Home Blog Page 102

GK Update : भारतातील पुरुष नदी कोणती? जगातील पहिला मोबाईल कोणत्या कंपनीने बनवला?

GK Update 11 May

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – दुधामुळे शरीरासाठी कोणते नुकसान पोहचू शकते. (GK Update)
उत्तर – दूध हे कॅल्शियमचे समृद्ध स्रोत मानले जाते. ते जास्त प्रमाणात प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
प्रश्न 2 – भारतातील कोणत्या राज्यात पेरूचे सर्वाधिक (GK Update) उत्पादन घेतले जाते?
उत्तर – पेरूचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये होते.

प्रश्न 3 – जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोणते आहे?
उत्तर – लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशन, इंग्लंड – हे स्टेशन 15 सप्टेंबर 1830 रोजी स्थापन करण्यात आले. हे स्टेशन जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन मानले जाते.
प्रश्न 4 – भारतातील नद्यांपैकी पुरुष नदी कोणती? (GK Update)
उत्तर – ब्रह्मपुत्रा ही भारतातील नद्यांपैकी एक पुरुष नदी आहे.

प्रश्न 5 – जगातील पहिला मोबाईल कोणत्या कंपनीने बनवला?
उत्तर – जगातील पहिला मोबाईल मोटोरोला कंपनीने बनवला.
प्रश्न 6 – कोणत्या आजारात दूध पिऊ नये?
उत्तर – कावीळ, जुलाब आणि आमांश यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी दूध पिणे टाळावे.

प्रश्न 7 – कोणत्या प्राण्याचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे आहेत?
उत्तर – शहामृगाचे डोळे (GK Update) त्याच्या मेंदूपेक्षा मोठे आहेत.
प्रश्न 8 – भारतातील कोणत्या रेल्वे स्टेशनवर जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे?
उत्तर – जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कर्नाटकातील श्री सिद्धरुदा स्वामीजी स्टेशनवर आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCERT Recruitment 2024 : NCERT अंतर्गत ‘या’ पदावर नवीन भरती सुरू; 1,42,400 पर्यंत मिळेल पगार

NCERT Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक कार्यक्रम समन्वयक पदांच्या एकूण ०८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

संस्था – नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)
भरले जाणारे पद – सहाय्यक कार्यक्रम समन्वयक
पद संख्या – पदे
वय मर्यादा – 40 वर्ष (NCERT Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2024
अर्ज करण्यासाठी पत्ता – विभाग अधिकारी, भरती-II विभागाकडे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidate should have completed Post Graduation from any of the recognized boards or Universities.
मिळणारे वेतन – Rs. 44,900/ – ते Rs. 1,42,400/- दरमहा
असा करा अर्ज – (NCERT Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.
5. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (NCERT Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ncert.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CET Exam 2024 : लोकसभा निवडणुकांमुळे CET परीक्षा पुढे ढकलल्या; पहा सुधारीत तारखा

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशभरात लोकसभा निवडणुकांची (CET Exam 2024) रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CELL) पुन्हा एकदा परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. त्यानुसार सीईटी सेलने विधी ५ वर्ष, बी.ए., बी.एस्सी बी.एड यांसह 8 अभ्यासक्रमाच्या तारखांमध्ये बदल केला आहे. पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी(पी अँड ओ) या सीईटी परीक्षेच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अशा आहेत परीक्षेच्या सुधारीत तारखा (CET Exam 2024) –
सीईटी सेलने सुधारित वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. वास्तुकला अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा १२ मे रोजी होणार आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १७ मे रोजी होणार होती ती आता २४ मे रोजी होणार आहे. तसेच एलएलबी (5 वर्षे) अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १७ मे रोजी (CET Exam 2024) होणार होती ती आता २२ मे रोजी होणार आहे. बी. एस्सी नर्सिंगची सीईटी १८ मे रोजी होणार होती. ती परीक्षा आता २८ मे रोजी होणार आहे. बीएचएमसीटी सीईटीची २२ मे ची परीक्षा आता२४ मे रोजी होणार आहे. तसेच बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/ बीबीएम-सीईटी परीक्षा २९ मे रोजी, डीपीएन/पीएचएन सीईटी आणि एम प्लॅनिंग सीईटी परीक्षा २५ मे रोजी होणार आहे. सुधारित वेळापत्रकाची माहिती घेऊनच विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थित राहावे असे आवाहन कक्षाने केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्स उमेदवारांना पूर्व रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी संधी!!

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पूर्व रेल्वे अंतर्गत ‘गुड्स ट्रेन मॅनेजर’ पदांच्या (Railway Recruitment 2024) एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 27 मे 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.

