MHT CET Results 2023: MHT CET परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर होणार

करिअरनामा ऑनलाईन । अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र (MHT CET Results 2023) पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्य समाईक प्रवेश परीक्षेचा म्हणजेच एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पद्धतीने प्रवेश फेऱ्यांची सुरुवात निकाल जाहीर झाल्यानंतर होणार आहे. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर होताच जाहीर केले जाणार आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे.

प्रवेशासाठी होणार मोबाईल अॅपचा वापर
प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार असून प्रथमच मोबाईल अॅपमार्फत उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत विविध टप्प्यांची (MHT CET Results 2023) माहिती तसेच सूचना आणि जागा वाटप अशी माहिती अॅपच्या माध्यमातून उमेदवारांना मिळणार आहे. या मोबाईल अॅपचा विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे (MHT CET Results 2023)
प्रवेश प्रक्रिया राबविताना अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजेच API प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. सदर APIद्वारे बारावी गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता लागणारा सात-बारा उतारा. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र दाखले यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

दोन सत्रात झाली होती परीक्षा
राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी 9 ते 21 मे या कालावधीत घेण्यात आली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान घेण्यात आली होती. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 ते 20 मे या कालावधीत पार (MHT CET Results 2023) पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या मान्यतेबाबत संस्था, महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीमध्ये (MHT CET Results 2023) कळविण्यात येणार आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना अॅपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन पालक तसेच उमेदवारांच्या समस्या व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रादेशिक संवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटीच्या निकालाकडे लागले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com