MPKV Recruitment 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘या’ पदावर नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी (MPKV Recruitment 2024) भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. जाणून घेवूया पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (MPKV Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, समोर. श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर 416 005.

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) यंग प्रोफेशनल II – 01 पद
पात्रता : कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी / प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी / अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी इ. मध्ये M. Tech. Agril. Engg. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र (आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन/ वनस्पती शरीरविज्ञान) / कृषीशास्त्र मध्ये M. Sc. Agriculture किंवा M. Sc. रसायनशास्त्र/जैवतंत्रज्ञान
2) यंग प्रोफेशनल I – 02 पदे
पात्रता : B. Tech. Agril. Engg., B. Sc. Agriculture, B. Sc. Chemistry/ Biotechnology सह किमान तीन वर्षांचा अनुभव
परीक्षा फी – 500/- रुपये
मिळणारे वेतन – 25,000/- रुपये ते 35,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (MPKV Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
www.mpkv.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com