करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल परीक्षा एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Mains 2024) 2024 सत्र-1 साठी प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
या बातमी सोबत महत्वाची दुसरी अपडेट अशी आहे; बीटेक (B. Tech) आणि बीईचा (BE) पेपर आता 27, 29, 30, 31 आणि 1 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. बीआर्क (B.Arch) आणि बीप्लानिंगचा पेपर हा 24 जानेवारीला होणार आहे.
प्रवेश पत्र कसं डाउनलोड करायचं?
1. सर्वात अगोदर jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. Download Admit Card B.Arch/B.Planning वर क्लिक करा.
3. तिथे एक लिंक दिसेल.
4. तुमचा अॅप्लिकेशन नंबर आणि तुमची जन्म तारीख आणि तुमचा पासवर्ड टाका.
5. त्यानंतर लाॅगिंन करा. (JEE Mains 2024)
6. तिथेच तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र दिसले.
7. ते डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.
परीक्षेसाठी महत्वाच्या सुचना – (JEE Mains 2024)
1. परीक्षेत कोणीही काॅपी करताना आढळल्यास त्या विद्यार्थ्याला परीक्षेस बसू दिले जाणार नाही. त्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
2. टॉयलेट ब्रेकनंतर विद्यार्थ्याची तपासणी केली जाईल.
3. बायोमेट्रिक सिस्टमधून परत विद्यार्थ्यांला प्रोसेस करावी लागेल.
जेईई (मेन) 2024 ही परीक्षा तब्बल 13 भाषांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com