Maharashtra Shikshak Bharti 2022 : आनंदाची बातमी!! शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; 1,293 पदे भरली जाणार

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांतील प्राध्यापकांच्या वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागला आहे. या शिक्षकांची एकूण 1,293 पदे भरली जाणार आहेत. (Maharashtra Shikshak Bharti 2022) राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील एक हजार 293 वाढीव पदांपैकी एक हजार 28 पदांची माहिती मंत्रालयात सादर केलेली असून उर्वरित 265 पदांची माहिती देखील दोन दिवसांत मंत्रालयात सादर केली जाणार आहे, असे आश्वासन राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांतील प्राध्यापकांच्या वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागणे निश्चित झाले आहे.

पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पुढाकारातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ पदाधिकारी आणि राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यात पुणे येथे झालेल्या बैठकीत वाढीव पदांच्या प्रश्नावर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस महासंघ अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर, कोषाध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर, माजी अध्यक्ष प्रा. भास्कर जऱ्हाड, प्रा. लिपाने उपस्थित होते. आय. टी. विषय शिक्षकांची माहिती यापूर्वीच मंत्रालयात पाठविण्यात आली असल्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न –

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांचे सोबत एकत्रित पाठपुरावा करत असल्याचे डॉ. तांबे यांनी यावेळी सांगितले. रिक्त पदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी लवकरच अभियोग्यता परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संचालकांनी सांगितले.

शिक्षक मान्यता, शालार्थ ID, अनुदानित संस्थेत शिक्षकांना परिविक्षाधीन आणि नियमित वेतन श्रेणीतील मान्यता एकाच वेळी देण्यात यावी, वेतन राष्ट्रियकृत बँकेमार्फत अदा करण्यात यावे, सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, पीएफ, डीसीपीएस; एनपीएस पावत्या नियमितपणे मिळाव्यात, थकित देयके, अर्धवेळ शिक्षकांना शिक्षण सेवक पूर्ण झाल्यावर पूर्णवेळ पद पायाभूतमध्ये जाते, अशा वेळी त्यांचे अर्धवेळ वेतन पद मंजुरीपर्यंत खंडित करू नये, आदी मागण्या यावेळी करण्यता आल्या. यापैकी शासन स्तरावर नसलेल्या मागण्यांवर राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालकांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी संचालकांनी दिले.

हे पण वाचा -
1 of 4

काय आहेत मागण्या – (Maharashtra Shikshak Bharti 2022)

  • सेवानिवृत्त शिक्षकांची संपकालीन 42 दिवसाची रजा त्यांचे खात्यावर जमा करणे
  • विषय गट योजना पूर्ववत ठेवणे
  • आश्वासित प्रगती योजना लागू करणे
  • संच मान्यता 2018 -19 प्रमाणे या वर्षी देखील शिक्षक संख्या निश्चित करणे
  • माध्यमिक संलग्न कनिष्ठ महाविद्यालयीन तुकडीतील विद्यार्थी संख्या 60 व वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न मध्ये 80 असावी
  • शिक्षकाचा कार्यभार शून्य झाल्याशिवाय त्यांना अतिरिक्त घोषित करू नये

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com