Home Blog Page 1076

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ४०० जागा

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर आणि ज्युनिअर कंसल्टंट (ऑपरेशन) पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर पदाच्या २१० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्पुटर सायन्स/ आयटी) अर्हताधारक असावा.

ज्युनिअर कंसल्टंट (ऑपरेशन) पदाच्या १९० जागा
शैक्षणिक पात्रता – आयटीआय (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ रेडिओ & टीव्ही/ इलेक्ट्रिकल & फिटर) अर्हताधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी ज्युनिअर टेक्निकल पदांसाठी ३० वर्ष आणि ज्युनिअर कंसल्टंट पदांसाठी २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – नाही.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही.

थेट मुलाखत – ज्युनिअर टेक्निकल पदांसाठी ९ नोव्हेंबर २०१८ रोजी (सकाळी ९:३०वाजता) आणि ज्युनिअर कंसल्टंट पदांसाठी ८ नोव्हेंबर २०१८ रोजी (सकाळी ९:३० वाजता) घेण्यात येईल.

मुलाखतीचे ठिकाण – विभागीय कार्यालय, १२०७, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई. दूरध्वनी:- ०२२-४२२४२४९/ २४२२३४४३

संबंधित संकेतस्थळ

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त ३ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा- २०१९ (CDS-I) मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I)- २०१९
भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल अॅकॅडमी मध्ये ४५ जागा, हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ जागा, ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई मध्ये २२५ जागा आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई मध्ये १५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा इंजिनिअरिंग पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९६ ते १ जुलै २००१ किंवा २ जानेवारी १९९६ ते १ जुलै २००० किंवा २ जानेवारी १९९५ ते १ जानेवारी २००१ दरम्यान झालेला असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला प्रवगातील उमेदवारांना फिस मध्ये पूर्णपणे सवलत.

परीक्षा – ३ फेब्रुवारी २०१९ रोजी लेखी परीक्षा घेणयात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०१८ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

सबंधित संकेतस्थळ

एम.बी.बी.एस./ बी.डी.एस. सामाईक प्रवेश परीक्षा (NEET-2019) जाहीर

देशातील अनुदानित आणि विना-अनुदानित महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०१९-२०१२० वर्षांकरिता एम.बी.बी.एस./ बी.डी.एस. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा NEET (UG)- 2019 मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा NEET (UG)- 2019

शैक्षणिक पात्रता – बारावी परीक्षा उत्तीर्ण (जीवशास्त्र/ रसायनशास्त्र/ भौतिकशास्त्र/ जैविकशास्त्र)

वयोमर्यादा –  उमेदवाराचा जन्म ५ मे १९९४ ते ३१ डिसेंबर २००२ दरम्यान झालेला असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग) उमेदवारांना ५ वर्ष सवलत.

परीक्षा फीस – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ७५०/- रुपये आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी १४००/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – १५ एप्रिल २०१९ पासून उपलब्ध होईल.

परीक्षा – ५ मे २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१८ आहे.

ऑनलाईन अर्ज करा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण २६ जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह दहावी/ बारावी उत्तीर्ण (इंग्रजी) किंवा डी.एड./ डी.टी.एड/ बी.एड.(इंग्रजी) किंवा MHTET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण २१ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ए., बी.एड. (इंग्रजी/ मराठी/ हिंदी/ समाजशास्त्र) किंवा बी.एस्सी.बी.एड.(गणित/ विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई

परीक्षा फीस – नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१८ आहे.

संबंधित संकेतस्थळ

तुम्ही सुंदर डान्स करता? मग त्यातच करिअर करा

करिअरमंत्रा | अनादी काळापासून भारताला नृत्याची महान परंपरा लाभली आहे. आजकाल रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून नृत्यप्रकार अगदी घराघरात पोहोचले आहेत. नृत्य हा पूर्णवेळ व्यवसाय असू शकतो, हेच मुळात कित्येकांना माहीत नसायचे. मात्र, आता परिस्थिती बदलते आहे. नृत्यकलेकडेसुद्धा एक चांगला करिअरचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. तरुण पिढी या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळते आहे.

नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान बारावी पास असणे अनिवार्य आहे. तसे पाहता, या क्षेत्राशी शिक्षणाचा संबंध कमी प्रमाणात येतो. हे क्षेत्र कौशल्यावर आधारित आहे. रिदमची समज, नृत्यातील सादरीकरणाचे टप्पे या गोष्टींना फार महत्त्व असते. आता यात पदवी आणि पदविकाही घेता येते. पीएच.डी ही पदवीही संपादन करता येते. बऱ्याचदा कलाकारांना ९-५ नोकरी करायला आवडत नाही, पण डान्स क्लास हा चांगला पर्याय ठरतो. नृत्यवर्गामुळे नियमित दरमहा विद्यार्थ्यांकडून फी मिळते, शिवाय डान्स क्लासबरोबर नृत्यसादरीकरण करणेही शक्य होते. आजकाल बहुतांश शाळांमध्ये नृत्य हा शैक्षणिक विषय म्हणून सामावून घेतला आहे. त्यामुळे विविध शाळांमध्येही नृत्य शिक्षकाची नोकरी करता येऊ शकते.

मुलांच्या मानसिकतेचा विचार करून, त्यांच्या कलाने घेऊन, त्यांच्यात नृत्याची गोडी निर्माण करणे, त्यांच्याकडून कार्यक्रमांची तयारी करून घेणे इ. अनेक गोष्टींची कसरत नृत्यगुरूला करावी लागते. अनुभव मात्र, नृत्यगुरूसाठी खूप महत्त्वाचा समजला जातो. विद्यार्थ्यांना शिकविल्याने नृत्यगुरू कलाकार म्हणूनही अधिक समृद्ध होतो, विद्यार्थ्यांकडूनही खूप शिकायला मिळते, हे मात्र निर्विवाद सत्य आहे! इतर विषयांप्रमाणे नेट-सेटची परीक्षा नृत्य विषयात उत्तीर्ण झाल्यावर, विविध नृत्य महाविद्यालयांत व विद्यापीठांतही नृत्यशिक्षक म्हणून नेमणूक होऊ शकते.

चित्रपटांमध्ये, पुरस्कार सोहळ्यांमध्ये पार्श्वनर्तक म्हणून नृत्य करणे हादेखील एक मोठा करिअरचा पर्याय आहे. असे अनेकविध पर्याय नृत्यक्षेत्रात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, कलाकार अजून वेगवेगळ्या करिअरच्या संधी नृत्यात निर्माण करत आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणेच हेदेखील झपाट्याने वाढणारे आणि आर्थिकदृष्ट्याही स्थिरता देणारे क्षेत्र आहे.

नृत्याचे दोन प्रकार पडतात. शास्त्रीय अथवा क्लासिकल आणि दुसरा लोकनृत्य अथवा फोकडान्स. या अभ्यासक्रमात सामान्य ज्ञानाबरोबर नृत्याच्या इतिहासाबद्दल शिकविले जाते. काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. पदव्युत्तर पदवी घेण्याच्या संधी अनेक विद्यापीठांत आहेत. नृत्य शिकविण्याबरोबर त्यातील बारकावे, धून ऐकून स्टेप शिकणे आदी बाबी त्यात समाविष्ट असतात. प्रात्यक्षिकाला फार महत्त्व राहते.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कला केंद्र, विविध टी.व्ही. चॅनेल, वेगवेगळ्या नृत्यसमूहात काम करू शकता. अनेक नृत्य महोत्सव जगभरात भरत असतात, त्यातही सहभागी होता येते. मालिका, अल्बम, चित्रपट नृत्यदिग्दर्शक, नृत्योपचार तज्ज्ञ म्हणूनही काम मिळेल. नेट सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अध्यापनही करता येते. परदेशात भारतीय नृत्य शिक्षकांना चांगली मागणी आहे. ज्यांचा स्वभाव उद्योगी आहे, ते स्वत:ची नृत्य संस्था काढू शकतात. आजकाल रिअ‍ॅलिटी शोसाठी नृत्य प्रशिक्षक हवे असतात. आता छोट्या शहरांतही कामाच्या संधी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल विविध पदांच्या १६१ जागा

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांच्या आस्थापनेवरील शिक्षक आणि शिक्षेकेतर पदाच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१८ आहे.

