MPSC News : MPSC परिक्षेत गोंधळात गोंधळ; बायोमेट्रिक मशिन बंद पडल्याने विद्यार्थी हैराण

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एमपीएससी हॉल तिकीट लिक (MPSC News) प्रकरणानंतर ही परिक्षा रद्द होते की काय; याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कोणताही डाटा लिक झाला नसून उमेदवारांची माहिती सुस्थितीत असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आल्यानंतर परीक्षेला हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे आज रविवार दि. 30 एप्रिल रोजी परिक्षेला सुरुवात झाली आहे. या दरम्यान बायोमेट्रिक मशिनवर हजेरी घेत उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता. यावेळी काही ठिकाणी बायोमेट्रिक मशिनच बंद पडल्याने उमेदवारांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर मात्र सरसकट उमेदवारांना परिक्षा केंद्रात सोडण्याचा निर्णय एमपीएससीकडून घेण्यात आला. त्यामुळे झालेला गोंधळ थांबला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आज रविवार दि. 30 एप्रिल रोजी अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा घेण्यात येत आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील एकूण 1 हजार 475 परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या परिक्षेसाठी राज्यभरातून सुमारे 4 लाख 67 हजार 85 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यापैकी साधारणपणे 80 टक्के उमेदवारांची (MPSC News) परीक्षेला उपस्थिती आहे. तर एमपीएससी हॉल तिकीट लिक प्रकरणानंतर ही परिक्षा रद्द होते की काय अशी धाकधुक उमेदवारांमध्ये होती. मात्र कोणताही डाटा लिक झाला नसून उमेदवारांची माहिती सुरक्षित असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली. त्यानंतर आज परिक्षेला सुरूवात झाली आहे. तर बायोमेट्रिक मशिनवर हजेरी घेत उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता. यावेळी काही ठिकाणी बायोमेट्रिक मशिन बंद पडल्याने उमेदवारांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर मात्र सरसकट उमेदवारांना परिक्षा केंद्रात सोडण्याचा निर्णय एमपीएससीकडून घेण्यात आला; त्यामुळे झालेला गोंधळ वेळीच थांबला.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com