SET Exam 2024 : ‘या’ तारखेपासून सुरु होणार SET परीक्षेचे ऑनलाईन अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SET Exam 2024) वतीने घेण्यात येणारी सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा म्हणजेच सेटसाठी (SET) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याच आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेट परीक्षा अर्ज भरण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा लवकरच संपेल. यासाठी पुढील दोन दिवसातच सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल; अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

शेवटची ऑफलाईन सेट परीक्षा (SET Exam 2024)
विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे 39 वी सेट परीक्षा येत्या 7 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही शेवटची ऑफलाईन सेट परीक्षा ठरणार असून, त्यासाठी उमेदवारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. तर या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया येत्या दि. 12 जानेवारीपासून सुरु होण्याची शक्यता आहे. दि. 31 जानेवारीपर्यंत नियमीत शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यास वेळा दिला जाण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. परीक्षेचे हॉल तिकीट व इतर माहिती सेट विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे सेट परीक्षेचा अर्ज भरण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा लवकरच संपेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले (SET Exam 2024) पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. नेट परीक्षेप्रमाणेच सेट परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.परंतु, विद्यापीठातर्फे एप्रिल महिन्यात होणारी सेट परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. यानंतर होणारी 40 वी सेट परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. तसेच या परीक्षेच्या संदर्भातील वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर आनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे; त्याकडे विद्यार्थ्यांनी वेळोवेळी लक्ष द्यायचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com