Mahavitaran Recruitment 2023 : 10 वी पास असाल तर आजच अर्ज करा; महावितरणमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2023) लिमिटेड, गडचिरोली येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / तारतंत्री/ COPA) पदांच्या एकूण 109 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गडचिरोली

भरली जाणारी पदे – शिकाऊ उमेदवार

  1. विजतंत्री – 54 पदे
  2. तारतंत्री – 42 पदे
  3. कोपा – 13 पदे

पद संख्या – 109 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली

वय मर्यादा – (Mahavitaran Recruitment 2023)

18 ते 32 वर्ष

मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथील (Mahavitaran Recruitment 2023)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता 10 वी उत्तीर्ण.
2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण

आवश्यक कागदपत्रे –

  1. एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री / तारतंत्री चार सत्र (4 सेमीस्टर ) / व कोपा या व्यवसायातील दोन सत्रांची (2 सेमीस्टर) उत्तीर्ण गुणपत्रिकेची मुळ प्रत.
  2. आधारकार्ड
  3. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहीवासी प्रमाणपत्र (Mahavitaran Recruitment 2023)
  4. इतर सर्व अनुषंगीक आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करुन अपलोड करावे व सुसंगत असलेली माहिती भरावी.

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्र उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.org.in या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करीता दि. 15.02.2023 (00.00 तासापासुन) ते दि. 20.02.2023 (24.00 तासापर्यंत) विभाग निहाय आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करावे.
  3. वरील कालावधीत ऑनलाईन (Online) अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही
  4. उमेदवारांनी संकेतस्थळावर Online Registration ची नोंदणी के त्याची प्रत (https: // www. apprenticeshipindia.org.in) व शैक्षणिक अर्हता धारण गुणपत्रिका / प्रमाणपत्राची साक्षांकीत केलेली छायांकीत प्रतीसह आपला अर्ज दि. 15.02.2023 ते दि. 22.02.2023 पर्यंत संबंधीत कार्यालयास सादर करावे व जे उमेदवार आपले संपूर्ण दस्ताऐवजासह संबंधित कार्यालयास अर्ज सादर करणार नाही त्या उमेदवारांची प्रशिक्षणाकरिता निवड करण्याबाबत विचार करण्यात येणार नाही. (Mahavitaran Recruitment 2023)
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

Mahavitaran Recruitment 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com