ITI Admission 2023 : ITIची प्रवेश संख्या 2 टक्क्यांनी वाढली; यंदा 1 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

करिअरनामा ऑनलाईन । व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण (ITI Admission 2023) संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय ITIमध्ये या शैक्षणिक वर्षात तब्बल 95 टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. आयटीआयमधील विविध प्रकारच्या ८३ ट्रेडच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमार्फत राबविण्यात आली. या प्रक्रियेंतर्गत राज्यभरातील शासकीय आयटीआयमध्ये १ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दोन टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयला (ITI) पसंती दिली आहे. गतवर्षी १ लाख २४ हजार ९०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.

जून महिन्यापासून आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. राज्यात ४१७ संस्थांमध्‍ये १ लाख ४२ हजार ५०० जागा उपलब्ध होत्या. प्रवेशाच्या सहा फेऱ्यांनंतर प्रवेशाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रवेशात वाढ झाली आहे. मात्र खासगी आयटीआयलाही गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे.
अशी आहे प्रवेशाची आकडेवारी (ITI Admission 2023)
1. संस्था – शासकीय आयटीआय –
जागा – ९३,४८४
प्रवेश – ८९,३८३
2. संस्था – खासगी आयटीआय
जागा – ४९,०१६
प्रवेश – ३५,६६९
एकूण – १,४२,५०० – १,२८,१७१
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com