करिअरनामा ऑनलाईन । मिर्झापूरच्या सानिया मिर्झा या मुलीने आपल्या (NDA Success Story) स्वप्नांना पंख लावून उंच उड्डाण केले आहे. हे उड्डाण देशातल्या इतर मुलींसाठी प्रेरणास्थान बनले आहे. सानिया ही मिर्झापूर जिल्ह्यातील जसोवर येथे राहणाऱ्या टीव्ही मेकॅनिकची मुलगी असून तिने NDA ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. लढाऊ वैमानिक (भारताची पहिली मुस्लिम महिला पायलट) म्हणून निवड झालेली ती भारतीय हवाई दलातील पहिली मुस्लिम मुलगी आहे.
पहिली मुस्लिम Fighter Pilot (NDA Success Story)
मिर्झापूर जिल्ह्यातील देहत कोतवाली भागातील जसोवर येथे राहणारी टीव्ही मेकॅनिक शाहिद अली यांची मुलगी सानिया मिर्झा हिने एनडीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जसोवरच्या या मुलीने देशात नावलौकिक मिळवला आहे. सानिया मिर्झाने गावातील पंडित चिंतामणी दुबे इंटर कॉलेजमधून प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने गुरुनानक इंटर कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेत जिल्ह्यात (NDA Success Story) अव्वल ठरली. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सेंच्युरियन डिफेन्स अॅकॅडमीमधून तिने तयारी केली. सानिया मिर्झाच्या जॉईनिंग लेटरनंतर कुटुंबीय आनंदी आहेत. येत्या 27 डिसेंबरला सानियाला खडकवासला पुणे येथे जाऊन NDAमध्ये सामील व्हायचे आहे.
वडिलांनी घेतली रात्रंदिवस मेहनत
मुलीला पैशांमुळे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सानिया मिर्झाचे वडील शाहिद अली यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी 8 तासांऐवजी 12 ते 14 तास मेहनत घेतली. आज मुलीने असे काम केले आहे, ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे ते सांगतात. तर ‘मुलगी जेव्हा अभ्यासाला (NDA Success Story) जायची तेव्हा रात्री खूप टेन्शन असायचे. आजूबाजूचे लोकही खूप काही सांगायचे, पण आज आम्हाला तिचा अभिमान असल्याचे सानियाची आई तबस्सुम मिर्झा यांनी सांगितले. आम्हालाही अभ्यास करायचा होता, पण अभ्यास करता आला नाही. आमच्या मुलीने गावाचे आणि जिल्ह्याचे नाव रोशन केल्याचे त्या कौतुकाने सांगतात.
महिलांसाठी 19 जागा राखीव (NDA Success Story)
नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी 2022 च्या परीक्षेत पुरुष आणि महिलांसाठी 400 जागा होत्या. ज्यामध्ये 19 जागा महिलांसाठी राखीव होत्या. फायटर पायलटसाठी दोन जागा राखीव होत्या. ज्यामध्ये सानिया मिर्झाने तिची जागा निश्चित केली आहे. यापूर्वी एकदा सानियाने परीक्षा दिली होती, जिथे ती पात्र ठरली नव्हती. दुसऱ्यांदा लेखी, मुलाखत, सीपीएस मेडिकल फिटनेस पात्रता मिळवून दोन जागांवर स्थान मिळवण्यात तिला यश आले.
सानियाचा मुलीच्या पालकांना सल्ला
सानिया म्हणाली की, “ज्या पालकांना वाटते की भरपूर पैसे जमवल्यानंतर आपल्या मुलींची लग्ने चांगल्या पध्दतीने पार पडतात; अशा पालकांनी हे साठवलेले पैसे मुलीच्या (NDA Success Story) शिक्षणासाठी आणि तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खर्च करणे चांगले आहे. मी परदेशात शिकतेय याबद्दल समाजात चर्चा व्हायची पण त्या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण नावं ठेवणारा समाज माझी फी भरत नाही. माझे आई-वडील माझ्यासोबत आहेत, कुटुंबातील सदस्य माझ्यासोबत आहेत, हे खूप आहे;” असेही ती सांगते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com