Maharashtra Govt. : राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी!! तुमच्या मानधनात झाली ‘इतकी’ वाढ

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकारने शिक्षक-पदवीधर (Maharashtra Govt.) निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर शिक्षकांना खूश करण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. राज्य सरकारने शिक्षकांच्या मानधनात चांगलीच वाढ केली आहे. महाराष्ट्रात नुकतीच तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला. विशेष म्हणजे जुन्या पेन्शन योजनेवरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं देखील बघायला मिळालं. हा मुद्दा महाविकास आघाडीने चांगलाच उचलून धरला. पाच पैकी तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. तर भाजपला फक्त एका ठिकाणी समाधान मानावं लागलं.

मानधनात अशी झाली वाढ – (Maharashtra Govt.)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना पूर्वी 6,000 माानधन दिलं जायचं. आता ते 16,000 रुपये एवढं मानधन दिलं जाणार आहे. राज्य सरकारने याबाबत पत्रक जारी करत माहिती दिली आहे.

माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पूर्वी 8,000 रुपये मानधन होतं. पण आता त्यांच्याही मानधनात वाढ करण्यात आली आहे. माध्यमिक शाळेतील शिक्षकांना आता 18,000 रुपये (Maharashtra Govt.) मानधन देण्यात येईल.

उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना यापूर्वी 9,000 रुपये मानधन दिलं जायचं. मात्र आत्ता 20,000 रुपये एवढे मानधन करण्यात आले आहे.

सरकारच्या परिपत्रकातील मुद्दे – 

राज्यतील जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, कटकमंडळे, महापालिका तसेच मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये 10 मार्च 2000 सालाच्या शासन निर्णयानुसार शिक्षक सेवा योजना कार्यान्वित करण्यात आली होती.

या शासन निर्णयानुसार शिक्षक सेवक (Maharashtra Govt.) म्हणून नियुक्ती दिलेल्या व एस.एस.सी., एच.एस.सी आणि डी.एड. एशी अर्हता असलेल्या उमेदवाराला दरमहा 2500 रुपये तसेच अन्य पात्रता धारक पण अप्रशिक्षित उमेदरावारांना दरमहा 1500 रुपये एवढे मानधन देण्याची तरतूद करण्यात आली होती.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये 27 एप्रिल 2000 साली शिक्षक सेवा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियान योजनेच्या प्रारुप आराखड्यातील माध्यमिक शिक्षकांच्या पदांचे निर्धारण व मिनशिक्षकांची नियुक्ती हे मुद्दे (Maharashtra Govt.) विचारात घेऊन आधीचा शासन निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर राज्यातील या शिक्षक सेवा योजनेतील शिक्षक सेवकांना 3,000 ते 5,000 रुपये मानधन देण्याचं निश्चित झालं. पुढे हेच मानधन 6 हजार ते 9 हजार करण्यात आलं. पण त्यानंतर हे मानधन वाढवण्यात आलेलं नव्हतं. वाढत्या  महागाईचा वितार करता सरकारने या शिक्षकांच्या मानधनात अखेर वाढ केली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com