करिअरनामा ऑनलाईन । राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल (MPSC Result) लागला आहे. या परीक्षेत प्रमोद चौगुले यांनी सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक मिळवला आहे. मागच्या वर्षीही त्यांचा पहिला क्रमांक आला होता. मात्र तेव्हा त्यांना हवी असलेली पोलीस उपअधीक्षक ही पोस्ट नसल्याने त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि आता पुन्हा त्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे.
या निकालानंतर बोलताना प्रमोद चौगुले म्हणाले, “मागच्या वर्षी माझा पहिला क्रमांक आला होता. पण हवी ती पोस्ट न मिळाल्यामुळे मी पुन्हा परीक्षा दिली. खरंतर अभ्यास थांबला नव्हताच. कारण (MPSC Result) मला पोस्ट वेगळी हवी होती. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवलं आणि आज हे यश मला मिळालं.”
अखेर मनासारखं यश मिळालं (MPSC Result)
प्रमोद चौगुले यांना मुलाखत फेरीत 70 मार्क पडले आहेत. आता ते पोलीस उपअधीक्षक या पदावर रुजू होणार आहेत. सध्या त्यांचं नागपुरात उपसंचालक (उद्योग) या पदाचं प्रशिक्षण सुरू आहे. 2015 पासून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. यशा अपयशाच्या खेळानंतर यावर्षी त्यांना मनासारखं यश मिळालं आहे. गेल्या परीक्षेत त्यांचा क्रमांक एक मार्काने हुकला होता. त्यानंतर 2020 आणि 2021 च्या परीक्षेत ते राज्यातून पहिले आले.
कोरोना आणि पुराच्या संकटावर केली मात
हा प्रवास प्रमोद यांच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. 2020 रोजी कोरोना काळात सांगलीत पूर आला होता. तेव्हाच त्यांच्या घरचे सगळे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. प्रमोद एकटे (MPSC Result) अभ्यास करत होते. अशा बिकट परिस्थितीत मार्ग काढून त्यांनी हे यश मिळवलं. 2021 च्या परीक्षेत घरची परिस्थिति सुरळीत झाली असली तरी अनेक चढ उतार आलेच. तरीही कुटुंबियांच्या साथीने त्यांनी हे यश मिळवलं.
प्रमोद यांची भावूक प्रतिक्रिया
“कधीकधी सगळं सोडून द्यावंसं वाटायचं. मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. स्वत:पेक्षा घरच्यांचा जास्त पाठिंबा मिळाला. घरच्यांनीही माझ्या निराशेच्या सुरात सूर मिसळले असते तर (MPSC Result) आज हा दिवस पहायल मिळाला नसता. मी खूप अपयश पाहिलं आहे. आता मात्र छान वाटतंय. परीक्षेचा प्रवास इथेच संपला असला तरी पुढचा प्रवास आता सुरू झाला आहे;” अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुलींमधून सोनाली मात्रे प्रथम
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यात प्रमोद चौगुले राज्यात पहिला आला आहे. तर मुलींमधून सोनाली मात्रे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ही यादी केवळ तात्पुरत्या स्वरुपाची असून विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे सादर करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो असं आयोगाने म्हटलं आहे. उपजिल्हाधिकारी, उपअधीक्षक (MPSC Result) आणि तहसीलदार यांच्यासह 405 जागांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. 2023 च्या राज्यसेवेची जाहिरात आली असून त्यासाठी 28 मार्च ही शेवटची तारीख आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com