MSC Bank Recruitment 2024 : मुंबईत मिळेल जॉब; महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ‘या’ पदांवर भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सहकारी बँक येथे विविध (MSC Bank Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. बँकेतील नोकरी सुरक्षित नोकरी समजली जाते त्यामुळे बँकेत नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. जे उमेदवार बँकेत नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी श्रेणी II आणि कनिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. पाहूया अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

बँक – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. अधिकारी श्रेणी II – 07 पदे
आवश्यक शैक्षणीक पात्रता – B.E/ B.Tech
2. कनिष्ठ अधिकारी- 18 पदे
आवश्यक शैक्षणीक पात्रता – B.E/ B.Tech
पद संख्या – 25 पदे (MSC Bank Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2024

वय मर्यादा – 31 जानेवारी 2024 रोजी 28 ते 35 वर्षापर्यंत
परीक्षा फी – 1770/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (MSC Bank Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mscbank.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com