagpur.gov.in

अधिक माहितीसाठीPDF पहा.

महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात कनिष्ठ लेखापाल पदाच्या 75 रिक्त जागांसाठी भरती Lekha koshagar bharti 2024

करियरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात कनिष्ठ लेखापाल Lekha koshagar bharti 2024 या पदासाठी 75 रिक्त पदांची भरती घेण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून 31 डिसेंबर 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 असून संपूर्ण जाहिरातीचा महत्त्वाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव Lekha koshagar bharti 2024 – कनिष्ठ लेखापाल (गट-क)

पदसंख्या – 75

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 19 – 38 वर्षे

अर्ज शुल्क
सर्वसाधारण उमेदवार – रु. 1000/-
इतर उमेदवार – रू. 900/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन Lekha koshagar bharti 2024

निवड प्रक्रिया – मुलाखती

अर्ज कसा करावा
ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज सुरु होण्याची तारीख – 31 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक कराhttps://mahakosh.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र वनसेवक 12991 पदांची मेगा भरती; A टू Z माहिती Maharashtra Van Sevak Bharti 2025

करियरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र शासनाच्या वनविभागा अंतर्गत वनसेवक Maharashtra Van Sevak Bharti 2025 पदाची तब्बल 12,991 जागांची भरती लवकरच होणार आहे. वनविभागाने भरतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून लवकरच या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. वनसेवक या पदासाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून किमान पात्रता 10 वी पास ठेवण्यात आली आहे. वनसेवक हे पद महाराष्ट्र सरकारच्या गट ड या श्रेणीत येत असून सातव्या वेतन आयोगानुसार निवडण्यात आलेल्या वन सेवकांना आकर्षक वेतनही देण्यात येणार आहे. स्थानिक उमेदवारांच्या हाताला नोकरी मिळण्याच्या उद्देशाने वनविभागाची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी मेगा भरती म्हणावी लागेल. भरतीची संपूर्ण प्रक्रिया, पदोन्नती आणि अटी जाणून घेण्यासाठी खालील माहिती सविस्तर वाचून घ्या.

वनविभागाने या मेगाभरतीसाठी काही महत्वाचे मार्गदर्शक तत्वे आणि अटी लागू केलेल्या आहेत. ते पुढीलप्रमाणे असतील.
1) स्थानिक उमेदवारांची नियुक्ती
नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
स्थानिक म्हणजे ज्या वनविभागात (Division) नियुक्ती होणार आहे, त्या विभागातील रहिवासी उमेदवार.

2) पदाची श्रेणी आणि वेतन Maharashtra Van Sevak Bharti 2025 –
हे पद गट-ड श्रेणीत येईल.
सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी एस-१ (₹१५,०००-४७,६००) असेल.
पदाचे पदनाम वनसेवक असेल.

3) शैक्षणिक पात्रता
किमान शैक्षणिक पात्रता १० वी पास असावी.
कमाल शैक्षणिक पात्रता १२ वी पास ठेवण्यात येईल.
जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाईल.

4) रोजंदारी मजुरांसाठी विशेष अट
सध्याचे कार्यरत रोजंदारी मजूर वयोमर्यादेत ५५ वर्षांपर्यंत सूटसह १०% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील.
रोजंदारी मजुराने प्रतिवर्ष किमान १८० दिवस तुटक स्वरूपात ५ वर्षे काम केलेले असणे आवश्यक.
रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास, ती मागे घेतल्याशिवाय नियुक्ती मिळणार नाही.

5) पदोन्नतीचे संधी – Maharashtra Van Sevak Bharti 2025
वनरक्षक (गट-क) पदांमध्ये २५% पदे वनसेवकांमधून पदोन्नतीने भरली जातील.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक कराhttps://mahaforest.gov.in/index.php/Gr/index/

मुंबई महापालिकेत 690 अभियंता पदाची भरती; आज शेवटची तारीख BMC Recruitment 2024

करियरनामा ऑनलाईन। मुंबई महापालिकेत काम करण्यासाठी BMC Recruitment 2024 इच्छुक असणाऱ्यांसाठी आणि इंजिनीयरचं शिक्षण घेतलेल्या सर्वांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा सर्व शाखांतील कनिष्ठ, दुय्यम अभियंता पदाच्या एकूण 690 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पालिका प्रशासनाने या भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल केले आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 करण्यात आली आहे.

