करिअरनामा ऑनलाईन । शिकवणे ही काही शिक्षकांची गरज आहे तर काहींची आवड. शिक्षकांच्या (Motivational Story) तळमळीचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. अशा शिक्षकांचा एकच उद्देश असतो – जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षित करणे, आपल्याकडचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना भविष्यासाठी तयार करणे. निवृत्तीचा काळ अशा शिक्षकांसाठी फार महत्वाचा नसतो. तसेच त्यांच्यासाठी वाढत्या वयाची मर्यादाही लागू पडत नाही. नोकरीतील निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत राहणं हे उद्दिष्ट्य अशा शिक्षकांसाठी महत्वाचं बनलेलं असतं. आज आपण अशाच एका शिक्षेकेची प्रेरणा देणारी कहाणी वाचणार आहोत. त्यांचं नाव आहे प्रोफेसर चिलुकुरी संतम्मा. प्राध्यापक संतम्मा भौतिकशास्त्र शिकवतात. हा विषय त्यांची आवड आहे आणि शिकवणे हा त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे.
93 वर्षांच्या संतम्मा –
प्रोफेसर संतम्मा या 93 वर्षांच्या आहेत. त्यांना निवृत्त होऊन जवळपास 33 वर्षे झाली आहेत. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना कुबडी घेऊन चालावं लागतं. मात्र, एवढं सगळं असूनही त्या आजही अगदी पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना शिकवतात.
“…शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणं” (Motivational Story)
आंध्र प्रदेशातील विजयानगरम येथे असणाऱ्या सेच्युरियन विद्यापीठात गेल्या 60 वर्षांपासून त्या शिकवतात. फिजिक्स हा त्यांचा विषय आहे. दी न्यू इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत संतम्मा यांनी सांगितलं, की “वय हा माझ्यासाठी केवळ एक आकडा आहे. माझ्या आई वन्जक्शम्मा 104 वर्षे जगल्या. आपले आरोग्य आपल्या मेंदूवर ठरते, आणि आपली (Motivational Story) संपत्ती आपल्या हृदयावर. त्यामुळे नेहमीच मेंदू आणि हृदय या दोन गोष्टी निरोगी ठेवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. मी काही स्वतःची तुलना थेट अल्बर्ट आईनस्टाईनशी नाही करत. मात्र, मी इथे एका उद्देशासाठी आले आहे. ते म्हणजे, शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणं”; असं प्रोफेसर संतम्मा म्हणाल्या.
असं घडलं करिअर
8 मार्च 1929 साली मछलीपट्टणम येथे संतम्मा यांचा जन्म झाला. त्या केवळ 5 महिन्यांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या मामाने त्यांचं पालन पोषण केलं. 1945 साली त्या एव्हीएन कॉलेज, विशाखापट्टणम येथे बारावीचं शिक्षण घेत होत्या. या वेळी त्यांना महाराज विक्रम देव वर्मा यांच्या हस्ते फिजिक्ससाठी गोल्ड मेडल मिळालं होतं. पुढे आंध्र (Motivational Story) युनिव्हर्सिटीमधून त्यांनी फिजिक्स विषयात बीएससी केलं. पुढे त्यांनी मायक्रोवेब स्पेक्ट्रोस्कोपी विषयात डी.एस. सी. पूर्ण केलं. ही पदवी पी. एच. डी. समान पदवी आहे. 1956 साली फिजिक्सच्या लेक्चरर म्हणून त्यांनी आंध्र युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ सायन्समध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली.
चालता-बोलता एनसाक्लोपीडिया
60 वर्षं वय झाल्यानंतर, 1989 साली संतम्मा सेवानिवृत्त झाल्या. मात्र, त्यांनी शिकवणं थांबवलं नाही. आजही त्या दिवसाला सहा लेक्चर घेऊ शकतात. विद्यार्थ्यांवरही याचा भरपूर प्रभाव पडतो. ते संतम्मा (Motivational Story) यांचं लेक्चर आजिबात चुकवत नाहीत. संतम्मा कधीही आपल्या क्लासला उशीरा पोहचत नाहीत. फिजिक्सशिवाय त्यांना वेद, पुराण, उपनिषदं अशा विषयांचीही आवड आहे. त्यांनी गीतेमधील श्लोकांचं इंग्रजी भाषांतर करून ‘भगवद्गीता दी डिव्हाईन डायरेक्टिव्ह’ हे इंग्रजी पुस्तकही प्रकाशित केलं आहे. विद्यार्थी त्यांना चालता-बोलता एनसाक्लोपीडिया म्हणतात.
अनेक संस्थांमध्ये केलं काम
शिकवण्याच्या पेशाबरोबर संतम्मा यांनी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च, युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा कित्येक सरकारी संस्थांमध्येही काम केलं आहे. भौतिकशास्त्राव्यतिरिक्त त्यांना वेद, पुराणे, उपनिषदांमध्येही रस आहे. गीतेच्या श्लोकांचे इंग्रजीत भाषांतर करून भगवदगीता – द डिव्हाईन डायरेक्टिव नावाचे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले आहे.
दानशूर संतम्मा
प्राध्यापक संतम्मा केवळ ज्ञानदानच करत नाहीत तर त्यांनी राहते घर विवेकानंद मेडिकल ट्रस्टला दान केले आहे. त्या सध्या भाड्याच्या घरात राहतात. त्यांचा दिवस पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होतो. प्रोफेसर (Motivational Story) संतम्मा सांगतात की त्या एका दिवसात 6 क्लास घेऊ शकतात. सोबतच, त्यांनी विवेकानंद मेडिकल ट्रस्टला आपल्या मालकीचं घरही दान केलं आहे. सध्या त्या भाडे देऊन घरात राहतात. संतम्मा या खऱ्या अर्थाने वचनबद्धता, समर्पण या शब्दांचं एक जिवंत उदाहरण आहेत. त्यांचा आदर्श सध्याच्या इतर शिक्षकांनी, आणि सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी घेणे गरजेचे आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com