Job Alert : ‘या’ IT कंपन्यांमध्ये पर्मनंट Work From Home; काय आहे पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन। बिझनेस ऑपरेशनमध्ये डेटा सायंटिस्ट महत्त्वपूर्ण भूमिका (Job Alert) बजावतात. डेटा सायंटिस्ट डिजिटल माहितीचं महत्त्व पटवून देण्याचं, ऑर्गनायझेशन चालवण्यासाठी डेटाचं विश्लेषण आणि त्याचा वापर करण्यात कंपन्यांना मदत करण्याचं काम करतात. ऑनलाइन रोजगार शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी रिमोट डेटा सायन्स नोकऱ्यांमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरीच्या शोधात असल्यास आणि रिमोट पद्धतीने काम करण्यास इच्छुक असल्यास हेल्थकेअर, एज्युकेशन, सेल्स, कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी या क्षेत्रांत नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या संदर्भातलं वृत्त एका वृत्त समूहानं दिलं आहे.

झेप्टो

झेप्टो ही कंपनी डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगचा अनुभव असलेले उमेदवार शोधत आहे. या उमेदवारांनी बिझनेस वाढण्यासाठी KPIs ट्रॅक करण्यासाठी काम करणं अपेक्षित आहे. झेप्टोमधल्या डेटा सायंटिस्ट पदासाठीची किमान पात्रता उमेदवाराने इंजिनीअरिंगमध्ये डिग्री घेतलेली असण्याची आहे. तसंच त्यांना स्टॅटिस्टिकल अ‍ॅनालिसिस व मशिन लर्निंग चॅलेंजेसबद्दल माहिती असावी. यासाठी त्यांनी 0-2 वर्षांची अनुभवाची अट ठेवली आहे.

ट्युरिंग

ट्युरिंग ही आयटी क्षेत्रातली एक मोठी कंपनी आहे. या कंपनीत अनुभवी डेटा सायंटिस्टची नियुक्ती करण्यात येत आहे. हे डेटा सायंटिस्ट बिझनेस आणि प्रॉडक्ट रिसर्चसाठी घरून काम करू शकतात. रिक्रूटमेंट, हायरिंग आणि मॅनेजमेंट यासाठी टॅलेंट क्लाउड नावाचा प्लॅटफॉर्म आहे. अनेक कंपन्या टॅलेंट (Job Alert) क्लाउडमार्फत उमेदवारांची निवड करतात. या पदासाठी उमेदवाराचं शिक्षण बिझनेस, अर्थशास्त्र, गणित, सायंटिफिक किंवा इंजिनीअरिंग कॉन्सन्ट्रेशनमध्ये झालेलं असावं. तसंच त्यांनी Python सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आणि SAS आणि MATLAB सारख्या मॅथेमॅटिकल टूल्समध्ये डिग्री घेतलेली असावी.

पेटीएम (Job Alert)

FASTag ट्रान्झॅक्शनवर रिमोटली काम करण्यासाठी भारतातली सर्वांत मोठी फायनान्शिअल सर्व्हिस पुरवणाऱ्या पेटीएम कंपनीला डेटा अ‍ॅनालिटिक्सची आवश्यकता आहे. ग्रुप SQL क्वेरी डेव्हलप करत असून HIVE कडून डेटा प्राप्त करत आहे. ट्रान्झॅक्शन व GMV ट्रॅक करणं हे दैनंदिन काम आहे. उमेदवाराला SQ, BQ, HIVE आणि स्प्रेडशीट आणि डेटाबोर्ड डिझाइनच्या चांगल्या माहितीसह, डेटा अ‍ॅनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

डेलॉइट

डेलॉइट कंपनी 3-6 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार शोधत (Job Alert) आहे. उमेदवारांना डेटा अ‍ॅनालिसिस, पीअर रिव्ह्यूइंग कोड आणि डेटा टेस्टिंगसाठी Python, SQL किंवा PySpark या प्रोग्रामिंगची माहीती आणि अनुभव असायला हवा. डेलॉइट इतर बिझनेसना उच्च दर्जाची व्यावसायिक मदत आणि प्रोजेक्ट्ससाठी चांगलं वर्कप्लेस देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com