करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या (MPSC Exam Schedule 2024) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पुढील वर्षी, २०२४ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 28 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा दि. 14 ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास उमेदवारांना योग्य रितीने करता येण्यासाठी एमपीएससीकडून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार 2024 मध्ये एमपीएससीतर्फे 16 परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांचा समावेश आहे. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे.
माहितीनुसार शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होणार आहे. रिक्त पदांचा तपशील जाहिरातीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे वेळापत्रक संभाव्य असून त्यामध्ये बदल होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. असा बदल झाल्यास त्याबाबतची माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांचा समावेश आहे. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
परीक्षेच्या संभाव्य तारखा – (MPSC Exam Schedule 2024)
1. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ष पूर्व परीक्षा – दि. 17 मार्च 2024
2. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – दि. 18 एप्रिल 2024
3. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा – दि. 16 जून 2024
4. राज्यसेवा मुख्य परीक्षा – दि. 14 ते 16 डिसेंबर 2024
5. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – दि. 23 नोव्हेंबर 2024
6. अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा – दि. 9 नोव्हेंबर 2024
7. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – दि. 23 नोव्हेंबर 2024
8. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – दि. 23 नोव्हेंबर 2024
9. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – दि. 28 ते 31 डिसेंबर 2024
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com