संस्था – पूर्व रेल्वे
भरले जाणारे पद – गुड्स ट्रेन मॅनेजर
पद संख्या – 108 पदे (Railway Recruitment 2024)
वय मर्यादा – 47 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Railway Recruitment 2024)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 27 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduation Degree from a recognized University or its equivalent
मिळणारे वेतन – Level-5
असा करा अर्ज – (Railway Recruitment 2024)
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. अर्ज प्रक्रिया 27 मे 2024 पासून सुरु होईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
6. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rrcer.org/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : शिक्षक, लिपिक, ड्रायव्हर, शिपाई पदावर भरती; ‘या’ तारखेला होणार मुलाखत

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । आदर्श पब्लिक स्कूल, सांगली अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक शिक्षक, विशेष शिक्षक, पीई शिक्षक, रेक्टर, लिपिक/लेखापाल आणि ड्रायव्हर, शिपाई पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीची तारीख 15 मे 2024 आहे. तसेच उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन (E-MAIL) द्वारे 14 मे 2024 पर्यंत करायचे आहेत.

संस्था – आदर्श पब्लिक स्कूल, सांगली
भरले जाणारे पद – सहाय्यक शिक्षक, विशेष शिक्षक, पीई शिक्षक, रेक्टर, लिपिक/लेखापाल आणि ड्रायव्हर शिपाई
पद संख्या – 36 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Notification)
मुलाखतीचा पत्ता – आदर्श पब्लिक स्कूल (CBSE) विटा, कुंडल रोड, भवानीनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली-415311
मुलाखतीची तारीख –15 मे 2024

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित रहावे.
3. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहे.
4. मुलाखतीची तारीख 15 मे 2024 आहे.

असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
https://adarshcbsevita.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ग्रॅज्युएट्ससाठी शिक्षक सहकारी बँकेत नोकरीची मोठी संधी; अर्ज करा E-MAIL

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक सहकारी बँक, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदे (Job Alert) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर….

संस्था – शिक्षक सहकारी बँक, नागपूर
भरले जाणारे पद –
1. उपमहाव्यवस्थापक
2. व्यवस्थापक
पद संख्या – 15 पदे (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024
E-MAIL ID – [email protected]
नोकरी करण्याचे ठिकाण –
नागपूर
वय मर्यादा – 55 वर्षे

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
उपमहाव्यवस्थापक05
व्यवस्थापक10

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
उपमहाव्यवस्थापकMinimum L.L.B. For D.G.M legal post and Graduate for D.G.M. of other department posts with minimum 50% marks
व्यवस्थापकGraduate with minimum 50% marks.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या E-MAIL ID वरून अर्ज करायचा आहे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. (Job Alert)
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.shikshakbank.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CRPF Recruitment 2024 : गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय!! CRPF परीक्षा मराठीतून देता येणार

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय दलातील भरतीसाठी देशातील (CRPF Recruitment 2024) तरुण पिढी नेहमीच उत्सुक असते. परंतु हे तरूण इंग्रजी आणि हिंदी भाषेत द्याव्या लागणाऱ्या लेखी परीक्षेत मागे पडताना दिसतात. याचा परिणाम म्हणून केंद्रीय दलात नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न अर्धवट राहत आहे. याची दखल घेत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आता CRPF परीक्षा स्थानिक भाषेत देता येणार आहे. गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे CRPF परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठी भाषेचाही समावेश (CRPF Recruitment 2024)
सध्या देशात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कॉन्स्टेबल दलांतर्गत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा इंग्रजी, हिंदीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार आहे. यामध्ये मराठी भाषेचाही समावेश असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, CRPF कॉन्स्टेबल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रादेशिक भाषांमध्ये तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता मराठी भाषिक उमेदवारांना मराठी भाषेत पेपर लिहण्याची संधी मिळणार आहे.

या भाषेत देता येणार परीक्षा
कॉन्स्टेबल जीडी परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या (CRPF Recruitment 2024) जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. या परीक्षेसाठी देशभरातून लाखो उमेदवार बसतात. त्यामुळे या परीक्षेसंदर्भात गृहमंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोगाने एक सामंजस्य करार केला आहे. या करारात हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, उमेदवारांना मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमीळ, तेलगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी या भाषेत परीक्षा देता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pratiksha Kale : भारतीय वनसेवा परीक्षेत महाराष्ट्राची प्रतीक्षा काळे देशात दुसरी

Pratiksha Kale

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या (Pratiksha Kale) भारतीय वनसेवा परीक्षेत महाराष्ट्रातील प्रतीक्षा काळे हिने दूसरा क्रमांक पटकावला आहे. बुधवार (दि. 8 मे) रोजी हा निकल जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे, भारतीय वनसेवा परीक्षेत मराठी उमेदवारांचा टक्का देखील वाढल्याचं पहायला मिळत आहे. यावर्षी पहिल्या पाच क्रमांकामध्ये दोन मराठी महिलांचा समावेश झाला आहे. या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रतीक्षा काळे या मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागात सहाय्यक वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) बुधवारी जाहीर केलेल्या निकालात एकूण १४७ उमेदवारांची भारतीय वनसेवेतील (Indian Forest Services) पदांवर विविध श्रेणींमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या नियुक्त्या उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार केल्या जातील. काही वर्षांपूर्वीपर्यंत या परीक्षेत मराठी टक्का फार कमी होता; मात्र अलीकडच्या काही वर्षात हा टक्का वाढत आहे. एकूण उमेदवारांमध्येही मराठी उमेदवारांची संख्या वाढली आहे.