पदाचे नाव BMC Recruitment 2024 – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)

पदसंख्या – 690 जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 250
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) – 130
दुय्यम अभियंता (स्थापत्य) – 233
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) – 77

शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार ( मूळ जाहिरात वाचावी )

वयोमर्यादा – 18 – 38 वर्ष

अर्ज शुल्क
सर्वसाधारण उमेदवार – रु. 1000 / –
इतर उमेदवार – रू. 500 / –

अर्ज पद्धती – ऑनलाइन BMC Recruitment 2024

निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा https://rrbmumbai.gov.in/

रेल्वेमध्ये 1036 जागांची भरती; असा करा अर्ज RRB Recruitment 2025

रेल्वेतील पीजीटी, टीजीटी, प्रायमरी रेल्वे शिक्षकांसह तब्बल 1036 पदांची बंपर भरती!

करियरनामा ऑनलाईन | दरवर्षी RRB (Railway Recruitment Board) विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करत असते. तसेच या वर्षी देखील रेल्वे बोर्डाकडून RRB Recruitment 2025 तब्बल 1036 पदांची मेगाभरती होणार आहे. मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड कॅटगरीच्या (Ministerial & Isolated Categorie) अंतर्गत पीजीटी, टीजीटी, चीफ लॉ ऑफिसर, पब्लिक प्रोसिक्यूटर, कनिष्ठ हिंदी अनुवादक, लायब्ररियन आणि प्रायमरी रेल्वे शिक्षक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 7 जानेवारी 2025 पासून या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार असून संगणक चाचणी नुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल. या पदांसाठी विशिष्ट शैक्षणिक अहर्ता असून त्याचा सविस्तर तपशील खाली नमूद केलेला आहे. नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच ही बंपर भरती होणार आहे. इतर तपशील खालील प्रमाणे.

पदाचे नाव RRB Recruitment 2025 – पदव्युत्तर शिक्षक (PGT), वैज्ञानिक पर्यवेक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), मुख्य कायदा सहाय्यक, सरकारी वकील, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण, कनिष्ठ अनुवादक (हिंदी), वरिष्ठ प्रचार निरीक्षक, कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक (महिला), प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT), सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा, प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III

पदसंख्या – 1036 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 ते 48 वर्षे

अर्ज शुल्क
सर्वसाधारण उमेदवार – रु. 500/-
इतर उमेदवार – रु. 250/- (SC,ST,Ex-Serviceman, PWED, Female)

अर्ज पद्धती – ऑनलाईन RRB Recruitment 2025

निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी

अर्ज सुरू होण्याची तारीख –07 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.https://rrbmumbai.gov.in/


MAHAGENCO Recruitment 2024 : MAHAGENCO अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पदांच्या 800 जागांची महाभरती; असा करा अर्ज

MAHAGENCO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । power sector मध्ये सुरक्षित आणि फायदेशीर करिअरची स्वप्न पाहत आहात का? MAHAGENCO महाराष्ट्राच्या भविष्याला ताकद देण्यासाठी 800 तंत्रज्ञ III (Technician III) व्यावसायिकांची भरती (MAHAGENCO Recruitment 2024) करत आहे. आकर्षक वेतन,आणि जगातील सर्वात मोठ्या वीज उत्पादन कंपनीत काम करण्याची ही सुवर्ण संधी आहे. खरं तर महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पदासाठी नोव्हेंबर महिन्यात जाहिरात देण्यात आली होती. त्यामध्ये आता काही महत्वाचे अपडेट करण्यात आले आहेत. त्यातील सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 ऐवजी 10 जानेवारी 2025 करण्यात आली आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा. सविस्तर माहिती खालील प्रमाणे..

रिक्त पदसंख्या- 800

पदाचे नाव- महानिर्मिती “तंत्रज्ञ-3” भरती 2024 (MAHAGENCO Recruitment 2024)

1) सामान्य श्रेणी – 400 ( सामान्य – महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त इतर उमेदवार)
2) प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी – 160 ( महानिर्मिती कंपनीचे किमान 05 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार)
3) प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी – 160 (महानिर्मिती कंपनीचे 01 वर्षे ते 04 वर्षे कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार)
4)बी. टी. आ र. आय . साठीचे आरक्षण – 80 ( महानिर्मिती कंपनीच्या बी.टी.आर.आय अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवार)

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष

अर्ज पद्धती– ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख– 10 जानेवारी 2025

अर्ज कसा करावा? MAHAGENCO Recruitment 2024

या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेले आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अधिक माहितीकरिता इथे Click करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
https://mahagenco.in/