प्राचार्य पदाच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.ए./ एम.एस्सी सह बी.एड. आणि २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदाच्या एकूण ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी.बी.एड./ एम.ए.बी.एड./ MSCIT आणि CTET/ CET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) पदाच्या ६६ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी.बी.एड./ बी.एस्सी./ MSCIT आणि CTET/ CET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

क्रीडा शिक्षक (सह विषय शिक्षक) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – बीए/ बी.एस्सी./ बी.पी.एड. आणि MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अधीक्षक (पुरुष/ महिला) पदाच्या २३ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी/ एम.एस.डब्ल्यू आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ लिपिक (संगणक चालक) पदाच्या १३ जागा
शैक्षणिक पात्रता – बीए/ बी.कॉम./ बी.एस्सी. सह इंग्रजी टायपिंग ४० (श.प्र.मि.) व मराठी ३० (श.प्र.मि.) व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सेवक पदाच्या एकूण १३ जागा
शैक्षणिक पात्रता – विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे विषयक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ आक्टोंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – केवळ २०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०१८ आहे.

ऑनलाईन अर्ज करा

राज्यात लवकरच होणार तलाठी भरती

मुंबई | राज्यातील तलाठी संवर्गातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मागील दोन वर्षांपासून तलाठी भरती झाली नसल्याने त्यासंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मंत्री पाटील यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठी संघाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करुन, राज्यात लवकरच तलाठी भरती जाहीर करेल असे आश्वासन ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांना दिले.

व्हिडीओ एडिटिंग क्षेत्रात मोठ्या संधी

करिअरमंत्रा | दूरचित्रवाहिन्यांमुळे मनोरंजन क्षेत्राचा कायापालट झाला आहे. चित्रपटाबरोबरच टेलीव्हिजन इंडस्ट्रीची अब्जावधीत उलाढाल होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. जाहिरात असो किंवा व्हिडीओ एडिटिंग, जर आपली कल्पनाशक्ती दांडगी असेल आणि सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याची आवड असेल, तर व्हिडीओ एडिटिंगमध्ये तुम्ही यशस्वी करिअर करू शकता.

चित्रपट निर्मिती करणार्या प्रत्येक कंपनीत आणि स्टुडिओत एडिटरला मोठी मागणी आहे. फिल्म एडिटर हा व्हिडीओ एडिटिंगच्या माध्यमातून चित्रपटाला अंतिम आकार देत असतो. व्हिडीओ एडिटिंगअंतर्गत संपादनाची संकल्पना आणि त्याच्याशी निगडित असलेल्या गोष्टी विस्ताराने सांगितल्या जातात. जर आपल्यात दृश्य समजून घेऊन त्याचे तत्काळ मूल्यांकन करण्याची क्षमता असेल, तर आपल्यासाठी व्हिडीओ एडिटिंगचा अभ्यासक्रम करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अलीकडच्या काळात वाढत्या तंत्रज्ञानामुळे व्हिडीओ एडिटर्सची मागणी वाढली आहे. कारण टीव्हीवरचा कोणताही कार्यक्रम असो तो व्हिडीओ एडिटर्सशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. सध्या बाजाराची स्थिती पाहता, भविष्यात सुमारे एक लाख प्रशिक्षित व्हिडीओ एडिटरची गरज भासणार आहे. या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर जगात घडणार्या घडामोडी आणि बदलांचे आकलन करून, त्यास संपादन करण्याची हातोटी असायला हवी.

