करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाकडून (MPSC Update) विमा सहायक संचालक सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती येत्या दि. 9 मे रोजी होणार आहेत. आयोगाच्या मुंबई येथील कार्यलयात या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक इथे करा डाउनलोड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विमा सहायक संचालक गट-अ पद संवर्गाच्या (MPSC Update) मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करता येईल. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवाराला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
महत्वाची सूचना (MPSC Update) –
विमा सहायक संचालक निवड प्रक्रियेनुसार, मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील मुलाखत फेरीत उपस्थित रहावे लागेल. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार वेळापत्रक तपासू शकतात आणि त्यांना रोल नंबर, मुलाखतीची तारीख आणि वेळेनुसार उपस्थित राहावे लागेल. अधिकृत वेबसाइटवर नमूद केलेल्या रोल नंबर आणि नावानुसार उमेदवार मुलाखतीची तारीख आणि वेळ पाहू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com