Job Alert : स्टेनो, शॉर्टहँड पद भरती; स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेत नोकरीसाठी थेट द्या मुलाखत 

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक लि. अंतर्गत स्टेनो, लघुलेखिका (Job Alert) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक लि.
भरले जाणारे पद – स्टेनो, लघुलेखिका
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (समक्ष)
मुलाखतीचा पत्ता – मुख्य कचेरी, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई-४०० ००८
मुलाखतीची तारीख – 25 सप्टेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
स्टेनो
  • कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
  • मराठी व इंग्रजी टंकलेखन वेग ६० ते १०० प्रतिमिनिट आवश्यक
  • मराठी लघुलेखन ६० ते १२० शब्द प्रति मिनिट आवश्यक.
लघुलेखिका
  • कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
  • मराठी व इंग्रजी टंकलेखन वेग ६० ते १०० प्रतिमिनिट आवश्यक
  • मराठी लघुलेखन ६० ते १२० शब्द प्रति मिनिट आवश्यक.

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी मुलाखतीस येताना अर्ज सादर करायचा आहे.
2. इतर कोणत्याही पद्धतीने (Job Alert) अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. मुलाखतीची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com