Krushnu Nandi : ‘चांद्रयान 3’ मोहिमेत शेतकऱ्याच्या मुलाचाही सहभाग; ISROमध्ये बसून ठेवतोय यानावर लक्ष

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारताने नुकतीच चंद्रावरची तिसरी (Krushnu Nandi) मोहीम सुरु केली आहे. बांकुरातल्या पत्रसैर येथील  कृष्णू नंदी हा तरुण या मोहिमेत सहभागी आहे. लहानपणापासूनच कृष्णू यांनी इंजिनीअर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी आहे ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. चिकाटीने अभ्यास करुन या तरुणाने हे यश मिळवलं आहे.

Krushnu Nandi

दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातला मुलगा 
कृष्णू लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती आणि चिकाटीच्या जोरावर आपले स्वप्न साकार (Krushnu Nandi) करू शकतो; हे कृष्णू यांनी सिध्द केले आहे. पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातल्या पत्रसैर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील डन्ना हे कृष्णू यांचं गांव. ते सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

Krushnu Nandi

चांद्रयान-3 मोहिमेत काम करण्याची संधी
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं एक पथक चंद्राच्या दिशेने चाललेल्या मून रोव्हरचे विविध तपशील आणि हालचालींवर लक्ष ठेवत आहे. कृष्णू नंदी यांचाही या पथकात समावेश आहे. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी कृष्णू चांद्रयान 2 प्रकल्पात नव्हते.
दुर्दैवाने ती मोहीम अयशस्वी ठरली होती. मात्र आता कृष्णू यांना चांद्रयान-3 प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली आहे.

Krushnu Nandi

बांकुराची शान..कृष्णू (Krushnu Nandi)
पत्रसैरमधल्या बमीरा गुरुदास विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर, कृष्णू यांनी चटना इथल्या कमालपूर नेताजी हायस्कूलमधून विज्ञान विषयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं. कोलकत्ता येथील आरसीसी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बीटेक केलं. त्यानंतर जादवपूर (Krushnu Nandi) विद्यापीठातून एमटेक पूर्ण केलं. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कृष्णू यांना इस्रोमध्ये नोकरी मिळाली. बांकुराची शान असलेल्या कृष्णू नंदी यांचे वडील तारापाद नंदी म्हणाले की; “कृष्णू लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. इंजिनीअर होण्याचं त्याचं स्वप्न होतं. चांद्रयान -3 मोहिमेत त्याचा सहभाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी (Krushnu Nandi) केलेले कठोर परिश्रम हे कृष्णू यांच्या यशाचं गमक आहे. या गुणांच्या जोरावर त्यांनी जीवनात मोठं यश मिळवलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com