करिअरनामा ऑनलाईन । राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची (MPSC Syllabus 2022) करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संदर्भात (MPSC Syllabus 2022) एमपीएसी नावाच्या ट्विटर हँडलवर माहिती देताना राज्यसेवा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे म्हणत आयोगाने या अभ्याक्रमाची पीडीएफही संकेतस्थळावर उपलब्द करुन दिली आहे.
एमपीएससीने काही दिवसांपूर्वी राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक होईल अशी घोषणा करून त्याचे प्रसिद्धपत्रक काढले होते. आता आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबतचा निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने जाहीर केला आहे. सदर प्रसिद्धीपत्रकाच्या अनुषंगाने राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा इंग्रजी भाषेतील सविस्तर अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे CLICK करा – PDF
राज्यसेवा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://t.co/LQu3gV3k94 https://t.co/Zq9oANzyew pic.twitter.com/dCVadjPdyJ
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 21, 2022
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com