ISRO Scientist Salary : कोट्यवधींच्या मोहिमांचं नेतृत्त्वं करणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? सुविधांचीही होते खैरात…

करिअरनामा ऑनलाईन । भारतानं अखेर चंद्राच्या (ISRO Scientist Salary) दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या मोहिमेमुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं चीज झालं आहे. चांद्रयान 2 मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान 3 च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे.

भारतीय यान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा दि. 23 ऑगस्ट रोजी (बुधवार) संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी पार पडली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता तो खरा करुन दाखवला आहे.
चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणासह असंख्य भारतीयांच्या महत्त्वाकांक्षाही थेट अवकाशाच्या दिशेनं झेपावल्या आहेत. देशासाठी अतिशय ऐतिहासिक अशा या क्षणाचे साक्षीदार तुम्हीआम्ही सगळेच झालो आहोत.
चांद्रयान 3 मोहिमेच्या निमित्तानं या मोहिमेसाठी मोलाचं योगदान देणारे अनेक चेहरे समोर आले आहेत. ज्यामध्ये शास्त्रज्ञांनी आपल्या संपूर्ण टीमचं तोंड भरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. याच कारणामुळं आणखी एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे या शास्त्रज्ञांच्या नोकऱ्यांची आणि इस्रोतून त्यांना मिळणाऱ्या पगाराची.

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) वतीनं जेव्हा अध्यक्ष आणि चांद्रयान 3 मोहिमेचं नेतृत्त्वं करणाऱ्या शास्त्रज्ञांनी माध्यमांना संबोधित केलं त्यावेळी या मंडळींची कर्तबगारी अनेकांचेच डोळे दीपवून गेली. काहींना तर प्रश्नच पडला, इतक्या कोट्यवधींच्या मोहिमांचं नेतृत्त्वं करणाऱ्या या शास्त्रज्ञांना किती पगार असेल याविषयी. चला तर मग जाणून घेवूया या शास्त्रज्ञांना पगार आणि भत्ते कसे मिळतात याविषयी…

ISRO मधील शास्त्रज्ञांना दर महिन्याला मिळणारं वेतन
उपलब्ध माहितीनुसार इस्रोमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतन (Salary) श्रेणीच्या लेव्हल 10 मध्ये Scientist ‘SC’ पदी सेवेत असणाऱ्यांना दर महिन्याला किमान 56,100 रुपये इतकं वेतन दिलं जातं. नोकरीवर रुजू झालेल्या उमेदवारांना प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ISRO सायंटिस्टचं पद, त्यासाठीचे भत्ते आणि इतर सुविधांचा लाभ मिळतो.
असे मिळतात भत्ते
इस्रोमध्ये नोकरी लागल्यास पदानुसार मिळणारा पगार आणि त्यासाठी भत्ते यांची आखणी केली जाते. जिथं सुरुवातीचं वेतन 56,100 रुपये प्रतिमहिना असून, बंगळुरु येथे इच्छुकांना नोकरीसाठी जावं लागतं. भत्त्यांचं सांगायचं झालं तर या पगारांमध्ये घर भाडं, मगाहाई भत्ता, वैद्यकिय भत्ता, वाहतूक भत्ता, विमा, प्रवास सवलती, पेन्शन योजना, हाऊस बिल्डींग अलाऊन्स या आणि अशा इतर भत्त्यांचा समावेश असतो.

पदानुसार असते कामाची जबाबदारी
इस्रोमध्ये रुजू झालेल्यांना त्यांच्या पदानुसार कामाची जबाबदारी सोपवण्यात येते. ज्याचा उल्लेख त्यांच्या Job Profile मध्ये केला जातो. इस्रोकडून (ISRO) राबवण्यात येणाऱ्या उपग्रह प्रक्षेपण, अवकाश निरीक्षण या आणि अशा अनेक मोहिमांमध्ये या मंडळींना योगदान देता येतं. जिथं विज्ञान शाखेतील विविध विभागांसाठीचे शास्त्रज्ञ आपलं कौशल्य पणाला लावतात.
विविध प्रशिक्षण आणि शिबिरे (ISRO Scientist Salary)
इस्रोमध्ये तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात ज्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे अशी मंडळी विविध संशोधनं, विकासकामं आणि तत्सम गोष्टींसाठी निवडली जातात. वेळोवेळी वैयक्तिक कामगिरीच्या बळावर त्यांना प्रमोशन आणि पर्यायी पगारवाढीचाही लाभ मिळतो. शिवाय वेळोवेळी इस्रोतर्फे अद्ययावत तंत्रज्ञान आणि अवकाशाशी संबंधित जागतिक स्तरावरील प्रशिक्षण शिबिरांमध्येही सहभागी होण्याची संधी मिळते.

राहणीमानाचा खर्च आणि महागाई भत्ता
इतर कोणत्याही संस्थेप्रमाणे, ISRO कर्मचाऱ्यांना पगार देताना राहणीमानाचा खर्च आणि महागाईचा विचार करते. कर्मचार्‍यांची क्रयशक्ती अबाधित राहावी, त्यांना दैनंदिन जीवनातील वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यास सक्षम बनवण्यासाठी वेळोवेळी महाभाई भत्ता (Dearness Allowance) वाढवला जातो.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी विशेष बाबी
इस्रोच्या सर्वोच्च पदावर, जसे की वरिष्ठ अधिकारी आणि नामवंत शास्त्रज्ञ, वेतनमान अधिक लक्षणीय असू शकतात. या प्रतिष्ठित व्यावसायिकांना संस्थेच्या यशामध्ये त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल अनेकदा अतिरिक्त भत्ते आणि प्रोत्साहने मिळतात.

फायदे आणि पॅकेज
ISRO आपल्या कर्मचार्‍यांना एक आकर्षक लाभ पॅकेज प्रदान करते, ज्यामुळे त्यांची एकूण भरपाई आणखी वाढते. फायद्यांमध्ये गृहनिर्माण भत्ते, वैद्यकीय सुविधा, सेवानिवृत्ती योजना (ISRO Scientist Salary) आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक समर्थन यांचा समावेश असू शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com