फुटेजचे कॅप्चरिंग, फुटेज एडिट करणे, कोणते दृश्य कोठे योग्य लागू पडते, संगीत आणि आवाजाला कशा प्रकारे मिक्स करू शकतो, या सर्व गोष्टी व्हिडीओ संपादनात पारंगत असलेला संपादक करू शकतो. यासाठी थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टींची गरज आहे. व्हिडीओ एडिटर्स अगोदर लिनियर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करत होते, आता व्हिडीओ एडिटिंगच्या माध्यमातून काम करत आहेत. यशस्वी व्हिडीओ एडिटर होण्यासाठी विविध विषयांचे आकलन असणे गरजेचे आहे. जेणेकरून दृश्यांचे आकलन झाल्यानंतर योग्य रीतीने साउंंड मिक्सिंग करता येईल. जे सतत कल्पनेच्या विश्वात रमलेले असतात आणि दृश्याच्या, विविध सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभावीपणे एडिटिंग करू इच्छितात, त्यांच्यासाठी व्हिडीओ एडिटिंग करिअरचा चांगला पर्याय ठरू शकतो.

पात्रता – सर्टिफिकेट कोर्स इन व्हिडीओ एडिटिंग अँड साउंंड रेकॉर्डिंग, तसेच डिप्लोमा इन पोस्ट प्रॉडक्शन अँड व्हिडीओ एडिटिंगसारखे अभ्यासक्रम तीन महिन्यांपासून ते तीन वर्षांपर्यंत आहेत. दीड वर्षापासून ते तीन महिन्यांचे शॉर्ट कोर्सही उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. मात्र, पदवी आणि पदविका घेण्यासाठी आपण एखाद्या विषयात पदवी घेतलेली असावी लागते. जर आपल्याला एखाद्या चॅनेलमध्ये नोकरी करायची असेल, तर पदवी असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विषयाचे सर्वांगीण ज्ञान असणे गरजेचे आहे.

संधी – अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर न्यूज, एंटरटेन्मेंट चॅनेल्स, प्रॉडक्शन हाउस, वेब डिझायनिंग कंपनी, म्युझिक वर्ल्ड, फीचर आणि जाहिरात, फिल्म आणि बीपीओ आदी क्षेत्रांत काम करता येते. या क्षेत्रात फ्रीलान्सिंगसाठीदेखील अधिक पर्याय आहेत. पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ, टेलीव्हिजन आदी क्षेत्रातदेखील शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्टवर काम करता येते. मनोरंजन आणि प्रसारमाध्यमांशी निगडित असलेल्या क्षेत्रात पैसा भरपूर आहे आणि संधीला वाव आहे. न्यूज, एंटरटेन्मेंट चॅनेल, म्युझिक इंडस्ट्री, फीचर आणि जाहिरात संस्था, चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. याशिवाय पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ, टेलीव्हिजन कंपन्या आदी ठिकाणीही शॉर्ट टर्म करारावर काम मिळू शकते. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर सतत अपडेट राहणे गरजेचे असते.

साईट सुपरवायझर – बांधकाम क्षेत्रातील करिअर संधी

आज बांधकाम क्षेत्राचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. घर घेणे ही सर्वांसाठी महत्त्वाची गरज झाली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात कामे करण्यासाठी अनेक लोकांची गरज पडत असते. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सर्वांचाच सहभाग या क्षेत्राला नेहमी लागत असतो. अशा सहभागी अनेकांपैकी एक म्हणजे ‘साईट सुपरवायझर’. बांधकाम क्षेत्रात सुपरवायझर व्यक्तीचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याशिवाय इमारतीचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे हल्ली या क्षेत्राकडे करिअर संधी म्हणून पाहिले जाते.

सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्रात इमारतीच्या उभारणीपासून ते रस्ते, पूल, फ्लायओव्हर्स, स्कायवॉक, रेल्वे इत्यादींचा समावेश होत असतो. प्रत्यक्ष कामाच्या उभारणीसाठी ‘साइट सुपरवायझर’ची गरज असते. अनेक ज्युनिअर, सिनिअर इंजिनीअर्स, आर्किटेक्ट, डिझायनर्स, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स व सप्लायर्स तसेच काम करून देणाऱ्या मजुरांमधील सुपरवायझर हा महत्त्वाचा दुवा मानला जातो. बांधकाम साहित्य कामाच्या ठिकाणी पोेहोचविण्यापर्यंतची सर्व कामे करून देण्याची जबाबदारी प्रत्येक साईटवरील सुपरवायझरची असते.
सर्वांत प्रथम काय काम करायचे आहे हे इंजिनीअर्सकडून समजावून घ्यावे लागते. त्यानुसार साहित्याची पूर्तता, लागणारे मजूर इत्यादींची जमवाजमव करून उभे राहून काम करून घेण्याची कला सुपरवायझरकडे असणे गरजेचे आहे. जी व्यक्ती योग्य पद्धतीने समन्वय साधू शकते, तीच व्यक्ती या साईट व्हिजन मानल्या गेलेल्या सुपरवायझरचे करिअर योग्य रीतीने पेलू शकते. स्वत: प्रात्यक्षिक केल्याने अनुभव वाढतो व आत्मविश्वास दांडगा होऊन भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होत राहते.

