MPSC News : लिपिक-टंकलेखक पदाच्या भरतीबाबत महत्वाची अपडेट; MPSC च्या ‘या’ निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

MPSC News (8)
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अराजपत्रित (MPSC News) गट-ब व गट-क संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२३ मधील लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदाचा निकाल जाहीर केला. अनेक दिवसांपासून या निकालाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर  जवळपास चार महिन्यांनंतर हा निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर करताना आयोगाकडून राज्यस्तरावर एकच कटऑफ लावण्यात आला आहे. तसेच बारा पटीत ८४ हजार ४०८ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील, असे अपेक्षित होते. मात्र आयोगाने ९५ हजार ५४७ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र ठरवले आहे. आयोगाने लावलेल्या निकालात पहिल्यांदाच कटऑफ १९ गुणांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गट ब आणि गट क संवर्गातील ८ हजार १६९ विविध (MPSC News) पदांसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. त्यापैकी लिपिक-टंकलेखक संवर्गातील ७ हजार ३४ पदांसाठी परीक्षा झाली. लिपिक- टंकलेखक पदासाठी विभाग प्राधिकरणातर्फे हाय कटऑफ लावण्यात येणार होता. एकूण २४ शासकीय विभागांची पदे असून, २८० पोटविभाग किंवा प्राधिकरण आहेत. उमेदवार अर्ज करताना या २८० प्राधिकरणांपैकी किमान एक किंवा सर्व २८० प्राधिकरण विकल्प म्हणून सिलेक्ट करू शकतात. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी लागणारा कटऑफ कमालीचा वाढू शकतो अशी भीती होती.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com