Mahapareshan Recruitment 2023 : 10वी/ ITI पाससाठी 137 पदावर भरती; महापारेषण देणार नवीन उमेदवारांना संधी

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण (Mahapareshan Recruitment 2023) कंपनी लिमिटेड, परळी, बीड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 137 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, परळी, बीड
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 137 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. ४३१५१५.

वय मर्यादा –
१८ ते ३० वर्षे
(मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
नोकरी करण्याचे ठिकाण – परळी, बीड
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त (Mahapareshan Recruitment 2023) औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू राहिल.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण चे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahapareshan Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com