Job Alert : आता थेट मुलाखतच द्या!! राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती; 1,85,000 पगार

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती (Job Alert) शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी दि. 4 व 5 जुलै 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे
भरले जाणारे पद – (Job Alert)
1. प्राध्यापक – 07 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 08 पदे
3. अधिव्याख्याता – 55 पदे
पद संख्या – 70 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख (पदानुसार) –
1. अधिव्याख्याता – 4 जुलै 2023
2. प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक – 5 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्राध्यापक –
१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.)
२. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस / डी.एन.बी.)
३. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC ) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील (Job Alert) सहयोगी प्राध्यापक अथवा समकक्ष पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव.
४. NMC चे नियमानुसार ४ publications आवश्यक
५. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार.
६. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O / A/B / C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.
७. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

2. सहयोगी प्राध्यापक –
१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.)
२. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस./डी.एन.बी.)
३. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC ) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील (Job Alert) सहयोगी प्राध्यापक अथवा समकक्ष पदाचा किमान ४ वर्षाचा अनुभव.
४. NMC चे नियमानुसार २ publications आवश्यक
५. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार.
६. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.
७. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

3. अधिव्याख्याता – (Job Alert)
१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.)
२. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी. (एम.डी / एम.एस./डी.एन.बी.)
३. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्ट अथवा समकक्ष कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.
४. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार.
५. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.
६. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

मिळणारे वेतन –
1. प्राध्यापक – Rs. 1,85,000/- दरमहा
2. सहयोगी प्राध्यापक – Rs. 1,70,000/- दरमहा
3. अधिव्याख्याता – Rs. 1,00,000/- दरमहा
निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र (Job Alert) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.
3. मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता देण्यात येणार नाही.
4. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com