Job Fair 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल (Job Fair 2024) तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. अनेक तरुण-तरुणी शिक्षण पूर्ण करताना किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात धावपळ करत असतात. त्यांच्यासाठी रोजगार मेळावे चांगली संधी घेवून येत असते. अशाच एका रोजगार मेळाव्याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

राज्यातील बेरोजगार युवकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी ‘अमरावती रोजगार मेळावा 2024’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून सर्व्हेअर, मॅनेजर, सुपरवायजर, इलेक्ट्रिशियन, रिसेप्शनिस्ट अशी तब्बल 1294 पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या (Job Fair 2024) पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहे. मेळाव्याची तारीख 01 मार्च 2024 आहे. या मेळाव्याविषयी सविस्तर माहिती घेवूया…

मेळाव्याचे नाव – ‘अमरावती रोजगार मेळावा 2024’
पद संख्या – 1294 पदे (Job Fair 2024)
भरली जाणारी पदे – सर्व्हेअर, मॅनेजर, सुपरवायजर, इलेक्ट्रिशियन, रिसेप्शनिस्ट आणि इतर पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – SSC/HSC/ITI/पदवीधर/डिप्लोमा
वय मर्यादा – या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.

मेळाव्याची तारीख – 01 मार्च 2024
मेळाव्याची वेळ – सकाळी 10:00 पासून पुढे
मेळाव्याचे ठिकाण – लोकनायक बापूजी अणे महिला महाविदयालय,यवतमाळ,जि.यवतमाळ
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती, यवतमाळ, पुणे, नागपूर
विभाग – अमरावती
जिल्हा – बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Fair 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com