JEE आणि NEET परीक्षा निश्चित वेळेतच होणार; NTAचे स्पष्टीकरण

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

नवी दिल्ली । JEE Main 2020 आणि NEET UG प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच NTAकडून वेबसाईटवर परीक्षा निश्चित वेळेतच होण्यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. एनटीएने JEE मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे.

JEE Main परीक्षेसोबत NEET परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानेही JEE Main 2020 आणि NEET UG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. NTAने या परीक्षा वेळेत होणार असल्याचे सांगत स्पष्टीकरणात म्हटलं कि, “JEE Main 2020 आणि NEET UG परीक्षा पुढे ढकलण्याची होणारी मागणी अधिकारात नसल्याचं आमच्या निदर्शनात आलं आहे. आमच्या मते कोरोना संकटात आयुष्य थांबता कामा नये. उमेदवारांचं भवितव्य अंधारात टाकू शकत नाही, शिवाय त्यांचं शैक्षणिक वर्षही वाया जाता कामा नये. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन परीक्षा पार पडणार असून ती पुढे ढकलली जाणार नाही. पुनर्विचार याचिका योग्य नाही”.

दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर JEE Main 2020 आणि NEET UG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत होती. पण सर्वोच्च न्यायालयानेही JEE Main 2020 आणि NEET UG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली असून वेळेतच होईल असा निर्णय दिलेला आहे. न्यायालयाने निर्णय देताना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया घालवू शकत नाही असं म्हटलं होतं.