NCERT : 5वी पर्यंतची पुस्तके आता 22 भाषांमध्ये होणार उपलब्ध; शिक्षण मंत्रालयाची माहिती

करिअरनामा ऑनलाईन । शाळेत शिकवली जाणारी एनसीईआरटी (NCERT) पाठ्यपुस्तके आता भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत. शिक्षण मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ही पाठ्यपुस्तके भारतातील विविध 22 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या विषयावर सोमवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि एनईपी 2020 वर आधारित नवीन पाठ्यपुस्तके अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, एनसीईआरटीचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कवरील राष्ट्रीय सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते.

22 भाषांमध्ये उपलब्ध होणार पुस्तके (NCERT)
भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असल्याप्रमाणे 22 प्रादेशिक भाषांमध्ये नवीन एनसीईआरटी पाठ्यपुस्तके विकसित केली जातील. देशभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रादेशिक किंवा मातृभाषेत शिक्षण देणे हे शिक्षण मंत्रालयाच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्दिष्ट असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
एनसीईआरटीने विकसित केलेला ‘जादुई पिटारा’ हे (NCERT) अध्यापन-शैक्षणिक साहित्य मुक्त शैक्षणिक संसाधनांच्या रूपात प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढे नेले जाईल, असेही प्रधान यावेळी म्हणाले. याला एक जनचळवळ बनवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com