SSC HSC Board Pune : 10 वीची परीक्षा फी महागली!! बोर्डाने परीक्षा शुल्कात केली 12 टक्यांनी वाढ

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (SSC HSC Board Pune) मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. या बदलानुसार जुलै- ऑगस्ट 2024 व मुख्य परीक्षा 2025 साठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना वाढलेल्या परीक्षा शुल्काचा भार सोसावा लागणार आहे.

रिपीटर व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढीव शुल्काचा तपशील राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे श्रेणी सुधारण्यासाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे; असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

अशी आहे वाढीव शुल्क आकारणी – (SSC HSC Board Pune)
राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना 470 रुपये परीक्षा शुल्क, 20 रुपये प्रशासकीय शुल्क, 20 रुपये गुणपत्रिका लॅमिनेशन शुल्क , वीस रुपये प्रमाणपत्र शुल्क , 10 रुपये प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय ),100 रुपये प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र विषय) , 130 रुपये खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (माहिती पुस्तिकेसह), खाजगी विद्यार्थी नोंदणी शुल्क 1 हजार 210 रुपये आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com