NCC Certificate Benefits : जाणून घ्या NCC ‘A’, ‘B’ आणि ‘C’ प्रमाणपत्राचे फायदे; NCC मध्ये सामील कसं व्हायचं?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशातील विद्यापीठांमध्ये NCC (NCC Certificate Benefits) एक पर्यायी विषय म्हणून समाविष्ट करण्यासाठी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) या संबंधात एक सूचना जारी केली आहे. उच्च शिक्षण संस्थांच्या कोर्समध्ये एनसीसी पर्यायी विषय म्हणून अंतर्भूत करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. एनसीसीचा पर्यायी विषय म्हणून उच्च शिक्षण संस्थांना एनसीसी ट्रुप्सशी संबंध असणे आवश्यक आहे.

यूजीसीच्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की NCC (National Cadet Corp) हा ऐच्छिक विषय म्हणून केवळ NCC कॅडेट म्हणून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच दिला जाऊ शकतो. सरकारने २०२१ मध्येच कॉलेजांमध्ये एनसीसी हा पर्यायी विषय म्हणून समाविष्ट करण्याची परवानगी दिली होती. संपूर्ण सीमा क्षेत्र विस्तार योजनेचा एक भाग म्हणून कॅडेट्सची अतिरिक्त संख्या अधिकृत करण्यात आलेल्या सीमावर्ती भागातील कॅडेट्सना लाभ मिळवून देण्याचा मुख्य हेतू आहे.

24 क्रेडिट पॉइंट्सचा आहे NCC कोर्स
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम (CBCS) नुसार ‘B’ आणि ‘C’ प्रमाणपत्रासाठी NCC अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. जे सहा सेमिस्टरमध्ये 24 क्रेडिट पॉइंट ऑफर करते. हे पाऊल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने आहे, जिथे विद्यार्थी केवळ संस्थांद्वारे ऑफर केलेल्या विषयांपुरते मर्यादित न राहता त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात.

NCC च्या A, B आणि C प्रमाणपत्राचे फायदे
NCC मध्ये सहभागी होण्याचे अनेक फायदे आहेत. एनसीसीचे प्रशिक्षण (NCC Certificate Benefits) पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाते. एनसीसी प्रमाणपत्रधारक उमेदवारांना सैन्य, पोलीस आणि इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये सूट दिली जाते. एनसीसी प्रमाणपत्रधारकांना महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्या वेळी सूट मिळते. याशिवाय पुढील शिक्षणासाठी एनसीसीमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांनाही शिष्यवृत्ती दिली जाते.

SSC CPO भरती परीक्षेत फायदा – (NCC Certificate Benefits)
NCC प्रमाणपत्राचा SSC CPO भरती लेखी परीक्षेतही चांगला फायदा होतो. सीपीओ भरती परीक्षेत बोनस गुण असे दिले जातात-

GD कॉन्स्टेबल आणि पोलीस भरती लेखी परीक्षेत मिळतात बोनस गुण
SSC GD कॉन्स्टेबल भरती लेखी परीक्षेत बोनस गुण दिले जातील. पोलिस विभागातही निरीक्षक आणि उपनिरीक्षक भरतीसाठीच्या लेखी परीक्षेत सूट आहे. बोनस पॉइंट अशा प्रकारे मिळवले जातात.
1. एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र – एकूण गुणांच्या 5%
2. NCC ‘B’ प्रमाणपत्र – एकूण गुणांच्या 3%
3. NCC ‘A’ प्रमाणपत्र – एकूण गुणांच्या 2%

NCC मध्ये कसे सामील व्हायचे?
NCC च्या वरिष्ठ विभागात नावनोंदणीसाठी, एखाद्या जवळच्या NCC युनिटच्या ऑफिसर कमांडिंगकडे विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागेल. कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये एनसीसी असेल (NCC Certificate Benefits) तर तिथे को-ऑर्डिनेटरही असतो; तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तर कनिष्ठ विभागात नावनोंदणीसाठी एखाद्याला शाळेच्या मुख्याध्यापक/मुख्याध्यापकांकडे अर्ज करावा लागतो.
NCC उप-युनिटशी संलग्न (NCC Certificate Benefits) नसलेल्या शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी देखील NCC मध्ये नावनोंदणी करू शकतात. ही नोंदणी खुल्या प्रवर्गातील आहे. यासाठी विद्यार्थ्यांना जवळच्या एनसीसी युनिटच्या कमांडिंग ऑफिसरशी संपर्क साधावा लागेल. अधिक माहितीसाठी NCC वेबसाइट https://indiancc.nic.in/how-to-join/ ला भेट द्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com