या यशाबद्दल बोलताना प्रतीक्षा काळे म्हणाल्या; “अभ्यासादरम्यान (Pratiksha Kale) वनखात्यातील वरिष्ठांनी केलेले सहकार्य, सेल्फ स्टडी, वेळेचे योग्य नियोजन यामुळे मला हे यश प्राप्त करता आले. संपूर्ण देशात दूसरा क्रमांक आल्याचा अभिमान तर आहेच, पण माझ्यामुळे महाराष्ट्राला हा बहूमान मिळाला याचा जास्त अभिमान आहे. संधी मिळाली तर जागतिक पातळीवर काम करण्याची इच्छा आहे.”

रेल्वे आणि रस्ता सुरक्षा, तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत म्हणाले; गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Pratiksha Kale) परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेत आहोत. प्रामुख्याने मुलाखतींसाठी आम्ही ही तयारी करुन घेतो. यावेळी १२० विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थ्याला भरपूर वेळ देता आला. भारतीय वनसेवेत मराठी टक्का वाढत आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : शेतकरी पुत्राने मिळवलं IAS पद; सलग तीनवेळा क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Ravi Sihag

करिअरनामा ऑनलाईन । भारतात दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा (UPSC Success Story) देवून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात. पण त्यापैकी फक्त एक हजारच उमेदवार त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या परीक्षेत कमी वेळात यश मिळवण्यासाठी लाखो उमेदवार कोचिंगची मदत घेतात, मात्र अनेक प्रयत्न करूनही बहुतांश विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवू शकत नाहीत. तर दुसरीकडे असं चित्र पहायला मिळतं की या परीक्षेत एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा यश मिळवलेले विद्यार्थी देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाबद्दल सांगणार आहोत. IAS रवी सिहाग (IAS Ravi Sihag) असं या तरुणाचं नाव आहे. त्यांनी भारतीय नागरी सेवा परीक्षेत सलग तीनवेळा यश मिळवलं आहे आणि ते त्यांच्या बॅचचे हिंदी माध्यमातून टॉपर देखील ठरले आहेत.

दोनवेळा क्रॅक केली UPSC
रवी सिहाग हे मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी 2021 मध्ये चौथ्या प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा पास केली आणि त्यांनी संपूर्ण भारतातून 18 वा क्रमांक मिळवला आहे. ते त्यांच्या (UPSC Success Story) बॅचचे हिंदी मीडियम टॉपरही ठरले आहेत. 2021 च्या आधीही त्यांनी दोनवेळा नागरी सेवा परीक्षा पास केली आहे. 2018 मध्ये त्यांनी 337 वी रँक मिळवली आणि 2019 मध्ये त्यांनी 317 वी रँक मिळवली आहे. यानंतर त्यांना अनुक्रमे इंडियन डिफेन्स अकाउंट्स सर्व्हिस (IDAS) आणि इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस (IRTS) मध्ये नियुक्ती मिळाली.

तिसऱ्या प्रयत्नात आले अपयश (UPSC Success Story)
रवी सिहाग यांना IAS अधिकारीच व्हायचं होतं, त्यामुळे त्यांनी पुन्हा UPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. पण तिसऱ्या प्रयत्नातही ते UPSC (UPSC) प्रिलिम्स परीक्षा पास करू शकले नाही. त्यांनी हार न मानता पुन्हा परीक्षेचा फॉर्म भरला. 2021 साली परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात त्यांनी अखिल भारतीय 18 वा क्रमांक मिळवून IAS पद मिळवले.

शेतकऱ्याच्या मुलाने नाव उंचावले (UPSC Success Story)
रवी सिहाग यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला आहे. ते मूळचे श्री गंगानगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते एका सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. रवी यांनी अनुपगढच्या शारदा कॉलेजमधून बी. ए. पूर्ण केले आहे. त्यांचे वडील सामान्य शेतकरी आहेत. रवी सिहाग UPSC ची तयारी करण्यापूर्वी पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Board Pune : 10 वीची परीक्षा फी महागली!! बोर्डाने परीक्षा शुल्कात केली 12 टक्यांनी वाढ

SSC HSC Board Pune

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (SSC HSC Board Pune) मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. या बदलानुसार जुलै- ऑगस्ट 2024 व मुख्य परीक्षा 2025 साठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना वाढलेल्या परीक्षा शुल्काचा भार सोसावा लागणार आहे.

रिपीटर व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढीव शुल्काचा तपशील राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे श्रेणी सुधारण्यासाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे; असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

अशी आहे वाढीव शुल्क आकारणी – (SSC HSC Board Pune)
राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना 470 रुपये परीक्षा शुल्क, 20 रुपये प्रशासकीय शुल्क, 20 रुपये गुणपत्रिका लॅमिनेशन शुल्क , वीस रुपये प्रमाणपत्र शुल्क , 10 रुपये प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय ),100 रुपये प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र विषय) , 130 रुपये खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (माहिती पुस्तिकेसह), खाजगी विद्यार्थी नोंदणी शुल्क 1 हजार 210 रुपये आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com