Pratiksha Kale : भारतीय वनसेवा परीक्षेत महाराष्ट्राची प्रतीक्षा काळे देशात दुसरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या (Pratiksha Kale) भारतीय वनसेवा परीक्षेत महाराष्ट्रातील प्रतीक्षा काळे हिने दूसरा क्रमांक पटकावला आहे. बुधवार (दि. 8 मे) रोजी हा निकल जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे, भारतीय वनसेवा परीक्षेत मराठी उमेदवारांचा टक्का देखील वाढल्याचं पहायला मिळत आहे. यावर्षी पहिल्या पाच क्रमांकामध्ये दोन मराठी महिलांचा समावेश झाला आहे. या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रतीक्षा काळे या मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागात सहाय्यक वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) बुधवारी जाहीर केलेल्या निकालात एकूण १४७ उमेदवारांची भारतीय वनसेवेतील (Indian Forest Services) पदांवर विविध श्रेणींमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या नियुक्त्या उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार केल्या जातील. काही वर्षांपूर्वीपर्यंत या परीक्षेत मराठी टक्का फार कमी होता; मात्र अलीकडच्या काही वर्षात हा टक्का वाढत आहे. एकूण उमेदवारांमध्येही मराठी उमेदवारांची संख्या वाढली आहे.

या यशाबद्दल बोलताना प्रतीक्षा काळे म्हणाल्या; “अभ्यासादरम्यान (Pratiksha Kale) वनखात्यातील वरिष्ठांनी केलेले सहकार्य, सेल्फ स्टडी, वेळेचे योग्य नियोजन यामुळे मला हे यश प्राप्त करता आले. संपूर्ण देशात दूसरा क्रमांक आल्याचा अभिमान तर आहेच, पण माझ्यामुळे महाराष्ट्राला हा बहूमान मिळाला याचा जास्त अभिमान आहे. संधी मिळाली तर जागतिक पातळीवर काम करण्याची इच्छा आहे.”

रेल्वे आणि रस्ता सुरक्षा, तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत म्हणाले; गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Pratiksha Kale) परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेत आहोत. प्रामुख्याने मुलाखतींसाठी आम्ही ही तयारी करुन घेतो. यावेळी १२० विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थ्याला भरपूर वेळ देता आला. भारतीय वनसेवेत मराठी टक्का वाढत आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com