MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचे नियुक्ती साठी ‘उपोषण’

करिअर नामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल येऊन आता जवळपास दीड वर्ष झाले. मात्र, उत्तीर्ण झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही. याकारणास्तव अधिकारीपदी निवड झालेल्या उमेदवार पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे उद्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

एप्रिल २०१७ मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल मे २०१८ मध्ये जाहिर करण्यात आला. सदर निकालावर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे न्यायालयीन निर्णय प्रक्रियेमुळे या उमेदवारांचे प्रशिक्षण व नियुक्ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारांच्या प्रशिक्षण व नियुक्ती देण्याबाबत राज्य शासन न्यायालयाच्या निर्णयासाठी थांबले होते व न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेच नियुक्ती देऊ असे उमेदवारांना सांगण्यात आले होते. मात्र, मागील महिन्यात न्यायालयाने याबाबत निर्णय जाहीर करुन देखील आता महिना उलटून गेला. परंतु, अजूनही उमेदवार नियुक्तीच्याच प्रतीक्षेत आहेत.

स्थळ-: विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

वेळ- सकाळी [१०:००AM] 

दिनांक-: 06 सप्टेंबर 2019