बिल्डिंग साईट सुपरवायझर म्हणून काम पाहण्यासाठी कमीतकमी दहावी-बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच बिल्डिंग मेन्टेनन्सचा कोर्स केला असेल तर उत्तमच. याचसोबत या व्यक्तीला कॉम्प्युटर, इंटरनेटचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे; कारण ती आजच्या काळाची गरज आहे.बिल्डिंग मेन्टेनन्स कोर्स केल्यानंतर बांधकाम क्षेत्रात अनुभवाने साईट सुपरवायझर होता येते. तसेच बिल्डिंग मेन्टेनन्सचा कोर्स करून प्रॅक्टिकल-थिअरी व प्रमाणपत्राची जोड मिळाल्याने या करिअरमध्ये भविष्य उज्ज्वल होण्यास मदत तर होतेच; पण पुढे काही वर्षांनी इमारतीच्या बांधकामाचे स्वतंत्र कॉन्ट्रॅक्ट घेऊन चांगला बिझनेस सुरू करता येतो. दहावी नापास व बारावी मुलांसाठी सुवर्णसंधी आहे. हल्ली साइटसाठी प्रशिक्षित सुपरवायझर मिळत नसल्याने बºयाच खासगी प्रशिक्षण केंद्रांत बिल्डिंग सुपरवायझर हा कोर्स सुरू केला असून तो दहावी व बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी आहे, ही त्यांच्या दृष्टीने एक सुवर्णसंधी आहे. तसेच अशा कोर्समध्ये इमारतीचा पाया, आरसीसी काम, बांधकाम, प्लॅस्टर, प्लंबिंग, पेन्टिंग, टायलिंग, पीओपी इत्यादी अनेक कामांचा समावेश होत असतो. बिल्डिंग सुपरवायझर हा कोर्स खासगी तसेच सरकारी आयटीआयमध्ये शिकविला जातो. आजकालची परिस्थिती बघितल्यास साईटसाठी प्रशिक्षित सुपरवायझरची कमी जाणवत असल्याने बºयाच खासगी प्रशिक्षण केंद्रांत हा कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स काही आठवड्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीपर्यंत शिकविला जातो. कोर्स पूर्ण केल्यानंतर कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी करता येते व पुढे जाऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू करता येतो.

भावी IAS अधिकार्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा मसुरी येथे संवाद

मसुरी | अमित येवले

भावी प्रशासकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसूरी येथे संवाद साधला. प्रशासनासमोर जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हे नेहमीच सनदी अधिकारी यांच्यावर असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी ‘नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून’ प्रयत्न करावे व त्याचप्रमाणे आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी दररोज स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका आणि त्यातून येणारे उत्तरदायित्त्व समजून घेऊन सर्वांच्या सहभागाने सनदी अधिकारी यांना काम करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री यांनी केले.

उत्तराखंडमधील मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ९३ व्या फाऊंडेशन कोर्समधील प्रशिक्षणार्थी आयएएस,आयपीएस आणि अन्य सेवांमधील अधिकारी तसेच मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामच्या चौथ्या फेजअंतर्गत प्रशिक्षणासाठी आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी नागरी प्रशासन, शेती क्षेत्रातील बदल, आयात-निर्यात धोरण, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आणि इतरही विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती व अनेक उत्तरे यावेळी दिली.