MGNREGA Recruitment 2023 : 8 वी ते 10 वी पास तरुणांनो..’इथे’ नोकरीसाठी आजच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण (MGNREGA Recruitment 2023) रोजगार हमी योजना, रायगड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमुळे 8 वी ते 10 वी पास तरुणांना नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रायगड
भरले जाणारे पद – संसाधन व्यक्ती
पद संख्या – 100 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप जिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग
नोकरी करण्याचे ठिकाण – रायगड

वय मर्यादा – 18 ते 50 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 8 वी किंवा 10 वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज – (MGNREGA Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्जा सोबत आवशक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
2. मुलाखतीसाठी (MGNREGA Recruitment 2023) उमेदवाराने स्वखर्चाने यायचे आहे.
3. मुलखातीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी.
4. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे CLICK करा – Application Form
अधिकृत वेबसाईट – mahaegs.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com