करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेनंतर आता विविध 16 संवर्गाच्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
पद संख्या – 303 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023
भरतीचा तपशील – (MPSC Recruitment 2023)
1) उपजिल्हाधिकारी, गट-अ – 09 पदे
2) सहायक राज्यकर आयुक्त, गट-अ – 12 पदे
3) उप मुख्य कार्यकारी /गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ – 36 पदे
4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – 41 पदे
5) सहायक कामगार आयुक्त, गट-अ – 01 पद
6) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ – 51 पदे
7) सहायक आयुक्त गट गट-अ, कौशल्य विकास रोजगार – 02 पदे
8) सहायक आयुक्त गट गट-अ/मुख्याधिकारी नगरपालिका परिषद गट-अ – 07 पदे
9) मंत्रालीयन विभागातील कक्ष अधिकारी, गट ब – 17 पदे
10) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी – 01 पद
11) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब – 50 पदे
12) मुख्याधिकारी, गट-ब – 48 पदे
13) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब – 09 पदे
14) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – 04 पदे
15) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट-ब – 11 पदे
16) उद्योग अधिकारी (तांत्रिक) – 04 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.
2. सहायक प्रादेशिक (MPSC Recruitment 2023) परिवहन अधिकारी, गट-ब – भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
3. उद्योग अधिकारी (तांत्रिक) – विज्ञानअभियांत्रिकी पदवी, विज्ञान शाखेतील पदवी
4. उर्वरित पदे – पदवीधर किंवा समतुल्य.
अर्ज फी –
अमागास प्रवर्ग: ₹544/-
[मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹344/- ]
परीक्षेची तारीख –
वरील पदासाठी परीक्षा दि. 20, 21 व 22 जानेवारी 2024 रोजी होतील.
काही महत्वाच्या लिंक्स – (MPSC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com