Maharashtra Cabinet Decision : सरकारचा मोठा निर्णय!! राज्यातील ‘या’ शिक्षकांचा पगार 15 हजाराने वाढला

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मंगळवारी राज्य शासनाची एक महत्त्वाची मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Decision) बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी हिताचे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विनाअनुदानित शाळांच्या वाढीव अनुदानासाठी देखील एक मोठा निर्णय झाला आहे. विनाअनुदानित शाळांना वाढीव अनुदान म्हणून अकराशे कोटी रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आता राज्यातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना 60 टक्के अनुदान मिळणार आहे जे की आतापर्यंत 40 टक्के होते. यामुळे अशा शिक्षकांचे पगार 25000 वरून थेट 40 हजारावर जाणार (Maharashtra Cabinet Decision) आहेत. खरं पाहता 2012 मध्ये विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची तरतूद तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.

मात्र किती अनुदान मिळेल याबाबत निर्णय झाला नाही, म्हणजेच अनुदान मंजूर न केल्यामुळे ही प्रक्रिया खोळंबली. 2014 मध्ये मात्र राज्यात सत्ता परिवर्तन झाले, काँग्रेस सत्ता बाहेर गेले आणि राज्यात भाजपा सत्तेचा उदय झाला. भाजपा सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राची कमान आली.

मुख्यमंत्रीपदावर पिठासीन झाल्यानंतर देवेंद्र सरकारने 20 टक्के अनुदान विनाअनुदानित शाळांना देण्यासाठी मान्यतां दिली. यानंतर जवळपास चार वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये (Maharashtra Cabinet Decision) या अनुदानात वाढ करण्यात आली आणि अनुदान 40% एवढे झालं. आता पुन्हा एकदा काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला असून या अनुदानामध्ये 20 टक्के वाढ झाली असून आता विनाअनुदानित शाळांना 60 टक्के अनुदान प्राप्त होणार आहे.

यासाठी 1100 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून आता विनाअनुदानित शिक्षकांचे पगार दहा हजारांनी वाढणार आहेत. राज्यात जवळपास विनाअनुदानित 2000 शाळा असून यामध्ये पाच हजार शिक्षक कार्यरत आहेत ज्यांना आता 60 टक्के एवढा पगार मिळणार आहे.

म्हणजेच शिक्षकांचे पगार आता दहा ते (Maharashtra Cabinet Decision) पंधरा हजारांनी वाढणार निश्चितच या महागाईच्या काळात यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com