MSSC Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC Recruitment 2024) अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. या भरतीच्या माध्यमातून कायदेशीर सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन/EMAIL पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
भरले जाणारे पद – कायदेशीर सल्लागार (MSSC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /EMAIL
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
05 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजिंग संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एक वैधानिक महामंडळ महाराष्ट्र शासन), ३२ वा मजला, केंद्र १, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MSSC Recruitment 2024)
१. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी गहेळी असावी.
२. उमेदवाराची बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत असावे.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.mahasecurity.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com