IT Job : IT इंजिनिअर्स रांगेत ताटकळत उभे; 100 जागांसाठी आले 3 हजार पेक्षा जास्त उमेदवार

करिअरनामा ऑनलाईन । पुणे शहर IT क्षेत्राचे माहेरघर म्हणून ओळखले (IT Job) जाते. पुणे शहर आणि परिसरात अनेक दिग्गज आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. IT क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील एक गर्दीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुलाखतीसाठी लागणारी भली मोठी रांग या व्हिडिओत दिसत आहे. ही रांग सरकारी नोकरीसाठी नाही तर खासगी नोकरीसाठी आहे. रांग लावलेले युवक फक्त पदवीधर नाहीत तर ते चक्क आयटी इंजिनिअर आहेत.

पुण्याजवळील हिंजवडी येथील एका नामांकित IT कंपनीमध्ये वॉक-इन इंटरव्यू घेण्यात आले. ज्युनिअर डेव्हलपर पदाच्या केवळ 100 जागा भरण्यासाठी या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यासाठी तब्बल 3 हजार अभियंते आपले नशीब आजमावण्यासाठी आले होते. यापैकी अनेक जण फ्रेशर्स होते. 2,900 पेक्षा जास्त बायोडाटा या मुलाखतीत जमा झाले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओची चर्चा (IT Job)
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. त्यानंतर 100 पदांसाठी झालेली ही गर्दी पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पुणे शहरात आयटी कंपन्यांची संख्या मोठी असताना इतके युवक मुलाखतीसाठी आले. यामुळे अनेक आयटी अभियंते रोजगाराच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.

अशा आहेत युजर्सच्या कॉमेंट
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेक (IT Job) युजर्सकडून वेगवेगळ्या कॉमेंट व्यक्त करण्यात आल्या आहेत. एका युजर्सने म्हटले आहे की, एक कंपनी एनालॉग पद्धतीने अभियंत्याचे बॉयोडाटा जमा करत आहे, ही खेदाची बाब आहे. एकाने लिहिले, की “कोणी दिला होता इंजिनिअर होण्याचा सल्ला, त्याला शोधून काढा.” तर एकाने इंजिनियर्सना गावाकडे जाऊन शेती करण्याचा सल्ला दिला आहे. स्पर्धेच्या युगात सध्या नोकरी मिळवणे किती अवघड झाले आहे हे पुन्हा एकदा या व्हीडिओमुळे समोर आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com