Kotwal Bharti 2023 : 4थी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात कोतवाल भरती सुरु; लगेच करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । तहसिलदार कार्यालय, लातूर अंतर्गत (Kotwal Bharti 2023) कोतवाल पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा  आहे. अर्ज प्रक्रिया 24 जुलै 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

संस्था – तहसिलदार कार्यालय, लातूर
भरले जाणारे पद – कोतवाल
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 24 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसील कार्यालय, लातूर, महाराष्ट्र

नोकरी करण्याचे ठिकाण – लातूर
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज फी – रु. 25/-
परीक्षा फी – (Kotwal Bharti 2023)
खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता – रु. 500/-
मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवाराकरीता – रु. 400/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार किमान 4 थी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
कोतवाल Rs. 15,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. (Kotwal Bharti 2023)
4. अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक २४ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय लातूर येथे सादर करावेत.

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल.
2. लेखी परिक्षा दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12.30 ते 02.00 या वेळेत प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल.
3. गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच एकूण 100 पैकी मिळालेल्या गुणांच्या आधारावर असेल.
4. लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
5. लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्यातील भौगोलिक माहिती याचा समावेश राहिल.
लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. (Kotwal Bharti 2023)
6. लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांना स्वतः करावा लागेल.

भरतीचा तपशील –
Latur Kotwal Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (Kotwal Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – latur.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com