ITBP Recruitment 2022 : 12 वी पास उमेदवारांनो… काळजी नको!! 81,100 रुपयांपर्यंत पगार मिळवा, जाणून घ्या कुठे?

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी (ITBP Recruitment 2022) ही एक आनंदाची बातमी आहे. ITBP कॉन्स्टेबल (कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) पदांच्या भरतीसाठी प्रशासनाने अर्ज मागवले आहेत. ITBP अर्थात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये एकूण 248 पदांसाठी भरती होत आहे. एकूण 248 पदांपैकी 90 पदांवर ITBP मध्ये आधीच कार्यरत असलेल्या उमेदवारांची भरती केली जाईल. उर्वरित 158 जागांसाठी उमेदवार थेट अर्ज करू शकतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर माहिती मिळेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली असून 7 जुलै 2022 पर्यंत अर्ज करता येईल.

हे पण वाचा -
1 of 323

रिक्त जागांचा तपशील –

 1. एकूण 248 पदांपैकी 90 पदांवर ITBP मध्ये आधीच कार्यरत असलेल्या उमेदवारांची भरती केली जाईल.
 2. उर्वरित 158 जागांसाठी उमेदवार थेट अर्ज करू शकतील.
 3. 158 पदांमध्ये 135 पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत.
 4. महिला उमेदवारांसाठी 23 पदे आहेत.
 5. यासोबतच 158 पदांपैकी 65 पदे अनारक्षित असून 26 पदे अनुसूचित जाती (SC), 23 पदे अनुसूचित जमाती (ST), 28 पदे ओबीसी (OBC) आणि 16 पदे EWS प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

वयोमर्यादा – (ITBP Recruitment 2022)

 1. अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असावी.
 2. यासोबतच SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट असेल.

शैक्षणिक पात्रता –

 1. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 12वी पास असणे आवश्यक आहे. (ITBP Recruitment 2022)
 2. 35 शब्द प्रति मिनिट या वेगाने इंग्रजी टायपिंग किंवा 30 शब्द प्रति मिनिट या वेगाने हिंदी टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रुपये पगार दिला जाईल.

अशी असेल निवड प्रक्रिया –

 1. निवड प्रक्रियेमध्ये पीईटी
 2. पीएसटी
 3. लेखी चाचणी
 4. कौशल्य चाचणी
 5. दस्तऐवज पडताळणी (ITBP Recruitment 2022)
 6. वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असेल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2022

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com