MPSC Rajya Seva Bharti 2022: मोठी बातमी! राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; 161 रिक्त पदांची होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 (MPSC Rajya Seva Bharti 2022) मधून भरण्यात येणाऱ्या सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदांच्या एकूण 161 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे. कोरोना काळानंतर आयोगाने मोठया पदभरतीची घोषणा केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (MPSC Rajya Seva Bharti 2022)

Table of Contents

21 ऑगस्टला पूर्व परीक्षा होणार –

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. राज्य सेवा आयोगाची 2022 साठीची पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या अंतर्गत एकुण 161 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. राज्यातल्या 37 केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार आहे. वित्त आणि लेखा सेवा गट अ सहाय्यक संचालक, नगरपालिका- नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क विभाग गट ब या आणि बालविकास विभागाच्या पदांसाठी ही पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे.

जानेवारी 2023 मध्ये मुख्य परीक्षा-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या या पूर्व परीक्षेत गट ‘अ’ मध्ये 59 आणि गट ब मध्ये 14 पदांसाठी तसेच इतर 88 पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. 21 ऑगस्ट 2022 रोजी पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर जानेवारी 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. 21 जानेवारी ते 23 जानेवारी किंवा त्यानंतर आयोगाकडून मुख्य परीक्षा आयोजित करण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, ही जाहिरात आयोगाच्या वेबसाईटवर आज प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. या जाहिरातीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून परीक्षेसाठी तयारी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. (MPSC Rajya Seva Bharti 2022)

परीक्षेचे नाव – राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022

पदाचे नाव –
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा : एकूण पदे 09

मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद : 22 पदे

बाल विकास प्रकल्प अधिकारी : 28 पदे

सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क : 02 पदे

उप अधीक्षक, राज्य उत्पादन शु्ल्क : 03 पदे

कक्ष अधिकारी : 05 पदे

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी : 04 पदे

निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था व अन्य : 88 पदे

पद संख्या – 161 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क – (MPSC Rajya Seva Bharti 2022)

  • अमागास – रु. 544/-
  • मागासवर्गीय – रु. 344/-

वयोमर्यादा –

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 मे 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

अधिक माहिती करिता PDF बघा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com